साधारणतः फेब्रुवारीच्या मध्यानंतर चाहूल लागते ती उन्हाळ्याची! उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. घामामुळे त्वचा तेलकट व चिकट होते. तसेच उन्हामुळे त्वचा काळवंडून निस्तेज होते. यासाठी भरपूर पाणी पिणे, उन्हापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी टोपी किंवा स्कार्प आणि सनकोट वापरणे, यासारख्या गोष्टींसह काळवंडलेल्या त्वचेला सतेज करण्यासाठी काही फेस पॅकचा वापरही आवर्जून करा. (Homemade Face Pack)
१. मँगो फेस पॅक
उन्हाळा म्हणजे आंब्याचा मौसम. आंबा सगळ्यांच्या आवडीचं फळ आहे. सर्वांचा हा आवडता आंबा त्वचेसाठीही उपयुक्त आहे. १ चमचा आंब्याचा गर, १ चमचा मध, एक चमचा तांदळाचे पीठ आणि एक चमचा दूध एकत्र करून चेहरा आणि मानेवर लावा. १० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. त्वचा मऊ मुलायम होईल. (Homemade Face Pack)
२. पपई फेस पॅक
पपईमध्ये व्हिटॅमिन A आणि C असते. तसंच, यामध्ये असणाऱ्या पॅपेन नावाच्या विशेष एन्झाइममुळे त्वचेवरील काळे डाग कमी होऊन त्वचा मऊ व सतेज दिसते. पिकलेली पपई कुस्करून त्याचा गर चेहरा आणि मानेवर २० ते २५ मिनिटे लावून ठेवा. त्यांनतर चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवा. त्वचा काळवंडलेली, कोरडी आणि निस्तेज असेल तर नियमितपणे हा फेस पॅक वापरा.
२. कोरफड आणि ग्लिसरीन पॅक
कोरफड जेल आणि ग्लिसरीन मिसळून हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावून १५ ते २० मिनिटांनी गार पाण्याने धुवा. रोजच्या धावपळीत हा फेस पॅक वापरणं सहज शक्य आहे. यामुळे त्वचेला ‘इंस्टंट ग्लो’ मिळेल. (Face Pack)
४. मुलतानी माती व दह्याचा पॅक
उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते. यामुळे त्वचेवर धूळ चिकटून राहून मुरुम पुटकुळ्या येऊ शकतात. हे टाळण्यासाठी १ चमचा मुलतानी माती, १ चमचा बेसन आणि १ चमचा दही एकत्र करून चेहरा आणि मानेवर १५ ते २० मिनिटं लावून ठेवा. यामुळे काळवंडलेला चेहरा उजळतो.(Face Pack)
५. बेसन फेसपॅक
बेसन त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे. यामुळे त्वचा उजळते. १ चमचा बेसन, पाव चमचा आणि हळद आणि दूध एकत्र करून चेहरा आणि मानेवर १५ ते २० मिनिटं ठेवा. यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ दुवा. यामुळे चेहऱ्याचे नैसर्गिकरित्या स्क्रबिंग होते.(Face Pack)
====
हे देखील वाचा: ‘या’ नैसर्गिक गोष्टीच्या साहाय्याने करा बद्धकोष्टता आणि अपचनावर मात!
====
६. गाजर आणि मध पॅक
२-३ चमचे उकडलेल्या गाजराचा गर, चिमूटभर हळद, अर्धा चमचा संत्र्याची पावडर आणि २ ते ३ चमचे मध एकत्र करून चेहरा व मानेला लावून १५ मिनिटांनी चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा तजेलदार होते. सेन्सिटिव्ह त्वचेसाठी हा फेस पॅक अतिशय उत्तम आहे.
७. हळद आणि लिबू मास्क
हळद आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असते. हळदीमुळे रक्त शुद्ध होत. हळदीमध्ये असलेल्या ‘अँटी बॅक्टेरियल गुणधर्मामुळे’ ती त्वचेसाठीही वरदान आहे. ३ मोठे चमचे लिंबाचा रस, १ मोठा चमचा हळद एकत्र करून त्याचा लेप चेहरा व मानेवर १५ मिनिटे लावा आणि नंतर पाण्याने गार पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहरा स्वच्छ होऊन त्वचेवरचे काळे डाग दूर होतील. जर त्वचा कोरडी असेल तर रात्री झोपताना खोबरेल अथवा बदाम तेलाने चेहऱ्याला हलक्या हाताने तेल जिरेपर्यंत मसाज करा.(Face Pack)
====
हे देखील वाचा: घरी बसून जाणून घ्या तुम्ही रोगी आहात की निरोगी! करा फक्त ‘या’ तीन गोष्टी…
====
कोणतेही फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा आणि मान चांगल्या फेसवॉशने स्वच्छ करून घेणं आवश्यक आहे. तसेच लावून झाल्यावरही चेहरा आणि गार पाण्याने स्वच्छ धुवून स्वच्छ टॉवेलने पुसून घ्यावा. यानंतर शक्यतो तासभर कोणत्याही केमिकलचा वापर त्वचेवर करू नये. त्वचा कोरडी असेल तर बदाम, अक्रोड किंवा खोबरेल तेलाने हलक्या हाताने मालिश करावी. (Homemade Face Pack)
(टीप: वरील लेख हा केवळ माहिती म्हणून लिहिलेला आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही उत्तम)