Hydrabad history- नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पडली त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादला भाग्यनगर असे संबोधित केले. त्यांनी असे म्हटले की, सरदार पटेल यांनी भाग्यनगर मध्येच ‘एक भारत’ चा नारा दिला होता. हैदराबादचने नाव भाग्यनगर करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. नरेंद्र मोदी यांनी हैदराबादला भाग्यनगर असे संबोधल्यानंतर २०२० मधील हैदराबाद मधील पालिका निवडणूका आठवतात. जेव्हा भाजप नेत्यांचा विजय झाल्यानंतर हैदराबादचे नाव भाग्यनगर करण्याचे आश्वासन दिले होते. निवडणूकीच्या कॅम्पेन दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा असे म्हटले होते की, असे जरुर केले पाहिजे. दरम्यान, भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. परंतु ते टीआरएसननंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उभा राहिला होता. हैदराबाद आणि भाग्यनगर संदर्भात सुरु असलेला वाद हा काय नवा नाही आहे.
नाव बदलण्याची मागणी करणाऱ्यांकडून असा तर्क लावला जात आहे की, हैदराबादचे नाव यापूर्वी भाग्यनगरच होते. नावासंदर्भात विविध तर्क लावले जातात. त्यामध्ये भाग्यमती महिलेच्या नावाचा सुद्धा उल्लेख आढळतो. लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला आहे की, खरंच भाग्यमती नावाची महिला होती का? तिचा भाग्यनगर संदर्भात काही संबंध होता का? इतिहासातील बहुतांश पुस्तकात हैदराबादच्या नावाचा उल्लेख हा भाग्यनगरच करण्यात आला आहे. तर जाणून घेऊयात यामागील इतिहास काय सांगतो.
हैदराबाद, भाग्यनगर आणि गोलकुंडा
इतिहासकारांनी हैदराबाद संदर्भात खुप काही लिहून ठेवले आहे. त्यांनी लिहिलेल्या गोष्टींमध्ये हैदराबाद व्यतिरिक्त भाग्यनगर नावाचा सुद्धा उल्लेख आहे. बीबीसीच्या एका रिपोर्ट्सनुसार, ब्रिटिश नागरिक ऐरॉन एरो स्मिथ यांनी १८१६ मध्ये हैरदाबादचा एक नकाशा तयार केला होता. त्यामध्ये हैदराबादचे नाव हे मोठ्या अक्षरात लिहिले होते. परंतु त्याच्या खाली भाग्यनगर असे ही त्याने लिहिलेलेल. ऐवढेच नव्हे तर त्याच्या नकाशात गोलकुंडा नावाचा सुद्धा उल्लेख होता. नानीशेट्टी शिरीष यांचे पुस्तक ‘गोलकुंडा, हैदराबाद आणि भाग्यनगर’ मध्ये सुद्धा हाच नकाशा प्रकाशित करण्यात आला आहे.
हे देखील वाचा- आता १८० फूट खाली जाऊन बघता येणार नायगारा धबधब्याचे अप्रतिम सौंदर्य
पहिली कथा- भाग्यलक्ष्मी मंदिर
भाग्यनगर नावामागील एक कथा ही भाग्यलक्ष्मी मंदिरासंबंधित असल्याचे सांगितले जाते. या मंदिरासंदर्भात विविध कथा आहेत. असे सांगितले जाते की. चारमीनारच्या येथे देवी लक्ष्मी आली होती. पण राजाच्या दरबारातील काही जणांनी तिला अडवले आणि राजाची आज्ञा घेण्यासाठी निघून गेले. देवी लक्ष्मी तेथेच उभी राहिली. असे मानले जाते की, देवी लक्ष्मीने तेथेच आपले घर केले आणि कालांतराने तेथील लोकांन मंदिर उभारले. त्याचे नाव भाग्यलक्ष्मी मंदिर असे ठेवण्यात आले. दरम्यान इतिहासकार या कथेला मानत नाहीत. त्यांचे असे म्हणणे आहे की, चारमीनार जवळ सुरुवातीपासून कोणतेही भाग्यलक्ष्मी नावाचे मंदिर नव्हतेच.
बीबीसीने एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोट करत आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, चारमीनार जवळ मंदिर उभारून ३०-३४० वर्ष झाली. त्याआधी तेथे कोणतेही मंदिर नव्हते. जुन्याचा फोटोंमध्ये सुद्धा याची पुष्टी होते. १९४४ मध्ये प्रकाशित हैदराबाद ए सोवनियर मध्ये चारमीनारचा फोटो तर आहे, पण शहाराती अन्य हिंदू मंदिरांचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र भाग्यलक्ष्मी मंदिराचा उल्लेखच नाही आहे.(Hydrabad history)

दुसरी कथा- भागमती किंवा भाग्यमति नावाने शहर
ही कथा १४-१५ व्या शतकासंदर्भातील असल्याचे सांगितले जाते, जेव्हा दक्षिण भारतात गोलकोंडाच्या कुतुबशाहीचा दबदबा होता. या वंशातील चौथा शासक इब्राहिम कुली कुतब शाह आणि त्यांची हिंदू-तेलगू बेगम हिचे नाव भागीरथी होतो. या दोघांचा मुलगा मोहम्मद कुली कुतुब शाह हा पुढील शासक झाला होता. १५ व्या शतकातील प्रसिद्ध शायर यांच्यामध्ये त्यांचे नाव होते. लाइव्हहिस्ट्रीइंडिया यांच्या रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद कुली कुतुब शाह याचे कमी वयातच एक हिंजू बंजारन हिच्यावर प्रेम जडले. तिचे नाव होते भाग्यमति. तिला भागमती असे ही म्हटले जायचे.
भागतमी, गोलकुंडा किल्ल्यापासून थोडे लांब असलेल्या मूसी नदीच्या पलीकडे वसलेल्या लहान गावात राहत होती. ती दिसण्यास अत्यंत सुंदर होती आणि तिच्यावर शाह याने शेकडो शायरी सुद्धा लिहिल्या. मात्र त्यांच्या वडिलांना या दोघांचे नाते मंजून नव्हे, पण मुलाच्या हट्टापुढे त्यांना झुकावे लागले. त्यानंतर भागमतीच्या नावाने शाहने शहराचे नाव भाग्यनगर ठेवले. काही इतिहासकार यावर आपली सहमती दर्शवतात. इतिहासकार नरेंद्र लूथर यांनी १९९२-९३ मध्ये प्रकाशित आपले पुस्तक ‘ऑन द हिस्ट्री ऑफ भाग्यमती’ मध्ये सुद्धा या कथेचे समर्थन केले आहे. तरीही यावरुन ही काही प्रश्न उपस्थितीत केले जातात.
तिसरी कथा- बगिचांचे नगर…बागनगर
अशी ही एक कथा सांगितली जाते की, येथे खुप प्रमाणात बागा असल्याने त्याचे नाव बागनगर होते. दरम्यान अधिकृतपणे त्याची पुष्टी करण्यात आलेली नाही. इतिहासकार हारुन खान शेरवानी यांनी १९६७ मध्ये पहिल्यांदाल ही दलील केली होती. रिपोर्ट्समध्ये जीन बॅप्टिस्टे टेवर्नियर यांच्या लिहिलेल्या पुस्तकाचा ही उल्लेख केला जातो. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, गोलकुंडाचे एक नाव बाग नगर सुद्धा होते. त्यांनी असे ही लिहिले होते की, हे शहर कुली कुतुब शाह यांची एक पत्नी हिच्या इच्छेनुसार तयार करण्यात आले होते. एक अन्य इतिहासकार वी बल यांनी लिहिले की, टेवर्नियर यांची समजून घेण्यास चूक झाली असावी. हारुन खान शेरवानी यांच्या दलील मागे टेवर्नियरच्या संदर्भातीलच आहे. दरम्यान, हैदराबादचे कलेक्टर राहिलेल्या एक अन्य इतिहासकार नरेंद्र लूथर यांनी काही संदर्भासह या तर्काला फेटाळून लावले आहे.(Hydrabad history)
चौथी कथा- एक तर्क Lucky city संदर्भातील
भाग्यनगरला एक फारसी शब्दाचा अनुवाद असल्याचे म्हटले जाते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, हैदराबाद शहर १५९१ मध्ये झाले. १९५६ रोजी याचे नाव फरखुंडा बुनियाद असे ठेवण्यात आले होते. हा एक फारसी शब्द आहे. त्याचा इंग्रजीतील अर्थ काढल्यास तो लकी सिटी असा होतो. म्हणजेच याचा हिंदीतील अर्थ भाग्यनगर. फरखुंडा बुनियादसाठी संस्कृत शब्द भाग्यचा वापर करण्यात येऊ लागला आणि याच प्रकारे संस्कृत-तेलुगू मध्ये भाग्य नगरम प्रचलित झाले.
हैदराबाद हे नाव कसे पडले?
यामागे भागमती कथेचा संदर्भ दिला जातो. वडिलांच्या निधनानंतर मोहम्मद कुली कुतुब शाह गादी सांभाळत होते. आपल्या शासनकाळात त्यांनी काही मोठे निर्णय घेतले. त्यांनी गोलकुंडा येथून कुतुबशाहीची राजधानी हटवण्याचा ही निर्णय घेतला. असे सांगितले जाते की, शाह यांच्या लग्नानंतर भागमती यांनी इस्लामिक धर्म स्विकारला होता आणि त्यांचे नवे नाव ठेवण्यात आले की, हैदर महल. आपली बेगम हैदर महल हिच्या गावाचे नाव बदलून ते भाग्यनगर करण्यात आले होते. अशातच गावासंदर्भातील एक नवे शहर वसले गेले आणि त्याचे नाव सुद्धा आपली बेगम भागमती बदलून हैदर महल ऐवजी हैदराबाद करण्यात आले. त्यानंतर हेच शहर कुतुबशाहीची राजधानी झाली.
