Home » भारतीय नौदल दिनाचा इतिहास आणि महत्व

भारतीय नौदल दिनाचा इतिहास आणि महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Indian Navy Day
Share

दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. नौदलाच्या इतिहासातील हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. भारतीय नौदलाचे शौर्य, समर्पण आणि देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात त्यांची भूमिका यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. कारण याच ४ डिसेंबरच्या दिवशी भारतीय नौदलाच्या शूरवीरांनी पाकिस्तानचा पराभव केला होता.

१९७१ च्या भारत – पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाच्या विजयाच्या स्मरणार्थ नौदल दिन साजरा केला जातो. शिवाय भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि शौर्य याची जाणीव करून देण्यासाठी आणि त्याबद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो.

भारतीय नौदलाची स्थापना ईस्ट इंडिया कंपनीने १६१२ मध्ये केली. त्याला नंतर रॉयल इंडिया नेव्ही असे नाव देण्यात आले आणि स्वातंत्र्यानंतर 1950 मध्ये भारतीय नौदल म्हणून त्याची पुनर्रचना करण्यात आली. भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलांची नौदल शाखा आहे आणि तिचे नेतृत्व भारताचे राष्ट्रपती कमांडर-इन-चीफ म्हणून करतात. नौदल प्रमुख हा भारतीय नौदलाच्या लष्करी कर्मचाऱ्यांचा प्रमुख असतो. मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते.

ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी नौदलाची एक टीम तयार केली. नंतर याचे नाव रॉयल इंडियन नेव्ही असे करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५० साली रॉयल इंडियन नेव्ही हे नाव बदलण्यात आले आणि भारतीय नौदल अर्थाच इंडियन नेव्ही असे नाव ठेवण्यात आले.

४ डिसेंबरला नौदल दिन का साजरा केला जातो?
४ डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्यामागे देखील एक मोठे आणि महत्वाचे कारण आहे. हे कारण १९७१ च्या भारत – पाकिस्तान युद्धाशी संबंधित आहे. या युद्धात पाकिस्तानने ३ डिसेंबरला भारतीय विमानतळावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देत भारतीय नौदलाने ४ आणि ५ डिसेंबरच्या रात्री ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ राबवले. या मोहिमेत भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाचे मोठे नुकसान केले आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे जवान मारले गेले आणि भारताने मोठा विजय संपादन केला. या महान विजयाच्या स्मरणार्थ ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नौदल दिन साजरा करण्याचे महत्त्व
भारतीय नौदल दिन केवळ भारतीय नौदलाच्या कामगिरीचा गौरव करत नाही तर, देशवासियांना त्यांच्या सैन्याबद्दल अभिमान वाटण्याची संधी देखील देतो. हा दिवस आपल्याला सागरी सुरक्षेची गरज आणि नौदलाची भूमिका समजून घेण्याची संधी देतो. आपल्या नौदलाच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.