सहसा आपण अशा कथा आणि किस्से ऐकत आलो आहोत, ज्यात सांगितले जाते की एखादी व्यक्ती किंवा प्राणी दगडात रूपांतरित झाले. तुम्हाला ही फक्त गोष्ट वाटत असेल, मात्र ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. इटलीमध्ये एक प्राचीन शहर आहे, जिथे अशी घटना घडली आहे. माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत, तिथे राहणारे सर्वजण दगड बनले होते. त्यांचे मृतदेह आजही या शहरात सापडतात. त्यांना पाहून ही मानव नसून, दगडाची मूर्ती असल्याचेच भासते. परंतु जेव्हा लोकांना यामागील सत्य समजले, तेव्हा ते सुन्न झाले. (People of Stone)
या शहराचे नाव पॉम्पेई आहे, जे १९४० वर्षांपूर्वी स्थायिक झाले होते. १९७९ मध्ये येथे एक भयानक घटना घडली. ज्यानंतर संपूर्ण शहर एका झटक्यात उद्ध्वस्त झाले. शास्त्रज्ञांना या ठिकाणाहून असे अनेक पुरावे सापडले आहेत, ज्याच्या आधारे ते म्हणतात की त्यावेळी येथे क्वचितच एखादा माणूस वाचला असता. (People of Stone)

पॉम्पेई शहर १७० एकरमध्ये पसरलेले आहे. येथे असलेल्या अवशेषांच्या आधारे असे मानले जाते की, या शहरात सुमारे ११ हजार ते १५ हजार लोक राहत असतील. येथे काही वर्षांच्या उत्खननात पुरातत्व विभागाला घोड्याचे शव व त्याचे चिलखत सापडले, जे दगडाचे बनलेले होते. हा प्रकार पाहिल्यानंतर पुरातत्व विभाग हैराण झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता, हा सर्व प्रकार ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाल्याचे समोर आले. (People of Stone)
असे म्हटले जाते की पॉम्पेईजवळ नेपल्सच्या उपसागरात माउंट व्हेसुव्हियस होता, ज्याचा अचानक उद्रेक झाला. या घटनेनंतर हे शहर ओसाड झाले. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तेव्हा शहरावर लावाचा पाऊस पडू लागला आणि प्रत्येकजण मरण पावला. काही दिवसांनी जेव्हा हा लावा शांत झाला आणि सर्वकाही सामान्य झाले, तेव्हा सर्वांची शरीरे घनरूप झाली होती. या मृतदेहांमध्ये दगडाच्या धातूसहित सर्वकाही आढळून आले. (People of Stone)

आता तुम्हाला वाटत असेल की, ही घटना घडण्यापूर्वी ते लोक पळून का गेले नाही? पण लोक पळून जाण्याअगोदरच ज्वालामुखीतील लावा तिथे पोहचला. त्यामुळे शहराचा परिसर इतका तापला, की लोकांचे रक्त उकळू लागले आणि डोक्याच्या कवटीचा स्फोट झाला. या वेदनादायक घटनेमुळे लोक जागीच मरण पावले. नंतर तापमानात घट झाल्यामुळे लाव्हा घनरूपात आला, तेव्हा मानवी शरीरही दगडाचे झाले होते. (People of Stone)
हे देखील वाचा: काय सांगता! मृत्यूनंतर झाडात बदललं जातं मूल
पॉम्पेई व्यतिरिक्त, ज्वालामुखीने हर्क्युलेनियम नावाचे आणखी एक लहान शहर नष्ट केले. असे म्हटले जाते, की जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा सुमारे ३०० लोक आपला जीव वाचवण्यासाठी बोटहाऊसमध्ये घुसले. परंतु उष्णतेमुळे आणि लाव्हामुळे त्यांचा भयानक मृत्यू झाला. १९८० मध्ये येथे त्यांचे दगडी मृतदेह सापडले होते. त्याच वेळी, पॉम्पेई आणि हर्क्युलेनियम या दोन्हींचा समावेश सध्या युनेस्कोच्या हेरिटेज यादीत आहे. (People of Stone)