Home » Saina Nehwal: ‘फुलराणीचा डाव अर्ध्यावर मोडला’ सायना नेहवालचा घटस्फोट

Saina Nehwal: ‘फुलराणीचा डाव अर्ध्यावर मोडला’ सायना नेहवालचा घटस्फोट

by Jyotsna Kulkarni
0 comment
Saina Nehwal | International News
Share

आपल्या खेळाने कायमच बॅडमिंटनमध्ये भारताचे नाव जगभरात उंचावणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. सायनाने कायमच बॅडमिंटन खेळताना भारताचा नावलौकिक वाढवला. ती केवळ भारतातील नाही तर जगभरातील टॉप बॅडमिंटन खेळाडूंमध्ये येते. तिचे तिच्या खेळाचे फॅन्स भारतासोबतच जगभरात देखील आहे. अशा या सायना नेहवालने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. ऑलिंपिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालने तिचा पती असणाऱ्या पारुपल्ली कश्यपपासून विभक्त झाल्याची नुकतीच घोषणा केली आहे. तिने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर एका पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. सायनाच्या या पोस्टमुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत. (Marathi NEws)

सायना आणि पारुपल्ली या दोघांचेही डिसेंबर २०१८ मध्ये लग्न झाले होते. सायना हिने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. दरम्यान सानियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हटले आहे की, “कधीकधी आपल्याला आपले आयुष्य वेगवेगळ्या मार्गांवर घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी एकमेकांच्या संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, एकमेकांचा विकास आणि एकमेकांच्या मानसिकरित्या स्वस्थ राहण्याला प्राथमिकता देत आहोत. स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी…आम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांबद्दल मी कायम कृतज्ञ असेल. यावेळी आमच्या खासगी आयुष्याला समजून घेतल्याबद्दल आणि आमच्या भावनांचा आदर राखल्याबद्दल धन्यवाद.” सध्या सायनाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Todays Marathi Headline)

Saina Nehwal

सायना नेहवाल कोण आहे?
सायना नेहवाल भारतातील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहे. तिने तिच्या कारकिर्दीमध्ये देशाचा गौरव उंचावेल अशी अनेकदा कामगिरी केली आहे. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदक जिंकले होते आणि २०१५ मध्ये जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत तिने पहिले स्थान मिळवले होते. ती जगातील नंबर वन शटलर बनणारी पहिली भारतीय महिला खेळाडू म्हणून ओळखली जाते. तर सायनाचा नवरा असलेला पारुपल्ली कश्यप देखील बॅडमिंटन खेळाडू आहे. त्याने २०१४ मध्ये ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि तो जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचला होता. सायना नेहवालने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठून भारतामध्ये या खेळाला नवीन ओळख मिळवून दिली. (Top Marathi News)

पारुपल्ली कश्यपने २०१० मध्ये दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकून प्रसिद्धी मिळवली. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये नीलुका करुणारत्नेला हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठणारा तो पहिला पुरुष बॅडमिंटन खेळाडू ठरला. त्याने २०१४ च्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. ३२ वर्षांमध्ये असे करणारा तो पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू होता. सायना आणि पारुपल्लीची भेट १९९७ मध्ये एका कॅम्पमध्ये झाली होती. हैदराबादमधील पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत दोघांनी करिअरची सुरुवात केली होती आणि तिथूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली होती. (Top Stories)

=============

हे ही वाचा : Dubai : जेव्हा अख्खं दुबई भारतातून operate व्हायचं!

==========

२००४ मध्ये गोपीचंद यांनी हैदराबादमध्ये बॅडमिंटन अकादमी सुरू केली, तेव्हा दोघांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि येथूनच त्यांच्यात जवळीक वाढली. सायना आणि पारुपल्ली यांचे लग्न १४ डिसेंबर २०१८ रोजी झाले. हरियाणातील हिसार येथे जन्मलेली सायना पारुपल्ली कश्यपपेक्षा ३ वर्षांनी लहान आहे. वयाच्या ३० व्या वर्षी सायनानेही राजकारणात प्रवेश केला, सायना २०२० मध्ये भाजप पक्षात सामील झाली. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.