सध्या वर्ल्डकपचा फिवर सर्वत्र दिसून येत आहे. यासाठी क्रिकेटप्रेमी फार उत्सुक आहेत. प्रत्येकजण आपल्या आवडीच्या खेळाडूला यादरम्यान सपोर्ट करत आहेत. चाहत्यांसाठी क्रिकेट एखाद्या सणाप्रमाणेच आहे. हेच कारण आहे की, चाहते आपल्या आवडीच्या क्रिकेटरबद्दल सर्वकाही जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्या फिटनेस ते त्यांची आवड नक्की काय आहे याबद्दल जाणून घेण्यास आतुर असतात. परंतु तुम्हाला माहितेय का, तुमच्या आवडीच्या काही क्रिकेटर्संनी सिनेमांमध्ये सुद्धा काम केले आहे. असे कोणते क्रिकेटर्स आहेत तेच आपण जाणून घेऊयात. (Indian Cricketers)
-सचिन तेंडुलकर
सचिनला जगातील सर्वाश्रेष्ठ क्रिकेटर मानले जाते. सचिनला भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. परंतु तुम्हाला माहितेय का, सचिनने रुपेरी पडद्यावरही काम केले आहे. त्याने ‘सचिन: द बिलियन ड्रिम्स’ मधून डेब्यू केला होता.या सिनेमाचे दिग्दर्शन जेम्स अर्सकिन यांनी केले होते. सचिनने याचा पोस्ट शेअर केला होता आणि तो फार कमी वेळात खुप व्हायरल झाला होता.
-हरभजन सिंह
उत्तम गोलंदाज हरभजन सिंह आपल्या स्पिन गोलंदाजीसठी फार प्रसिद्ध आहे. हरभजन टेस्ट मॅचमध्ये ऑफ स्पिनरद्वारे सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा स्पिनर आहे. याने ‘फ्रेंन्डशिप’सिनेमातून डेब्यू केले होते. या सिनेमाचे दिग्दर्शन जॉन पॉल राज, शाम सुर्याने केले होते. सिनेमा 17 डिसेंबर,2021 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. आयपीएलमध्ये लोकप्रिय होत असताना त्याने सिनेमाक्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्याचा सिनेमा चाहत्यांना फार आवडला होता.
-युवराज सिंह
युवराजसिंह भारतातील दमदार खेळाडू असून त्याने 2020 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध 6 बॉल्समध्ये 6 सिक्स मारत सर्वांची मनं जिंकली होती. या वर्ल्ड रेकॉर्डनंतर युवराजने कधीच मागे वळून पाहिले नाही. युवराजने कँन्सरवर मात करुन हे दाखवून दिले की, केवळ क्रिकेटच्या मैदानातच नव्हे तर खऱ्या आयुष्यात सुद्धा एखाद्या संकटाला ठामपणे कसे सामोरे जायचे. युवराजने सिनेमा ‘मेहंदी शगना दी’ सिनेमात काम केले होते. सिनेमाचे दिग्दर्शन प्रीती सपरू यांनी केले होते. यामध्ये युवराजने बाल कलाकाराची भुमिका साकारली होती. (Indian Cricketers)
-कपिल देव
कपिल देव एक उत्तम ऑल राउंडर खेळाडू आहे. त्यांचे जगभरात अनेक चाहते आहेत. 1983 वर्ल्ड कप दरम्यान जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा कपिल देव भारतीय संघाचे कॅप्टन होते. कपिल देव ‘मुझसे शादी करोगी’ मध्ये झळकले होते. त्यांच्या कमेंट्रीला चाहत्यांना उत्तम दाद दिली होती.
हेही वाचा- खेळाडूसोबत त्यांची जर्सी का रिटायर केली जाते?