रॉयल कॅरेबियनचे नवे क्रुज ‘आयकन ऑफ द सीज’ समुद्रात उतरण्यास तयार आहे. फिनलँन्डच्या दक्षिण पश्चिम तटावर तुर्कू शिपयार्डमध्ये त्याला अंतिम रुप दिले जात आहे. असा दावा केला जातोय की, हे क्रुज जगातील सर्वाधिक मोठे जहाज असणार आहे, जे टायटॅनिकपेक्षा पाच पटींनी विशाल असेल. समुद्रात उतरल्यानंतर त्याला पुरस्कार मिळेल. हे क्रुज जानेवारी २०२४ मध्ये आपल्या पहिल्या प्रवासासाठी निघू शकते. (Icon of the seas)
रॉयल कॅरेबियनच्या वेबसाइटनुसार आयकन ऑफ द सीजवर प्रवास करण्यासाठी तिकिट बुकिंग सुरु झाले आहे. जे फ्लोरिडातील मियामी बीचवरुन रवाना होणार असून कॅरेबियन बेटापर्यंत जाणार आहे. यामध्ये प्रवाशांना चार प्रकारचे पॅकेज दिले जाणार आहेत. याची सुरुवात ९५८ युएस डॉलर आहे. फिनिश शिपयार्डमधअये याचे काम पूर्ण करणाऱ्या शिपबिल्डर कंपनीचे सीईओ टिम मेयर यांनी असा दावा केला आहे की, हे जगातील सर्वाधिक मोठे आणि भव्य जहाज आहे.
आयकन ऑफ द सीजवर २० पेक्षा अधिक डेक आहेत. जे एकत्रित जवळजवळ दहा हजार लोकांना घेऊन जाऊ शकते. जहाजात एक मोठा काचेचा घुमट सुद्धा आहे. या विशाल जहाजाचे बांधकाम २०२१ मध्ये सुरु करण्यात आले होते. यंदाच्या वर्षात जून महिन्यात समुद्रात याचे परिक्षण ही यशस्वी झाले.
तर कोरोनाच्या महासंकटामुळे क्रुज इंडस्ट्रीला मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता असा प्रश्न उपस्थिती केला जात आहे की, या व्यवसायाची स्थिती सुधारेल का? दरम्यान, आता क्रुज कंपन्यांमध्ये प्रवासी तिकिट बुकिंग करत आहेत. क्रुज लाइसन्स इंटरनॅशनल असोसिएशनकडून असा दावा करण्यात आला आहे की, २०२३ मध्ये क्रुजच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ३१.५ मिलियनचा आकडा पार करू शकेल.
आयकॉन ऑफ द सीज आपल्यसोबत २.५० हजार ८०० टनचा भार घेऊन जाऊ शकते. कंपनीने दावा केला आहे की, हे जहाज टायटॅनिकपेक्षा पाच पटींनी मोठे आहे. समुद्रात उतरण्यासह हे आताापर्यंतच रॉयल कॅरेबियनच्या सध्याच्या फ्लॅगशिप वंडर ऑफ द सीजला मागे टाकेल, ज्याच्या नावे जगातील सर्वाधिक मोठे क्रुज शिप असण्याचा रेकॉर्ड दाखल आहे. (Icon of the seas)
हेही वाचा- माया संस्कृतीची रहस्ये…
या क्रुजमध्ये सात स्विमिंग पुल, एक पार्क, शॉपिंग , आइस स्केटिंगची सुविधा दिली गेली आहे. अन्य जहाजांच्या तुलनेत हे भव्य आहे. यामध्ये वॉटरपाक्र, सर्फसाइडची सुद्धा सुविधा आहे. ब्रेमहरहेवन युनिव्हर्सिटी ऑफ एप्लाइड सायन्सने क्रुज मॅनेजमेंटचे प्रोफेसर एलेक्सिस पापथानासिस असे म्हणतात की, जगातील मोठ क्रुज असणे आर्थिक रुपात फार फायदेशीर असते. यामुळे प्रवाशांना सुद्धा फायदा होतो. कारण अधिक प्रवासी येत असल्याने भाडे सुद्धा कमी आकारले जाते.