आपल्या आजूबाजूला एखादा व्यक्ती असा असेल जो खुप झोपते किंवा त्याला प्रत्येक वेळी झोप येते. त्याची खुपजण त्याच्या झोपण्यावरून मस्करी करतात. वेगवेगळ्या नावांनी त्याला चिडवले ही जाते. कधीकधी खुप थकवा आलेला असेल किंवा एखाद्या औषधामुळे आपल्याला झोप येऊ शकते. मात्र चिंता करण्याची स्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा ती भयंकर रुप घेते. (hypersomnia)
बहुतांश जणांना हायपरसोमनिया म्हणजे नक्की काय हे माहिती नसते किंवा कधी नाव ही ऐकले नसेल. आपल्याला नेहमीच सांगितले जाते की, हेल्दी आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. मात्र झोप पूर्ण झाली तरीही पुन्हा झोपेसारखी स्थिती निर्माण होत असेल किंवा बसल्या बसल्या झोप येत असेल तर हा चिंतेचा विषय आहे. या आजारात अशी सुद्धा स्थिती निर्माण होते व्यक्ती बोलताना किंवा वाहन चालवताना झोपतो. अशी काही लक्षणे तुमच्यामध्ये दिसून येत असतील तर लगेच डॉक्टरांना संपर्क साधा. यामागील नक्की कारणे काय आहेत ते पाहूयात.
-अधिक वजन असणे
अत्याधिक वजन असणे काही आजारांना आमंत्रण देते. बहुतांश लोक वजन कमी करण्यासाठी विविध उपाय करतात. काही लोक खुप तास जिममध्ये घाम गाळताना पहायला मिळतात, तर काहीजण वॉक करतात. मात्र असे जरी करत असाल तरीही तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यात बदल केला पाहिजे.
-अल्कोहोलचे सेवन
अत्याधिक अल्कोहोलचे सेवन करणे सुद्धा या आजाराचे एक मोठे कारण आहे. कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ आपल्या शारीरासाठी फायदेशीर नसतात. त्यामुळे वेळीच अल्कोहोलचे सेवन करणे सोडा. हेल्दी लाइफस्टाइल जगण्याचा प्रयत्न करा.
-तणाव
तणाव हा व्यक्तीच्या आरोग्यावर अतिशय वाईटपणे परिणाम करतो. यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही मेडिटेशन किंवा योगा करू शकता. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवू लागेल. तुम्ही तुमच्यामध्ये एक सकारात्मक बदल झाल्याचे जाणवू शकता.
-एनीमिया
काही महिलांना नेहमीच थकल्यासारखे वाटत राहते आणि याच कारणास्तव त्यांना खुप झोप येते. पीरियड्सच्या कारणास्तव महिलांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होऊ लागते. कामामुळे त्या स्वत:कडे लक्ष देत नाहीत. हळूहळू ही समस्या वाढू लागते. जेव्हा हिमग्लोबीनचा स्तर अधिक कमी होऊ लागतो तेव्हा कोणत्याही कामात मन लागत नाही. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. वेळीच उपचार करा. (hypersomnia)
हेही वाचा- ब्रेस्ट कँन्सर पासून बचाव करण्यासाठी WHO ने सांगितल्या टीप्स
-रात्री उशिरापर्यंत जागणे
आजकाल बहुतांश लोक सकाळी नव्हे तर रात्री उशिरापर्यंत जागी राहतात. घरातील असो किंवा ऑफिसचे काम हे उशिरापर्यंत केले जाते. वेळेचा सदुपयोग करण्याच्या नादात असे करणे टाळले पाहिजे. यामुळे तुमच्या डोळ्यांवर ही अत्याधिक ताण पडला जातो. अशातच तुम्ही जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर झोपावे. पुरेशी झोप घ्यावी.