भारतीय सैन्याला जगातील सर्वाधिक शक्तीशाली सैन्यांपैकी एक मानले जाते. जगात भारताचा यामध्ये चौथा क्रमांक लागतो. भारतीय सैन्यातील जवान सदैव आपल्या देशासह नागरिकांचे रक्षण करण्यास तयार असतात. भारतीय सैन्यात अॅक्टिव्ह पर्सनल यांची संख्या जवळजवळ 1325000 आणि रिजर्व पर्सनलची संख्या २१४३००० आहे. ज्या प्रकारे एखादी कंपनी किंवा संस्था विविध रँकच्या आधारावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात त्याचप्रमाणे भारतीय सैन्यात सुद्धा त्याच पद्धतीने विविध पदं दिली जातात. यामध्ये फरक ऐवढाच असतो की, त्यांचा बॅच पाहून तुम्हाला ते कोणत्या पदावर कार्यरत आहेत ते कळू शकते. तर जाणून घेऊयात भारतीय सैन्यातील पदांसह त्यांच्या रँकबद्दल अधिक.(Indian Army Ranks)
भारतीय सैन्यातील पद आणि रँकिंग
फिल्ड मार्शल (Field Marshal)
भारतीय सैन्यात फिल्ड मार्शल हे एक फाइव्ह स्टार रँकिंग असते. सैन्यात मात्र हे पद आता बंद करण्यात आले आहे. तसेच हे आता कोणत्याही नियमित अधिकाऱ्याला दिले जात नाही. मात्र फिल्ड मार्शलचे हे पद एखाद्या अधिकाऱ्याने युद्धात किंवा एखाद्या ऑपरेशनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असेल तर त्याला ते दिले जाते. आतापर्यंत हे रँक फक्त दोनच अधिकाऱ्यांच्या नावावर आहे. ते म्हणजे एम करिअप्पा आणि सॅम मानेकशॉ.
जनरल (General)
अधिकृत रुपात भारतीय सैन्यातील जनरल हे पद सर्वाधिक उच्च रँक आहे. यांना कमांडर-इन-चीफ आणि सैनाध्यक्ष असे सुद्धा म्हटले जाते. सध्या जनरलचा रँक ४ स्टार रँक असतो आणि त्यांच्या वर्दीच्या कॉलरवर ४ स्टार लावलेले दिसून येतात. जनरल यांचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो आणि त्यांचे पद हे कॅबिनेट सेक्रेटरी प्रमाणेच असते.
लेफ्टिनेंट जनरल (Lieutenant General)
लेफ्टिनेंट जनरल हे भारतीय सैन्यातील दुसरे सर्वोच्च पद असतो. जनरल नंतरची रँक लेफ्टिनेंट जनरल असते. जो ३ स्टार ऑफिसर असतो. या रँकसाठी ऑफिसरकडे ३६ वर्षाची कमीशंड सर्विसची योग्यता असणे गरजेचे आहे. भारतीय सैन्यात विविध कमांडसाठी कमांडिग ऑफिसर सुद्धा याच रँक मध्ये येतात. त्याचसोबत सैन्यातील डिप्युटी चीफचे रँक सुद्धा याच अंतर्गत येते.(Indian Army Ranks)
मेजर जनरल (Major General)
लेफ्टिनेंट जनरलनंतरचे अधिकारी मेजर जनरल असतात. मेजर जनरल यांचे पद भारतीय सैन्यातील नेव्हीच्या रियर एडमिरल आणि एअर फोर्सच्या एवीएमच्या रँकिंग समान असते. मेजर जनरल पदावर कमीशंड सर्विसच्या आधारावर नियुक्ती केली जाते.
ब्रिगेडियर (Brigadier)
ब्रिगेडियर मेजर जनरलच्या खालील ही रँक असते. संपूर्ण एक ब्रिगेडला सांभाळण्याची जबाबदारी यांच्यावर असते. त्यांची १ स्टार रँक अधिकारी असतात, ब्रिगेडियरच्या रँकमध्ये प्रमोशन सिलेक्शनच्या आधारवर केले जाते. यासाठी ऑफिसरकडे २५ वर्षांचे कमीशंड सर्विसची योग्यता असणे गरजेचे असते. ब्रिगेडियर यांच्या वर्दीवर तीन स्टार आणि एक अशोक स्तंभ लावण्यात आलेला असतो.

कर्नल (Colonel)
भारतीय सैन्यातील कर्नल यांच्या वर्दीवरील खांद्यावर एक अशोक चिन्ह आणि २ स्टार असतात. सैन्यात थेट कमीशन प्राप्त करणारे अधिकारी जर पर्मनेंट कमीशन प्राप्त करत असतील आणि ते कर्नच्या रँकपर्यंत प्रमोशनच्या माध्यमातून पोहचू शकतात. कर्नल रँकमधअये सिलेक्शनसाठी १५ वर्षांचे कमीशंड सर्विसची योग्यता गरजेची आहे. या रँकच्या प्रमोशनसाठी ऑफिसरला २६ वर्ष वाट पहावी लागते.
लेफ्टिनेंट कर्नल (Lieutenant Colonel)
भारतीय सैन्यातील लेफ्टिनेंट कर्नल यांच्या वर्दीवर एका ५ स्टारच्या मध्ये अशोक चिन्ह असते. भारतीय सैन्यात लेफ्टिनेंट कर्नलच्या पदासाठी अधिकाऱ्यांना ते वरिष्ठ होण्याची पहिली पायरी असल्याचे दर्शवते. ही रँक मिळवण्यासाठी १३ वर्षांची सेवा करणे अनिवार्य असते.
कॅप्टन (Captain)
मेजर यांच्या खालील पद हे कॅप्टन असते. भारतीय सैन्यात मेजर एक महत्वपूर्ण पद आहे. कारण कोणत्याही अधिकाऱ्याला सहा वर्षाच्या कार्यकाळानंतर हे रँक दिले जाते. या रँकच्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर अशोक चिन्ह असते.
लेफ्टिनेंट (Lieutenant)
हे भारतीय सैन्यातील सुरुवाती कमीशंन्ड रँक असते. आयएमए, ओटीए सारख्या अॅकेडमीमध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर जेव्हा तरुण अधिकारी पास होतात तेव्हा ते लेफ्टिनेंट बनतात. त्यानंतर त्यांचे प्रमोशन होते आणि लेफ्टिनेंटच्या वर्दीवर दोन स्टार असतात.
सुबेदार मेजर (Subedar Major)
लेफ्टिनेंटच्या खालील पद जॉइंट कमीशंड ऑफरमध्ये वर्गीकृत केले जाते.जॉइंट कमीशंड अधिकाऱ्यांमध्ये सुबेदार मेजरचे पद सर्वाधिक मोठे असते. सुबेदार मेजर यांच्या वर्दीवर एक अशोक स्तंभासह २ लाल पट्टीच्या मध्ये एक पिवळी पट्टी असते.(Indian Army Ranks)
हे देखील वाचा- ले. जनरल अनिल चौहान यांची सीडीएसच्या पदी नियुक्ती
नायब सुबेदार (Naib Sudebar)
नायब सुबेदार हे पद सुबेदार पदानंतर येते. नायब सुबेदार यांच्या वर्दीवर एक स्टार आणि लाल-पिवळ्या रंगाची पट्टी असते.
हवालदार (Sergeant)
या रँकचे अधिकारी खासकरुन २६ वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त होतात, जर त्यांना या दरम्यान जेसीओ रँकवर प्रमोशन मिळाले नाही तर.
नाइक (Naik)
या अधिकाऱ्यांच्या वर्दीच्या खांद्यांवर दोन वी-शेपच्या पट्ट्या असतात.
लांस नाइक (Lance Naik)
या रँकच्या अधिकाऱ्यांच्या वर्दीच्या बाजूवर १ वी शेपची पट्टी असते.
शिपाई (Soldier)
सैन्यात रॅलीच्या माध्यमातून थेट भरती होणाऱ्या व्यक्तीची तैनाती सुरुवात या रँकपासून होते. नॉन कमीशंड ऑफिसरच्या श्रेणीत हवालदार, नायक आणि लांस नायक असतात. यांच्या निवृत्तीची अधिकाधिक वयाची मर्यादा २६ वर्ष आणि कमीतकमी २२ वर्ष असते.