Home » ‘रन मशीन’ वसिम जाफर!

‘रन मशीन’ वसिम जाफर!

by Correspondent
0 comment
Wasim Jaffer | K Facts
Share

वसिम जाफर म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर फर्स्ट क्लास क्रिकेट येते आणि रणजी सामने. त्याने रणजी सामन्यात ११००० धावा करून अमोल मुजुमदारला मागे टाकले होते. वसिम जाफरचा जन्म १६ फेब्रुवारी १९७८ मध्ये झाला. २४ फेब्रुवारी २००० मध्ये त्याने पहिला कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. आणि शेवटचा सामना ११ एप्रिल २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच खेळला. त्याने पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना २२ नोव्हेंबर २००६ मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळला तर शेवटचा सामना २९ नोव्हेंबर २००६ मध्ये खेळला. नीट पाहिले तर दोन्ही फॉरमॅट मध्ये पहिला आणि शेवटचा सामना वसिम जफर याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल.

वसिम जाफर याने ३१ कसोटी सामन्यात १९४४ धावा ४८ च्या सरासरीने केल्या. तो फक्त २ एकदिवसीय सामने खेळला. त्या ३१ कसोटी सामन्यांत त्याने २ विकेट्सही घेतल्या. तसेच त्याने २३ टी-२० सामने खेळले, त्यात त्याने २८ च्या सरासरीने ६१६ धावा केल्या. वसिम जाफर याने कसोटी सामन्यात ५ शतके आणि ११ अर्धशतके केली, कसोटी सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या  होती २१२ धावा, एकदिवसीय सामन्यात मात्र तो फारसा प्रभाव टाकू शकला नाही. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ५७ शतके आणि  ९१ अर्धशतके केली. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ३१४ धावा.

Image result for wasim jaffer

वसिम जाफर (Wasim Jaffer) याने कसोटी क्रिकेट मध्ये २७ झेल घेतले तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २९७ झेल घेतले. त्याचं संपूर्ण करिअर पाहिलं तर अस्थिरता दिसून येते.

१९९६ ते २०१५ मुंबई कडून खेळला. २०१५ ते २०२० विदर्भाकडून खेळला. तर २००८ ते २००९ बेंगलोर रॉयल चॅलेंजर्स कडून खेळला. त्याने जून २०२० मध्ये निवृत्ती जाहीर केली. सध्या २०२०-२०२१ मध्ये उत्तराखंडचा कोच म्हणून तो कार्यरत आहे.

मध्यंतरात त्याच्यावर काही आरोप झाले. अर्थात पुढे आणखी काही होतच राहतील, कोणत्या ना कोणत्या खेळाडूला सहन करावेच लागतील. खरे तर स्वतःचे स्थान खेळून टिकवायचे असते पण पुढे अनेक गोष्टी कुणालाही तारक, मारक ठरू शकतात परंतु आपण खेळ बघावा असे माझे स्पष्ट मत आहे. वसिम जाफर याला रन मशीन म्हटले जाते कारण त्याने शेवटची कसोटी सुमारे १३ वर्षे खेळली. पुढे रणजी चालूच राहिली ती ४१ वर्षापर्यंत. ह्यामध्ये त्याची जिद्द आणि स्टॅमिना दिसून येतो. त्याचा पुतण्या अरमान जाफरही तसाच तडाखेबाज आहे.

वसिम जाफरला कोणीही विसरू शकणार नाही. कारण तो खरा खेळाडू आहे, १९००० धावांचा टप्पा पार पाडणे ही सोपी गोष्ट नाही. पुढे कोच म्हणून तो क्रिकेटच्या क्षेत्रात आपले योगदान देत राहीलच ह्यात शंका नाही.

सतीश चाफेकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.