वेळेवर झोपणं खूप गरजेचं आहे, पण आजच्या बदलत्या रूटीनमध्ये रात्री उशीरा पर्यंत झोपणं ही फॅशन बनली आहे.मात्र ही सवय योग्य नाही. यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कमी झोप घेणं आरोग्यासाठी हानिकारक आहे हे ही लोकांना माहित आहे, तरीही ते निष्काळजी असतात. रात्री उशिरा पर्यंत जागण्यामागे स्मार्ट फोनचा वापर हे एक प्रमुख कारण आहे, यासोबतच तासनतास इंटरनेटचा अनावश्यक वापर देखील झोपेवर परिणाम करतो.ऑस्ट्रेलियात झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. कमी तासांच्या झोपेमुळे स्मरणशक्तीवर तसेच चयापचय आणि प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलियाचे प्राध्यापक सिओभान बँक्स म्हणतात की पंधरा वर्षांहून अधिक काळ केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की दीर्घकालीन झोपेच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह आणि अगदी कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढतो. तुमची ही झोप रोज अपूर्ण राहते का? तर मग आजचा लेख हा खास तुमच्यासाठी आहे.(Incomplete Sleep)
– सात तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास रक्तदाब, मानसिक ताण, मधुमेह असे आजार होतात, पण सर्वात जास्त धोका हार्ट अटॅकचा असतो. अशा वेळी प्रत्येकाने दररोज किमान सात तास झोप घेणे आवश्यक आहे. ज्या लोकांना रात्री चार ते पाच तास आणि दिवसातून दोन तास अखंड झोप मिळते त्यांना हृदयविकाराची शक्यता कमी असते.
– झोपेच्या कमतरतेमुळे मधुमेहाचा धोका वाढतो, कारण चांगली झोप न घेतल्याने साखरयुक्त आणि जंक फूड खाण्याची इच्छा वाढते. कमी झोपेमुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार होऊ शकतात.
– कमी झोपेमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो, शरीरातील पेशींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी आपण वेळेवर झोपणं गरजेचं आहे.
– कमी झोप घेतल्यास स्मरणशक्ती कमी होणे, उशीरा प्रतिसाद आणि थकवा यासारखे अल्पकालीन नुकसान होण्याची शक्यता असते. बर्याच लोकांना रात्रीच्या वाईट झोपेनंतर या सर्व समस्यांचा अनुभव येतो.(Incomplete Sleep)
============================
हे देखील वाचा: Headache Reasons: तुम्हाला सतत डोकेदुखी होते का? तर मग ‘ही’ असू शकतात त्यामागची कारणे
============================
35 ते 70 वर्षे वयोगटातील 598 लोकांवर केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की 72 टक्के लोकांची हृदये त्यांच्या वयापेक्षा सुमारे 10 ते 15 वर्षे मोठी आहेत. तर यातील 61 टक्के लोकांनी नियमित व्यायामात रस दाखवला नाही. अभ्यासात जे लोक दररोज सात तासांपेक्षा कमी आणि नऊ तासांपेक्षा जास्त झोपतात त्यांना सर्वात धोकादायक परिस्थिती आढळली. 47 टक्के लोकांमध्ये जास्त झोप आढळली तर 53 टक्के लोकांना कमी झोपेसह अपुरी झोपेची समस्या असल्याचे आढळली. त्यामुळे झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करूनही तुम्हाला ही समस्या सतावत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करूँ योग्य ते उपचार घेण्याची गरज आहे.
तुम्हाला ही झोप पूर्ण न होणे, झोपतुन सारखी जाग येणे आशा समस्या असतील तर झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करा. आंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडा किंवा बाथ सॉल्ट घाला. हवं असेल तर संगीत ऐका. यामुळे तुमच्या शरीराला आराम तर मिळेलच, शिवाय शरीरातील वाईट आणि विषारी घटकही बाहेर पडतील. झोपण्यापूर्वी हलका आहार घ्या. त्यात प्रथिने कमी असावीत आणि कार्बोहायड्रेट्स जास्त घ्यावेत. त्यात ज्यूस, बिस्किटे, तृणधान्ये इत्यादींचा समावेश करा.
( डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या अधारावर लिहिण्यात आलेला आहे. त्यातील कोणतेही उपाय करण्याआधी योग्यव्यक्तीचा सल्ला घ्या.)