Home » Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीचे नशीब फळफळले, IPL नंतर थेट इंग्लंड दौऱ्यासाठी झाली निवड

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीचे नशीब फळफळले, IPL नंतर थेट इंग्लंड दौऱ्यासाठी झाली निवड

by Jyotsna Kulkarni
0 comment
Vaibhav Suryavanshi | International News
Share

जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय अंडर-19 संघाची नुकतीच घोषणा केली. हा दौरा येत्या २४ जून ते २३ जुलै दरम्यान होणार आहे. या दौऱ्यामध्ये भारत आणि इंग्लंड संघाचे 19 वर्षांखालील संघ पाच एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळतील. इंग्लंड दौऱ्यसाठी निवड समितीने आयपीएल स्टार वैभव सूर्यवंशी आणि मराठमोळ्या आयुष म्हात्रे याची निवड केली आहे. विशेष म्हणजे निवड समितीने आयुष म्हात्रेला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. अंडर टीम इंडिया विरुद्ध अंडर 19 टीम इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर २ कसोटी सामने होणार आहेत. (VAibhav Suryavanshi)

अंडर 19 टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात २४ जूनपासून होणार आहे. टीम इंडिया २४ जूनपासून प्रॅक्टीस मॅच (वनडे) खेळणार आहे. त्यानंतर २७ जूनपासून एकदिवलीय मालिकेला सुरुवात होईल. तर ७ जुलै रोजी पाचवा आणि अंतिम एकदिवसीय सामना पार पडेल. त्यानंतर २ सामन्यांच्या मालिकेला १२ जुलैपासून सुरुवात होईल. हे सामने ४ दिवसांचे असणार आहेत. पहिला सामना १२ ते १५ जुलै दरम्यान होईल. तर दुसरा आणि शेलवटचा सामना २० ते २३ जुलै दरम्यान होणार आहे. (Marathi News)

आयुष सद्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळत आहे. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे दोघेही आयपीएल २०२५ मध्ये शानदार खेळ करत आहेत. आयुषने आयपीएल २०२५ च्या ६ सामन्यांमध्ये २०६ धावा केल्या. जिथे त्याची सरासरी ३४.३३ आणि स्ट्राईक रेट १८७.२७ आहे. तर वैभव सूर्यवंशीने ७ सामन्यात २५२ धावा केल्या आणि त्याची सरासरी ३६ आणि स्ट्राईक रेट २०६.५५ होती. या काळात वैभवने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर, वैभव आता इंग्लंडमध्ये भारतासाठी अंडर १९ क्रिकेट जिंकण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. (Top Marathi Headlines)

Vaibhav Suryavanshi

भारताचा १९ वर्षांखालील संघ
आयुष म्हात्रे (कर्णधार), अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, हरवंशसिंग (यष्टीरक्षक), आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, प्रवीण मोहम्मद राणा, प्रवीण राणा, प्रवीण राणा, विहान मल्होत्रा. अनमोलजीत सिंग. स्टँडबाय: नमन पुष्पक, डी दीपेश, वेदांत त्रिवेदी, विकास तिवारी, अलंकृत रापोल (यष्टीरक्षक). (Latest Marathi News)

वैभवने बिहारसाठी पाच प्रथम श्रेणी सामने आणि सहा लिस्ट ए सामने खेळले आहेत, परंतु त्यापैकी कोणत्याही सामन्यात त्याने सेंच्युरी झळकावले नव्हते. मात्र, गेल्या वर्षी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलिया अंडर 19 टीम विरुद्धच्या पहिल्या युवा कसोटीत सूर्यवंशीने शतक ठोकले होते.

चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या जागी मुंबईच्या १७ वर्षीय सलामीवीर आयुष म्हात्रेला संघात सामील केले होते. आयुषने मुंबईसाठी नऊ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. त्याने सात लिस्ट ए सामन्यांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले, ज्यात नागालँडविरुद्ध १८१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. याशिवाय, विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने सौराष्ट्रविरुद्ध १४८ धावा केल्या होत्या. २०२४ मध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील आशिया कपसाठी आयुषचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. त्याने ३ सामन्यांमध्ये ५५ धावा केल्या. (Latest Marathi Headline)

१९ वर्षांखालील संघाची मालिका २४ जूनपासून सुरू होणार असून २३ जुलैपर्यंत चालणार आहे. या काळात, इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघासोबत ५० षटकांचा सराव सामना खेळण्याव्यतिरिक्त, भारताचा १९ वर्षांखालील संघ ५ एकदिवसीय आणि २ बहु-दिवसीय सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे. दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार, २४ जून रोजी ५० षटकांचा सराव सामना खेळणार आहे. तसेच २७ जून ते ७ जुलै दरम्यान ५ एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. पहिला बहुदिवसीय सामना १२ ते १५ जुलै दरम्यान असणार आहे, तर दुसरा बहुदिवसीय सामना २० ते २३ जुलै दरम्यान खेळवणार आहे. (Social News / Updates)

Vaibhav Suryavanshi

==========

हे देखील वाचा :    Admission : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची नवीन तारीख जाहीर

==========

अंडर 19 टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक

24 जून, मंगळवार, 50 षटकांचा सराव सामना

27 जून, शुक्रवार, पहिला एकदिवसीय सामना

30 जून, सोमवार, दुसरा एकदिवसीय सामना

2 जुलै, बुधवार, तिसरा एकदिवसीय सामना

5 जुलै, शनिवार, चौथा एकदिवसीय सामना

7 जुलै, सोमवार, पाचवा एकदिवसीय सामना

कसोटी मालिका

12 ते 15 जुलै, पहिला सामना

20 ते 23 जुलै, दुसरा सामना


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.