भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी सुविधा सुलभ व्हाव्यातत म्हणून तिकिट सिस्टिममध्ये बदल केले जाणार आहे. ज्यामुळे प्रवाशांना आता रेल्वेच्या जनरल तिकिटासाठी स्थानकावर जाण्याची काहीच गरज नाही. त्याचसोबत प्रवाशांचा लांब लचक रांगेत उभे राहण्याचा वेळ ही वाचणार आहे. प्रवाशांसाठी तिकिट आता घरबसल्याच बुकिंग करण्याची सुविधा रेल्वेकडून उपलब्ध करुन दिली जाणार आहे. (Indian Railway)
या व्यतिरिक्त तुम्हाला प्रिंटेट तिकिट ठेवण्याची सुद्धा गरज नाही. कारण भारतीय रेल्वेने सर्व रिजर्व्ह आणि अनरिजर्व्ह तिकिटे ही डिजिटली विक्री करणार आहे. म्हणजेच आता रेल्वेच्या तिकिटाचे सिस्टम पूर्णपणे डिजिटल होमार आहे. यामुळे प्रवाशांना खुप फायदा होणार आहे.
सध्या प्रवास करणारे ८१ टक्के प्रवासी हे ऑनलाईन तिकिट बुकिंग करतात. पण १९ टक्के प्रवासी ही ऑफलाईन पद्धतीने तिकिट बुक करतात. रेल्वे स्थानकात लागणाऱ्या लांब लचक रांगेपासून प्रवासांना दिलासा मिळावा म्हणून रेल्वे प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
भारतीय रेल्वेची तिकिट सिस्टिम ही डिजिटल होणार आहे. यामुळे प्रवाशांना आपला प्रवास ही आरामात करता येणार आहे. प्रवाशांना तिकिट अनरिजर्व्ह तिकिट खरेदी करण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने तिकिट बुकिंग करावे लागणार आहे. काहीवेळेस असे होते की, तिकिट बुकिंगसाठी खुप मोठी रांग असते. त्यामुळे वेळेत नंबर न आल्याने ट्रेन सोडावी लागते. पण आता तिकिट सिस्टिम डिजिटल झाल्याने या सर्व समस्येतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
या व्यतिरिक्त रेल्वेकडून भारतीय रेल्वेसाठी एक नवे फिचर आणले जाणार आहे. त्यात वेटिंग तिकिट असणाऱ्या प्रवाशांना कळणार आहे की, कोणत्या बोगीत किती सीट्स रिकाम्या आहे. रेल्वे या सुविधेच्या माध्यमातून कंफर्म तिकिट मिळणे सोप्पे करणार आहे. ही सुविधा येणाऱ्या पुढील तीन महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. या नव्या व्यवस्थेअंतर्गत जे प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसइटवरुन तिकिट बुकिंग करती त्यांना गेट ट्रेन चार्ट निवडण्याचा ऑप्शन मिळमार आहे. यानंतर आयआरसीटीसीकडून एक मेसेज पाठवला जाईल. त्यातील लिंक ओपन करुन रिकाम्या सीट्स किती आहेत हे प्रवाशांना कळणार आहे. (Indian Railway)
हेही वाचा- तिर्थस्थळांना जोडणार वंदे भारत…
मेसेज आल्यानंतर प्रवाशाने लिंक ओपन केल्यानंतर त्याला तो कोणत्या ट्रेनने प्रवास करणार आहे आणि किती सीट्स रिकाम्या आहेत हे कळणार आहे. त्याचसोबत कोणत्या कॅटेगरीत किती सीट्स रिकाम्या आहेत हे सुद्धा कळणार आहे. रेल्वे नियमानुसार फर्स्ट कम फर्स्ट सर्विस प्रमाणे वितरित केले जाणार आहे. या सर्विससाठी प्रवाशाला ५-१० रुपयांचा शुल्क मोजावा किंवा विनामूल्य याची माहिती मिळू शकते.