हैदराबादचे नाव देशातील प्रसिद्ध शहारांच्या यादीतील एक आहे. खरंतर हैदराबाद मध्ये देशभरातील लोक चविष्ट फूड्सचा आस्वाद घेण्यासाठी येतात. पण हैदराबादला जाणारी बहुतांश लोक बिर्याणीचा आस्वाद घेणे कधीच विसरत नाहीत. परंतु तुम्हाला हैदराबाद मध्ये शॉपिंग करायची असेल तर काही मार्केट्स आहेत जे तुम्हाला मनपसंद शॉपिंग करण्यास मदत करतील. या मार्केट्समध्ये एक्सप्लोर करताना तुम्हाला अनेक अशा गोष्टी दिसतील त्या तुम्हाला नक्कीच खरेदी कराव्याशा वाटतील.(Hyderabad Shopping Markets)
हैदराबादला मोत्यांचे शहर असे ही म्हटले जाते. ऐतिसाहिक इमारती ते लजीज पक्वान्नला हैदराबादची शान मानले जाते. परंतु हैदराबाद मध्ये राजधानी दिल्ली प्रमाणेच काही प्रसिद्ध मार्केट्स आहेत. जे तुम्हाला तेथील प्रवासाचा आनंद द्विगुणीत करण्यास जरुर मदत करतात. तर हैदराबाद मध्ये शॉपिंगसाठी थांबणे हा बेस्ट ऑप्शन मानला जातो. कारण हैदराबाद मधील लाड मार्केट ते परफ्यूम मार्केट सारख्या काही प्रसिद्ध मार्केट्समध्ये फिरताना तुम्ही कमी किंमतीत अधिक सुंदर वस्तू खरेदी करु शकता.
-लाड मार्केट
हैदराबाद मधील लाड मार्केट हे रंगबेरंगी बांगड्या आणि तोड्यांसाठी प्रसिद्ध आहे. जवळजवळ १०० वर्ष जुन्या असलेल्या या मार्केटमध्ये विविध प्रकारच्या काही बांगड्या आमि तोडे मिळतात जे अगदी स्वस्त किंमतीत उपलब्ध होतात. तर डिझाइनर आणि प्रिंटेड बांगड्यांचे कलेक्शन ही या मार्केटमध्ये तुम्ही खरेदी करु शकता.
-परफ्यूम मार्केट
हैदराबाद मधील प्रसिद्ध इमारत चार मीनार जवळच उत्तम परफ्युम मार्केट आहे. खासकरुन अत्तर खरेदी करणाऱ्यांसाठी हे मार्केट बेस्ट ठरु शकते. परंतु तुम्हाला चंदनाचे तेल ते कस्तूरी, चमेली आणि गुलाबाचा सुगंध असलेले प्युअर परफ्यूम येथे मिळतील. तसेच हैदराबादच्या परफ्यूम मार्केटमध्ये तु्म्हाला महागडे ब्रांन्ड्स ही पहायला मिळतात.(Hyderabad Shopping Markets)
-मोज्जमजाही मार्केट
फ्रेश फ्लॉवर्स आणि फ्रुट्सच्या शॉपिंगसाठी तुम्ही हैदराबाद मधील मोज्जमजाही मार्केटा भेट देऊ शकता. या बाजारात तुम्हाला हैदराबाद मदील प्रसिद्ध दुकान कराची बेकर्स ही दिसते. या व्यतिरिक्त मोज्जमाही मार्केटमध्ये तुम्ही शुद्ध मसाले, एक्सेसरिज आणि ग्रॉसरीची शॉपिंग करु शकता.
हे देखील वाचा- जगातील सर्वाधिक महागडे फूड्स, एका बर्गरची किंमत ४.५ लाख रुपये
-अँन्टिक मार्केट
हैदराबाद मधील अँन्टीक मार्केट प्रत्येक गुरुवारी लागते. या मार्केटमध्ये तुम्ही होम डेकोरेशन ते सुंदर फर्नीचर, किचन अप्लाएंसेस आणि होम अप्लाएंसेस अत्यंत कमी किंमतीत खरेदी करु शकता. त्याचसोबत क्रॉकरी सेट आणि आलिशान झुंबर ही खरेदी करण्यासाठी हे मार्केट एक्सप्लोर करण्यास विसरु नका.