भारतातील हे एक बेट आहे जेथे जाणे खरंच धोकादायक आहे. सरकारने या बेटावर कोणाला ही जाण्यास बंदी घातली आहे. येथे जाणे म्हणजे जीवजाण्यासारखा आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी येथे एक-दोन परदेशी नागरिक तेथे गेले पण तेथून पुन्हा कधीच परतले नाहीत. केवळ त्यांचा मृतदेह मिळाला. या बेटाचे नाव सेंटिनल बेट आहे. अधिकृत रुपात भारत सरकारने येथे कोणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. (India Secrete Island)
असे सांगितले जात आहे की, अंदमान-निकोबार मधील हे बेट अत्यंत सुंदर आहे. आता तीन वर्षापूर्वी भारत फिरण्यासाठी आलेले अमेरिकन नागरिक तेथे गेले आणि आयलँन्डच्या लोकांनी कथित रुपात त्यांची हत्या केली. येथे सेंटिनेलिस प्रजातीचे आदिवासी राहतात, ज्यांना अगदी तेथे कोणीही गेलेले आवडत नाही. या प्रजातीला अत्यंत धोकादायक मानले जाते.
सेंटिनल आयलँन्डवर जाण्यास का बंदी?
जर तुम्हाला सांगितले की, भारतात असे एक ठिकाण आहे जेथे जाण्यासाठी बंदी आहे. तेथे ना शासकीय अधिकारी जातात ना कोणतेही उद्योगपती, ना सैन्यातील कर्मचारी. हे किंग कॉंन्ग सिनेमातील स्कल आयलँन्ड प्रमाणे आहे, जेथून पुन्हा परतणे अशक्यच आहे. या बेटाचे नाव नॉर्थ सेंटिनल आयलँन्ड आहे. आकाशातून पाहिल्यानंतर हे बेट एखादे सामान्य बेटाप्रमाणे दिसते. अशाप्रकारे एकदम शांत दिसणारे, हिरवेगार आणि सुंदर दिसते. मात्र येथे काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे पर्यटकच नव्हे तर मच्छिमार सुद्धा जाण्याची हिंमत करत नाही.
प्रशांत महासागरच्या नॉर्थ सेंटिनल आयलँन्डवर एक अशी रहस्यमयी आदिवासी जनजाती राहतात ज्यांचे आधुनिक युगाशी काही घेणेदेणे नाही. ना ते कोणत्या बाहेरच्या व्यक्तीच्या संपर्कात येतात आणि ना कोणाशी संपर्क ठेवतात. जेव्हा त्यांचा सामना एखाद्या बाहेरील व्यक्तीशी होतो तेव्हा ते हिंसक होतात आणि घातक हल्ला करतात.
वर्ष २००६ मध्ये काही लोक मच्छिमार चुकून या आयलँन्डवर पोहचले होते. त्यांना काही कळण्यापूर्वी त्यांना आपला जीव गमवावा लागवाला लागतो. या प्रजातीचे लोक आगीचे तीर चालवण्यास तरबेज असल्याचे मानले जातात. त्यासाठी आपल्या सीमाक्षेत्राच्या कमी उंचीवरुन उडणाऱ्या विमानावर सुद्धा या गोळ्यांनी हल्ला करतात.
हे देखील वाचा- उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांची बातच वेगळी….
किती जुने आहे बेट
बंगालच्या खाडीत बसलेले हे बेट भारताचा हिस्सा आहे. मात्र हे नेहमीच अशाच पद्धतीचे रहस्यमय असल्याचे सांगितले जाते. असे मानले जाते की, या बेटावर राहणाऱ्या लोकांचे अस्तित्व ६० हजार वर्षांपूर्वी जुने आहे. मात्र सध्या या प्रजातिची संख्या किती आहे हे अद्याप समोर आलेले नाही. एका अनुमानानुसार, या प्रजातिशी संबंधित लोकांची संख्या १००-२०० पर्यंत असू शकते. (India Secrete Island)
येथील लोकांना बाहेरच्यांनी हस्तक्षेप करणे पसंद नाही
कोणत्याही प्रकारच्या बाहेरच्या लोकांनी येणे त्यांना पसंद नाही. त्याबद्दल कोणालाही पुरेशी माहिती नाही. जशी त्यांची परंपरा, त्यांची भाषा, त्यांचे राहणीमान याबद्दल ही कोणाला माहिती नाही. वर्ष २००४ मध्ये आलेल्या भयंकर त्सुनामीनंतर अंदमान बेट पूर्णपणे उद्धस्त झाले होते. बेट अंदमान बेटांच्या श्रृंखलेचाच हिस्सा आहे, मात्र त्सुनामीचा या जनजातिवर काय प्रभाव पडला हे सुद्धा कोणाला माहिती नाही. त्सुनामी नंतर जेव्हा भारतीय तटरक्षक दलाने तेथे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या लोकांनी हेलिकॉप्टरवर आगीच्या तीरांनी हल्ले केले. त्यानंतर तेथे जाण्याचा प्रयत्न ही करण्यात आला नाही.