उन्हाळ्यात थंडगार आईस्क्रीम खाण्याची मजाच काही वेगळी असते. पण खासकरून थंड कुल्फीची चव अनेकांना आवडते. तसे तर स्वादिष्ट कुल्फी बाजारात सहज मिळते. पण तुमची इच्छा असेल, तर तुम्ही तुमच्या घरी देखील कुल्फी तयार करू शकता. कुल्फी बनवण्यासाठी जास्त साहित्यही लागत नाही आणि ती झटपट तयार होते. कुल्फीचा (kesar kulfi) फ्लेवरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता. चला तर मग जाणून घेऊया की, काय आहे केसर कुल्फी बनवण्याची रेसिपी.
केसर कुल्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
केसर कुल्फी (kesar kulfi) बनवण्यासाठी तुम्हाला दोन वाट्या दूध, एक वाटी कंडेन्स्ड मिल्क (हवे असल्यास कंडेन्स्ड मिल्क तुम्ही घरी बनवून ठेऊ शकता), दोन चमचे मक्याचे पीठ, एक चमचा वेलची पावडर, दोन चमचे बदामाचे कापलेले तुकडे, आठ ते दहा काजूचे बारीक तुकडे, दोन-तीन ठेचलेल्या वेलची आणि थोडे केसर लागेल.
=====
हे देखील वाचा – उन्हाळ्यात ताक सेवन करणे ठरेल फायदेशीर, पण वाढू शकतात ‘अशा’ लोकांच्या समस्या!
=====
केसर कुल्फी बनवायची प्रक्रिया
सर्व प्रथम गॅसवर एक पातेले ठेवून, त्यात दूध उकळून घ्या. दुधाला उकळी आल्यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क टाका. दोन्ही नीट मिसळा आणि मंद आचेवर शिजवून घ्या. (kesar kulfi) आता त्यात वेलची ठेचून टाका. चमच्याने नीट ढवळून उकळी येईपर्यंत शिजवा.
जेव्हा हे दूध चांगले उकळून घट्ट होईल, तेव्हा त्यात काजू आणि बदामाचे तुकडे टाका. हे दूध मंद आचेवर शिजवून घ्या. आता एक चमचाने उकळलेल्या दुधात थोडे केशर आणि वेलची पूड टाका आणि चांगले मिक्स करा. त्याच्यासोबतच मक्याचे पीठही घाला. आता हे मिश्रण असलेले दूध चांगले उकळून घ्या.(kesar kulfi)
मक्याचे पीठ आणि केशर (kesar kulfi) टाकताच दूध घट्ट होऊ लागेल. ते झटकन ढवळून घ्या, जेणेकरून दुधात गुठळ्या होणार नाहीत. कुल्फीचे हे मिश्रण गॅसवरून काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. सामान्य तापमानावर आल्यावर हे मिश्रण कुल्फीच्या साच्यात टाका. हे साचे सात ते आठ तास फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी सोडा. व्यवस्थित घट्ट झाल्यावर कुल्फीची काडी त्या साच्यात टाका आणि हळूहळू सर्व कुल्फी बाहेर काढा. आता ती सर्व्ह करा आणि थंड कुल्फीचा आनंद घ्या.