Home » Train : रेल्वे आपत्कालीन चेन खेचल्यानंतर ट्रेन कशी थांबते?

Train : रेल्वे आपत्कालीन चेन खेचल्यानंतर ट्रेन कशी थांबते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Train
Share

आपण सर्वच नेहमी रेल्वेने प्रवास करतो. सर्वांच्या अतिशय सोयीचे प्रवासी माध्यम म्हणून रेल्वेची ओळख आहे. भारतात सर्वत्र रेल्वेचे जाळे पसरले आहे. भारतीय रेल्वेचे जाळे हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे जाळे असून, आशिया खंडातील सर्वात मोठे जाळे आहे. आपण रेल्वेने प्रवास करताना एक गोष्ट बघत असतो आणि ती म्हणजे रेल्वे बोगीमध्ये असलेली एक लाल रंगाची साखळी दिसते याला आपत्कालीन साखळी म्हणतात. प्रत्येक बर्थजवळ ही साखळी आपल्याला दिसते. आपल्याला कायम सांगितले जाते की, या साखळीला हात लावायचा नाही. कारण ही साखळी कोणी खेचली तर ट्रेन थांबते. (Train)

‘आपत्कालीनवेळी गाडी थांबवण्यासाठी साखळी ओढा!’ असे या साखळीजवळ लिहिलेले दिसते. या साखळीचा उपयोग गंभीर आणि अत्यावश्यक प्रसंगी ट्रेन थांबवण्यासाठी केला जातो. मात्र, अनेक प्रवासी ही साखळी उगाच खेचतात. अगदी मजा म्हणून ही साखळी खेचण्याचे अनेक प्रसंग घडतात. मात्र लोकांच्या अशा बेजबाबदार कृतीमुळे संपूर्ण रेल्वे व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का… की ही एवढीच साखळी खेचल्याने संपूर्ण रेल्वे कशी थांबते? नक्की ही साखळी कसे काम करते? आज या लेखातून आपण आपत्कालीन साखळी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. (Marathi News)

साखळी ओढल्यावर ट्रेन कशी थांबते?
एका मोठ्या वेबसाईटच्या वृत्तानुसार, ट्रेनच्या डब्यात असणारी साखळी ट्रेनच्या मुख्य ब्रेक पाईपला जोडलेली असते. या पाईपमध्ये ॲब्सोल्युट प्रेशर असतं. साखळी ओढताच, ब्रेक एअर पाईपमधील व्हॉल्व्ह उघडतो आणि हवा बाहेर येते. त्यामुळे ब्रेकमधील हवेचा दाब कमी होऊ लागतो आणि ट्रेनचा वेग कमी होतो. ट्रेनमध्ये असणारा लोको पायलट सतत प्रेशर मीटरचे निरीक्षण करत असतो, त्याला जेव्हा हवेच्या प्रेशरमध्ये बदल झाल्याचं लक्षात येते तेव्हा तो तीन वेळा हॉर्न वाजवून ट्रेनमध्ये उपस्थित असणारे गार्ड आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना सिग्नल देतो की ट्रेनची साखळी ओढली गेली असून ट्रेन थांबवण्यात येत आहे. असे असले तरी साखळी ओढल्यानंतर पायलट जोपर्यंत ट्रेन थांबवण्यासाठी सुरक्षित जागा मिळत नाही तोपर्यंत ट्रेन थांबवत नाही.जेव्हा एखादी ट्रेन खूप वेगानं धावत असते तेव्हा ती रुळावरून घसरू नये, यासाठी तिला थांबायला काही मिनिटं लागतात. (Marathi Top News)

Train

ही ट्रेनची साखळी ओढल्यानंतर ट्रेन थांबते. ट्रेनची साखळी कोणत्याही बोगीत ओढली जाऊ शकते, पण रेल्वे पोलीस किंवा रेल्वे विभागाला लगेच कळते की कोणत्या बोगीत साखळी ओढली गेली आहे. ट्रेनच्या प्रत्येक डब्याच्या बाहेर चेन अलार्म सिस्टम किंवा चेन लाइट सिस्टीम बसवण्यात आलेली असते. दिवसा कोणत्या कोचमधून चेन पुलिंग केले गेले आहे हे जाणून घेण्यासाठी चेन अलार्म सिस्टम उपयुक्त आहे. चेन लाइट सिस्टीमचा उपयोग रात्रीच्या चेन पुलिंगसाठी केला जातो. (Top Trending News)

ट्रेन थांबवण्यासाठी ओढल्या जाणाऱ्या साखळीचा एक भाग डब्याच्या आत असतो, तर दुसरा भाग डब्याच्या बाहेर सॉकेटमध्ये अडकवलेला असतो. जेव्हा ट्रेन थांबवण्यासाठी डब्यातून साखळी ओढली जाते, तेव्हा डब्याच्या बाहेर लटकलेली साखळी सॉकेटला लटकते आणि तीच लटकलेली साखळी पाहून गार्ड कोणत्या डब्यातून साखळी खेचली गेली हे शोधतो. याशिवाय काही गाड्यांमध्ये साखळी ओढताना बोगीच्या वरच्या कोपऱ्यात बसवलेला व्हॉल्व्ह फिरतो. हा फिरणारा व्हॉल्व्ह पाहून रेल्वे पोलिसांना कोणत्या बोगीत इमर्जन्सी ब्रेक लावला आहे हे कळते. (Top Social News)

केव्हा चेन खेचता येते ?
रेल्वेच्या नियमानुसार केवळ आपात्कालिन प्रसंगी ट्रेनची चेन खेचण्याची परवानगी आहे. यात चालत्या ट्रेनमध्ये आग लागल्यास, अपंग किंवा ज्येष्ठ नागरिक ट्रेनमध्ये चढण्याआधी गाडी सुरू झाल्यास, लहान मूल चुकून प्लॅटफॉर्मवर राहिल्यास, अचानक आजारपण झाल्यास, चोरीसारखी गंभीर घटना घडल्यास ही चेन खेचणे योग्य मानले जाते. (Marathi Top News)

विनाकारण चेन खेचल्यास काय शिक्षा होते?
रेल्वे कायद्यानुसार जर कोणा प्रवाशाने ट्रेनची सुरक्षा साखळी विनाकारण खेचली असेल तर ट्रेन थांबविणाऱ्या व्यक्तीला रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १४१ अंतर्गत कारवाई करते. अशा प्रकरणात दोषी आढळणाऱ्यास १००० रुपये दंडाची किंवा एक वर्षांच्या कारावासाची शिक्षा असते. किंवा काही प्रकरणात दोन्ही शिक्षा एकत्र देखील होऊ शकतात. (Top Stories)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.