आपण कायम ‘होमगार्ड’ हे नाव ऐकत असतो. त्यांना पाहत देखील असतो. पोलीस आणि भारतीय सेनेशी मिळताजुळता युनिफॉर्म घालून होमगार्ड आपल्या आजूबाजूला वावरत असतात. अनेकदा ते पोलीस आहे असेच आपल्याला वाटते. मात्र ते पोलीस नसले तरी त्यांचे काम मात्र पोलिसांच्या कामाशी थोडेफार फरकाने मिळतेजुळतेच असते. होमगार्ड हे समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास कायम प्रयत्नशील असतात. पोलिसांना मदत करण्यासाठी ‘होमगार्ड’ या स्वयंसेवी दलाची स्थापना करण्यात आली आहे. आज याच संस्थेचा स्थापना दिन आहे. मात्र आजही अनेकांना होमगार्ड काय काम करतात? कसे काम करतात? आदी अनेक गोष्टींची माहिती नाहीये. (Home guards)
होमगार्ड या स्वयंसेवी दलाची स्थापना ६ डिसेंबर १९४६ रोजी करण्यात आली. त्यामुळेच दरवर्षी ६ डिसेंबर रोजी देशभरात भारतीय होमगार्ड स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशात, राज्यात, शहरात, गावात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे समाजात कायम कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे होमगार्ड स्वयंसेवक यांना आणि यांच्या निस्वार्थ कामाला हा दिवस समर्पित आहे. होमगार्ड म्हणजे काय तर पोलिस दलाचे एक पूरक दल. नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींमध्ये, प्रवेशी आणि निर्गम मार्गांचे नियंत्रण, नागरिकांचे रक्षण आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी कॅमचा सज्ज असतात. (Marathi)
१९४६ मध्ये बॉम्बे प्रांतात होमगार्ड युनिटची स्थापना झाली. होमगार्ड संस्थेचा लष्कर, नौदल, हवाई दल, इतर सुरक्षा यंत्रणांना कोणत्याही अप्रिय परिस्थितीत नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी मदत करणे हा त्याचा उद्देश होता. मात्र १९६२ च्या चीन युद्धादरम्यान पोलिसांना मदतीची गरज निर्माण झाली होती. तेव्हा ०६ डिसेंबर १९६२ रोजी होमगार्ड संघटनेची पुनर्रचना करण्यात आली. तेव्हापासून होमगार्ड विभाग ६ डिसेंबर रोजी स्थापना दिवस साजरा करतात.(Todays Marathi Headline)

होमगार्ड ही स्वयंसेवी संस्था सुरुवातील मुंबईत आणि नंतर अहमदाबादमध्ये स्थापन झाली. याच संस्थेला कालांतराने होमगार्ड किंवा गृहरक्षक दलाचे स्वरूप प्राप्त झाले. संघटनेच्या स्थापनेनंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री गोविंदवल्लभ पंत यांनी मुंबईच्या भेटीत गृहरक्षक दलाच्या कवायतीचे निरीक्षण केले व त्यांना गृहरक्षक दलाचे स्वरूप आणि कार्य दोन्ही आवडले. त्यांनी दिल्लीला परतल्यावर मुंबईच्या धर्तीवर स्वयंसेवी, शिस्तबद्ध अशा गृहरक्षक दलाची स्थापना अन्य राज्यांमध्येसुद्धा करावी, अशी सूचना संबंधित अधिकारीवर्गाला दिली. त्यानुसार तिची अंमलबजावणी झाली आणि गृहसंरक्षणाच्या नावाखाली न्यू सिव्हिल डिफेन्स ॲक्ट-१९६८ अनुसार त्याची इतर राज्यांतून निर्मिती झाली. (Marathi News)
राज्यातील नागरिकांना जनतेची सेवा करण्याच्या भावनेने प्रेरित करून त्यासाठी काही वेळ आणि प्रयत्नांना चालना देण्यासाठी नगरसेनेअंतर्गत नगरसैनिकांची अर्थातच होमगार्ड्सची निवड केली जाऊ लागली. गृहरक्षक दलात धर्म, भाषा, जात-पात इ. कुठल्याही प्रकारचे भेदभाव न करता समाजातील महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, वकील, व्यापारी, कर्मचारी, कारकून, समाजसेवक, औद्योगिक कामगार, शेतकरी वगैरे लोक स्वयं-प्रेरणेने दाखल होतात.(Top Marathi News)
होमगार्ड्सची भूमिका केवळ आपत्कालीन परिस्थितीपुरती मर्यादित नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना मदत करणे, वाहतूक नियंत्रण, मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गर्दी व्यवस्थापन, निवडणूक काळातील बंदोबस्त, धार्मिक उत्सव, मोर्चे, सभा आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या असंख्य क्षेत्रांमध्ये हे दल अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावते. पूर, भूकंप, आग, अपघात यांसारख्या संकटाच्या वेळी बचाव आणि मदत कार्यात होमगार्ड सर्वात आधी घटनास्थळी पोहोचतात. ग्रामीण भागापासून ते महानगरांपर्यंत, होमगार्ड्सची उपस्थिती नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करते. (Latest Marathi HEadline)
========
Vladimir Putin: पुतिन आणि त्यांचे अभेद्य सुरक्षा पथक !
========
महाराष्ट्रातील गृहरक्षक दलाला स्वतःची ओळख, वेगळेपण व स्थान प्राप्त व्हावे, या उद्देशाने राज्याच्या गृहरक्षक दलाला ध्वज आणि ध्वजचिन्ह प्रदान करण्यात आलय. त्यानुसार लॉरेल फुलांच्या माळेने वेष्टित असे कबुतर हे महाराष्ट्र राज्यातील गृहरक्षक दलाचे ध्वज चिन्ह असून ते फिकट निळ्या रंगाच्या कापडावर मध्यभागी सोनेरी धाग्याने विणलेले आहे. (Top Trending News)
देशभरात ६ डिसेंबरला होमगार्ड स्थापना दिवस साजरा केला जातो. यादिवशी होमगार्ड्सच्या ऑफिसेसमध्ये, मुख्यालयांमध्ये विविध कार्यक्रम होतात. यामध्ये परेड, मुख्य अतिथींना सलामी, मार्च पास्ट आणि पुरस्कार वितरण यांचा समावेश असतो. या दिवशी होमगार्ड्सच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि त्यांच्या सेवांचा गौरव केला जातो. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
