Home » भारतातील स्टार्टअपला ‘या’ कारणास्तव परदेशी कंपन्या पैसे लावण्यास घाबरतायत

भारतातील स्टार्टअपला ‘या’ कारणास्तव परदेशी कंपन्या पैसे लावण्यास घाबरतायत

देशात सध्या स्टार्टअपचा ट्रेंन्ड कमी होऊ लागला आहे. जगभरातील बड्या वेंचर कॅपिटल फर्म भारतीय स्टार्ट अपमध्ये पैसे लावण्यापासून दूर राहत आहेत.  अशी माहिती बिझनेस स्टँन्डर्डच्या एका रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे.

by Team Gajawaja
0 comment
Indian Start up funding
Share

देशात सध्या स्टार्टअपचा ट्रेंन्ड कमी होऊ लागला आहे. जगभरातील बड्या वेंचर कॅपिटल फर्म भारतीय स्टार्ट अपमध्ये पैसे लावण्यापासून दूर राहत आहेत.  अशी माहिती बिझनेस स्टँन्डर्डच्या एका रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे. खरंतर वेंचर कॅपिटल फर्म एक प्रकारची प्राइव्हेट इन्वेस्टर आहे जे आपले पैसे स्टार्टअप कंपन्यांमध्ये आणि लहान व्यवसायात लावतात. सर्वसामान्यपणे वीसी फर्म अशा स्टार्टअपमध्ये पैसे लावतात. ज्यांच्याबद्दल असे मानले जाते की, ते लॉन्ग टर्ममध्ये उत्तम नफा देण्याची क्षमता ठेवतात. हे वेंचर कॅपिटल फर्म गुंतवणूकीऐवजी त्या कंपनीत हिस्सेदारी घेतात.

रिपोर्टनुसार जगातील बड्या स्टार्टअप गुंतवणूक जसे की, टाइगर ग्लोबल, सिकोइया कॅपिटल, सॉफ्ट बँक, एक्सेल आणि वाय कॉम्बीनेटर सारख्या परदेशी वीसी फर्म्सने भारतातील स्टार्ट अपसाठी फंडिंग बंद केली आहे. मार्केट इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म Trackxn च्या आकडेवारीनुसार टाइगर ग्लोबल आणि एक्सेलने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या जानेवारीत आतापर्यंत भारतीय स्टार्टअपमध्ये ९७ टक्के कमतरतेने गुंतवणूक केली आङे. सिकोईला कॅपिटलने या दरम्यान भारतीय स्टार्टअपमेध्ये ८५ टक्के कमी गुंतवणूक केली आहे. खरंतर अशा कंपन्या भारताच्या नव्या आणि नफा मिळवून देणाऱ्या कंपन्यांमध्ये फार मोठी गुंतवणूक करतात. (Indian Start up funding)

तर समोर आलेल्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये भारतीय स्टार्टअपने जवळजवळ दोन लाख २१ हजार ४३० कोटी रुपये जमा केले होते. यापैकी जवळजवळ २ लाख १५ हजार कोटी रुपये हे परदेशी गुंतवणूक होती. अशा प्रकारे पहायचे झाल्यास तर भारतीय स्टार्ट अप परदेशात गुंतवणूकीमुळे यश मिळवत होते. मात्र आता या परदेशी गुंतवणूकदारांनी जर फंडिंग बंद केले तर स्टार्टअपच्या समस्या वाढू शकता. यंदाच्या जानेवारीत आता पर्यंत भारतातील स्टार्टअपमध्ये परदेशी गुंतवणूक ७२ टक्क्यांनी कमी होऊन केवळ ३८ हजार कोटी रुपये झाली. तर गेल्या वर्षात याच दरम्यान १ लाख ३४ हजार कोटी रुपयांचे परदेशी गुंतवणूक या स्टार्टअपला मिळाले होते.

टाइगर ग्लोबला भारतात युनिकॉर्न निर्माण करणारे मशीन म्हटले जाते. युनिकॉर्नचा अर्थ असा होतो की, असा स्टार्टअप ज्याची वॅल्यूएशन एक अरब डॉलर पेक्षा अधिक आहे. फ्लिपकार्ट, ओला, झोमॅटोसह ३७ अन्य स्टार्टअप पुढे जाऊन युनिकॉर्न झाले.या सर्व स्टार्टअपमध्ये टाइगर ग्लोबलने पैसे लावले होते. काही कंपन्यांमध्ये आता सुद्धा यांची मोठी गुंतवणूक आहे.वीसी फर्म एक्सेल बद्दल बोलायचे झाल्यास तर फ्लिपकार्ट आणि फ्रेशवर्क्समध्ये सीड फंडिग म्हणजेच सुरुवाती गुंतवणूक केली होती. अशा प्रकारे जापानच्या सॉफ्टबँकने ओयो, डेल्हीवरी, पेटीएम, मीशो, ब्लिंकिट, लेन्सकार्ट आणि काही दुसऱ्या कंपन्यांत गुंतवणूक केली आहे. (Indian Start up funding)

दरम्यान, परदेशी वेंचर कॅपिटल फर्म भले भारतीय स्टार्टअपमध्ये पैसे लावण्यापासून दूर जात आहेत. परंतु भारतात वीसी फर्म भारतीय स्टार्टअपला दिलासा देत आहेत. भारतीय वीसी फर्म्सने गेल्या दोन महिन्यात भारतीय स्टार्टअपसाठी पैशांचा बंदोबस्त केला आहे. या प्रकरणी वीसी फर्म मल्टीपल्स अल्टरनेट एसेट मॅनेजमेंट सर्वाधिक पुढे आहे.


हेही वाचा- वैवाहिक आयुष्यात आनंदित राहण्यासाठी ‘या’ मनी मॅनेजमेंट टीप्स करा फॉलो


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.