Home » इंडियन आयडल फेम सायली कांबळे अडकली विवाहबंधनात

इंडियन आयडल फेम सायली कांबळे अडकली विवाहबंधनात

by Team Gajawaja
0 comment
Sayli kamble
Share

सध्या मनोरंजनविश्वात लग्नाचा सीझन चालू आहे. मराठी असो किंवा हिंदी अनेक लहानमोठे कलाकार लग्नबंधनात अडकत आहे. नुकतेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे बिग बॅश वेडिंग संपन्न झाले. त्यानंतर अनेक सेलिब्रिटी लग्न करत आहे. आता नुकतीच ‘इंडियन आयडल’ फेम सायली कांबळेने (Sayli kamble) देखील लगीनगाठ बांधली आहे. काही महिन्यांपूर्वी ‘इंडियन आयडल’चा १२ सीझन संपन्न झाला. यंदाचा हा १२ वा सीझन तुफान गाजला आणि या सीझनच्या अंतिम स्पर्धेत पोहचलेले सर्वच स्पर्धक संपूर्ण जगात तुफान गाजले. याच अंतिम स्पर्धकांपैकी एक असलेल्या सायली कांबळेने तिचा मित्र असलेल्या धवलसोबत लग्न केले.

सायली कांबळेने (Sayli kamble) २४ एप्रिल रोजी तिचा बॉयफ्रेड असलेल्या धवलसोबत महाराष्ट्रीय पद्धतीने लगीनगाठ बांधली. या लग्नामध्ये दोन्ही बाजूचे जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार सामील झाला होता. सोशल मीडियावर या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये दोघेही वर-वधू महाराष्ट्रीयन वेशभूषेत दिसत असून, लग्नाचे विधी पूर्ण करत आहे. सायली (Sayli Kamble) नववधूच्या वेशात अतिशय आकर्षक दिसत असून तिने पिवळा रंगाची नऊवार साडी नेसली असून, त्यावर जांभळ्या रंगाचा शेला देखील घेतला आहे. यावर तिने सोन्याचे दागिने घातले असून, हातात हिरवा चुडा, कपाळावर मुंडावळी बांधल्या आहेत. तर तिच्या होणारी नवऱ्याने धवलने क्रीम कलरचा कुर्ता घातला असून त्यावर जांभळ्या रंगाची धोती आणि पुणेरी पगडी घेतली आहे. दोघांचाही लूक एकमेकांना कॉम्प्लिमेंट करताना दिसत आहे.

या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सायली आणि धवल लग्नाचे विधी पूर्ण करताना दिसत असून, एका फोटोमध्ये सायली (Sayli kamble) मंडपात येताना दिसत आहे. याशिवाय एका व्हिडिओमध्ये लग्नाचा हॉल, डेकोरेशन, वरात, लग्नाचे विधी होताना दिसत आहे. सायलीचे लग्न सोशल मीडियावर आणि तिच्या फॅन्समध्ये खूपच चर्चेचा विषय होता. धवलने तिला प्रपोज केले त्याच्या व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर सायलीच्या लग्नाच्या बातम्यांना खूपच उधाण आले होते.

=====

हे देखील वाचा – स्कर सोहळ्यातील ‘त्या’ घटनेमुळे जर विल स्मिथचा घटस्फोट झाला तर त्याचा परिणाम काय असेल?

=====

सायली (Sayli Kamble) आणि धवलने कल्याणमध्ये लग्न केले. याआधी सायलीने तिच्या लग्नाच्या आधीच्या सर्व विधींचे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे फोटो शेअर केले होते. यात मेहेंदी, प्रीवेडींग शूटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ होते. सायलीबद्दल अधिक सांगायचे झाले तर ती इंडियन आयडलमध्ये आल्यानंतर खूपच लोकप्रिय झाली. तिने या शोनंतर भारतात आणि भारताबाहेर देखील अनेक शो केले. सध्या ती टेलिव्हिजनवर नुकताच सुरू झालेल्या ‘सिंगिंग सुपरस्टार सीझन २’ मध्ये मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.