असे तर गुजरात राज्य मध्ये अनेक मंदिर आणि धार्मिक स्थळ आहेत. सोराष्ट्रची भूमी ही तर संत आणि महंतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. राजकोट येथे असेलेल्या वीरपुर गावात जलाराम बापा यांचे एक मंदिर आहे. या मंदिरात सर्व समाजाच्या लोकांना कोणताही भेदभाव न करता प्रवेश दिला जातो. या मंदिराट संपूर्ण देशातूनच नव्हे तर विदेशातून देखील लाखो भाविक येत असतात. दररोज अनेक भक्त तर दर्शनाला येत असतातच मात्र गुरुवारी यात मोठी वाढ पाहायला मिळते. भाविक मोठ्या श्रद्धेने एखाद्या मंदिरात दान करत असतात, मात्र या मंदिरात कोणत्याही प्रकारचे दान स्वीकारले जात नाही.
जलाराम बापू यांचा जन्म लोहाणा समाज मधील ठक्कर कुल मध्ये झाला. त्यांना लहानपणापासूनच भक्ती आणि संत महंतांची सेवा करायची खूप आवड होती. जलाराम बापा यांनी आपल्या पत्नीचे दागिने विकून अनेक भुकेल्या लोकांची पोटं भरली आहे. त्यांचे गाव वीरपुर येथे असलेल्या अन्नक्षेत्रामध्ये अजूनही सर्व समाजातील लोक आवर्जून भेट देतात. तुम्ही देखील कधी राजकोट गेलात तर आवर्जून येथे भेट द्या आणि इथला प्रसाद देखील नक्की घ्या.
दररोज लाखो भक्त या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात सर्वांना पोट भरून प्रसाद खायला दिला जातो मात्र यासाठी भक्तांकडून कोणत्याही प्रकारचे दान किवा कोणतीही किंमत मोजली जात नाही. असे पाहायला गेलो तर आपल्या या भारत देशात अनेक असे मंदिर आहेत जिथे दर वर्षी कित्येक कोटी रुपयांचे दान येत आहे. या सर्वांच्या तुलनेत हे मंदिर वेगळेच आहे जिथे कोणत्याच प्रकारचे दान स्वीकारले जात नाही. जर तुम्ही या मंदिरात पहिल्यांदा जात असाल आणि त्यात मूर्तीकडे तुम्ही पैसे ठेवले तर तेथे उपस्थित असलेले स्वयंसेवक अत्यंत नम्रतेने तुम्हाला ते परत घेण्याची विनंती करतात. अनेक मंदिरात दानपेटी किंवा एखादी ऑफिस असेल जिथे सर्व भक्त आपल्या श्रद्धेनुसार दान करत असतात. मात्र विरपुरच्या या मंदिरात स्वयंसेवक हे बघयला उभे असतात की कोणी चुकून किवा विसरून आपले पैसे ठेवून जात नाही आहे.
वीरपुर येथील जलाराम मंदिरात फक्त गुजरातमध्येच नाही तर विदेशात देखील प्रसिद्ध आहे. येथून येऊन दर्शन घेतल्यावर देखील तुमचे सर्वच कष्ट दूर होतात असे देखील लोकांची म्हणने आहे. नवस पूर्ण झाल्यावर देखील येथे काहीच दान स्वीकारले जात नाही. आता जर का कोणत्याही दान न घेता या मंदिराचे अन्नक्षेत्र चालत असेल तर कोणत्याही सामान्य व्यक्तीला प्रश्न तर पडणारच आहे. येथे भूतकाळात भाविकांनी एवढे दान केले आहे कि ९ फेब्रुवारी २००० रोजी पासून आजपर्यंत कोणतेही दान स्वीकारले गेले नाही आहे. हा भारतातला एकमेव मंदिर असेल जिथे कोणतेही दान स्वीकारले जात नाही.
२००० साली जलाराम बापाच्या पाचव्या पिढीतील एका व्यक्तीने जाहीर केले होते की या पुढे मंदिरात कोणत्याही प्रकारचे दान स्वीकारले जाणार नाही. या अगोदर मंदिरात पैसे, धान्यसह अनेक वस्तू दानरुपी स्वीकारले जायचे. जेव्हा लोकांनी या बदल प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिले की सध्या एवढे दान आले आहे की येणार्या १०० वर्षापर्यंत कोणतेही प्रकारच्या दानची गरज पडणार नाही. तुम्ही आज देखील वीरपुर येथील जलाराम मंदिरात भेट दिले तर तिथे तुम्हाला एक पण दान पेटी सापडणार नाही
या मंदिरात कोणत्याही प्रकारचे दान स्वीकारले जात नाही
56