Home » इथे महिला ६५ व्या वर्षीदेखील मुलांना जन्म देऊ शकतात!!

इथे महिला ६५ व्या वर्षीदेखील मुलांना जन्म देऊ शकतात!!

by Team Gajawaja
0 comment
Hunza Valley
Share

चिरतरुण राहणं सगळ्यांनाच आवडतं. सगळ्यांना वाटतं आपल्याला अमृतासारखी एखादी गोष्ट मिळावी अन हे तारुण्य सदैव कायम राहावं. परंतु ह्या सगळ्या वाटण्याच्या गोष्टी झाल्या. जन्म अन मृत्यूच चक्र कायम सुरु राहत. अलीकडील काळातील बदललेल्या जीवनशैलीमुळे आयुष्य अगदी क्षणांचं होऊन गेलंय. तारुण्य झर्रकन निघून जात अन भरपूर जगण्याची कायम तरुण राहण्याची आशा ही आशाच राहते.
पण चिरतरुण राहण्याचं लांबच लांब आयुष्य जगण्याचं वरदान पृथ्वीवरील काही लोकांना लाभलं आहे. ही भाग्यवान लोकं म्हणजे हुंजा घाटीतील रहिवाशी! (Hunza Valley)

पृथ्वीवरील सर्वात आनंदी अन निरोगी लोक

हुंजा घाटीतील (Hunza Valley) लोक सरासरी १२० ते १३० वर्षे जगतात. येथील महिला वयाच्या ८० व्या वर्षीदेखील ३० वर्षांच्या तरुणी वाटतात. वयाच्या नव्वदीमध्ये देखील येथील पुरुष पिता बनू शकतात आणि महिला ६५ व्या वर्षीदेखील मुलांना जन्म देऊ शकतात. या घाटीतील महिला जगातील सर्वात सुंदर महिला मानल्या जातात. येथील लोकांना कधीच कॅन्सर, उल्सर यांसारखे जीवघेणे आजार होत नाहीत. पृथ्वीवरील सर्वात आनंदी अन निरोगी लोक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं.

हुंजा घाटी अन तेथील रहिवाशी

हुंजा घाटी (Hunza Valley) पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगित-बलतिस्तान भागातील हुंजा नगर जिल्ह्यातील एक घाटी आहे. येथे राहणारे लोक प्रामुख्याने बुरुशास्की भाषा बोलतात. त्यांना बुरुशो जमात म्हणून देखील ओळखले जाते. येथील साक्षरतेचा दर ९५% आहे. येथील लोक हे सिकंदरच्या सेनेचे वंशज मानले जातात.

हुंजा घाटीतील लोकांच्या तारुण्याचे अन निरोगी जीवनाचे रहस्य

हुंजा घाटीतील (Hunza Valley) लोकांच्या निरोगी आणि दीर्घ आयुष्याचे रहस्य त्यांच्या जीवनशैलीमध्ये सापडते. हे लोक सकाळी पाच वाजता उठतात. सायकल किंवा मोटारीने फिरण्याऐवजी पायी फिरण्याला हे लोक प्राधान्य देतात त्यामुळे त्याचं दिवसाला पाच ते दहा किलोमीटर पायी चालणं होतं . जगापासून अलिप्त आणि उंचावर राहत असल्यामुळे त्यांना अत्यंत उच्च दर्जाची स्वच्छ हवा मिळते ज्यात पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न यांसारखे जीवनावश्यक तत्वे त्यांना सहज मिळतात. पालेभाज्या, फळे अन कमी प्रोटीन असणाऱ्या घटकांचा समावेश प्रामुख्याने त्यांच्या आहारात असतो. हे सगळे घटक हुंजा घाटीतील लोकांचे आयुष्य वाढवण्याला पूरक ठरतात.

========

हे देखील वाचा : ऐरावतेश्वर मंदिरातील संगीतमय पाय-यांचे रहस्य…

========

संशोधन अन रहस्य उलगडण्याचे प्रयत्न

हुंजा घाटीतील (Hunza Valley) लोकांच्या आनंदी आणि निरोगी जीवनाचे रहस्य जाणून घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. डॉ. रॉबर्ट मॅक्रीसन कित्येक दिवस हुंजा घाटीतील लोकांसोबत राहिले. या वास्तव्यादरम्यान कॅन्सर, अल्सर यांसारख्या आजाराचा एकही रुग्ण त्यांना तिथे आढळून आला नाही.
डॉ. हेनरी कोयंडा यांनी हुंजा घाटीतील लोक पिण्यासाठी, अंघोळीसाठी जे पाणी वापरतात त्याचे संशोधन केले. हिमालयातील बर्फापासून मिळणारं हे पाणी जीवनसत्वांनी भरपूर असतं. यामधील तत्वे या लोकांचे आरोग्य टिकवून ठेवतात.

पर्यटन अन पुस्तके

निसर्गसौंदर्याने नटलेल्या या घाटीला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. स्थानिक लोक पर्यटकांचे अतिशय प्रेमाने स्वागत करतात. हुंजा घाटी (Hunza Valley) अन येथील लोकांच्या जीवनात डोकावून बघणारी अनेक पुस्तके आहेत. त्यामध्ये ‘द हेल्दी हुंजाज’ आणि ‘द लॉस्ट किंगडम ऑफ द हिमालयाज’ यांसारख्या पुस्तकांची नावे घेता येतील.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.