हिवाळा हा जेवढा थंडीसाठी ओळखला जातो तेवढाच तो ओळखला जातो लाल चुटुक गोड अशा गाजरांसाठी. हिवाळा आणि गाजर हे भन्नाट कॉम्बिनेश आहे. हिवाळ्याची चाहूल लागली की, लगेच बाजारात लाल लाल गाजर आपले लक्ष वेधून घेतात. आता गाजर म्हटले की, सगळ्यांच्या डोक्यात सर्वात आधी येते तो म्हणजे, गाजराचा हलवा. गाजराचा हलवा आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. गाजर बाजरात येऊ लागले की, घरामध्ये हलवा करण्याची मागणी सुरु होते. काही घरांमध्ये या गाजराच्या हलव्याची आपलीच एक परंपरागत रेसिपी असते. मात्र आता आपण सोशल मीडियावर विविध प्रकारच्या गाजराच्या हलव्याच्या एकापेक्षा एक मस्त आणि चविष्ट रेसिपी बघतो. आज आपण याच हलव्याच्या विविध पद्धतीच्या गाजराच्या हलव्याच्या रेसिपी पाहणार जाणून घेऊया. (Gajar Halwa)
पद्धत १
साहित्य :
गाजर, साखर, मेवा, दूध, आवडीनुसार सुकामेवा
कृती
सर्वात आधी गाजरांची साल काढून ते स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर गाजर किसून घ्या. एका कढईत तूप गरम करा, त्यामध्ये किसलेले गाजर टाका आणि काही वेळ शिजवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये साखर, दूध एकत्र करा. साखर, दूध घातल्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करा. सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर मंद आचेवर काही वेळासाठी शिजू द्या. मिश्रण काहीवेळ शिजल्यानंतर त्यात सुकामेवा घाला. यात तुम्ही आवडत असल्यास दुधाची साय देखील घालू शकता. (Todays Marathi Headline)
______________________________________________________________________________________________________________________________________

पद्धत २
साहित्य
८-१० मध्यम आकाराचे किसलेले गाजर, ३ टेबलस्पून तूप, १/४ टीस्पून वेलची पावडर, ३/४ कप साखर, १ वाटी दूध, अर्धी वाटी खवा, आवडणारे ड्रायफ्रुटस
कृती
सर्व प्रथम एक पॅन घ्या, त्यात तूप टाकून गरम होऊ द्या. यानंतर यामध्ये किसलेले गाजर टाका आणि मिक्स करून घ्या. १ मिनिटे झाकून ठेवल्यानंतर पुन्हा ते मिक्स करून घ्या. आता त्यात वेलची पावडर घालून मिक्स करा. आता साखर घालून मिक्स करा. साखर टाकल्यामुळे हलवा थोडा ओलसर होईल. झाकण ठेवून दोन मिनिटे शिजवा. यानंतर यामध्ये दूध टाका. बारीक खवा देखील टाका. दूध टाकल्यानंतर मिश्रण ढवळून घ्या, आणि दोन ते अडीच मिनिटे शिजवा. त्यानंतर आवडीचे ड्रायफ्रुटस टाका. (Top Trending News)
______________________________________________________________________________________________________________________________________
=========
Millets : विंटर स्पेशल बाजरीच्या चविष्ट रेसिपी
Winter : चविष्ट आणि चटपटीत हिवाळा स्पेशल लोणच्यांच्या रेसिपी
=========
पद्धत ३
साहित्य:
दूध – १ लिटर, गाजर – १ किलो, वेलची पूड, तूप – १ टेबलस्पून, बीटरूट – अर्धा तुकडा, साखर – १ कप, मीठ चिमूटभर, तूप – २ टेबलस्पून, ड्राय फ्रूट्स
कृती:
सर्वप्रथम एका भांड्यात दूध मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवा आणि ते अर्धे होईपर्यंत उकळवा. आता सर्व गाजर नीट धुवून सोलून घ्या. नंतर मध्यम आकारात कापून घ्या. गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात १ टेबलस्पून तूप घाला. नंतर गाजराचे तुकडे, बीटरूट आणि वेलची घालून २ मिनिटे परतून घ्या. नंतर अर्धी साखर, थोडे दूध आणि मीठ घालून घ्या. आता गाजराचे, बीटचे तुकडे कुकरमध्ये टाका आणि कुकरचे झाकण बंद करा आणि २ शिट्ट्या काढा. नंतर झाकण उघडून गाजर दाबून मॅश करा. यानंतर, त्यात आणखी थोडे दूध आणि साखर घालून मंद आचेवर चांगले शिजवा, जोपर्यंत हलवा घट्ट होत नाही आणि कोरडा जाणवत नाही. २ चमचे तुपात ड्राय फ्रुट्स तळून घ्या आणि या हलव्यात घालून मिक्स करा. झटपट गाजर हलवा तयार. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
