Home » Millets : विंटर स्पेशल बाजरीच्या चविष्ट रेसिपी

Millets : विंटर स्पेशल बाजरीच्या चविष्ट रेसिपी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Millets
Share

थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला ऊब मिळण्यासाठी आणि शरीर गरम ठेवण्यासाठी उष्ण गुणधर्म असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. हे उष्ण पदार्थ आपल्याला आतून गरम ठेवण्याचे आणि थंडीपासून वाचवण्याचे काम करतात. या उष्ण पदार्थांमध्ये सर्वात आधी नाव येते ते बाजरीचे. बाजरी हे एक धान्य असून अतिशय पौष्टिक आणि आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक समजले जाते. बाजरी म्हटले की, डोळ्यासमोर येते ती भाकरी. बाजरी पासून प्रामुख्याने भाकरीच बनवली जाते. पण हिवाळ्यामध्ये याच बाजरीपासून अनेक नानाविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवले जातात. यातल्याच काही पदार्थच्या रेसिपी आज आपण पाहूया. (Winter Special)

बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्ब्स, प्रोटीन, लोह, झिंक, फायबर आणि अमिनो अ‍ॅसिडसारखे पोषक तत्व आढळतात. याशिवाय बाजरीमध्ये राबोफ्लेविन, फॉलिक अ‍ॅसिड आणि बिटा कॅरोटिन असतात. आपले आरोग्य चांगले राहावे वजन वाढू नये यासाठी अनेकदा बाजरीची भाकरी खाल्ली जाते. पोट आणि आतड्यांच्या उत्तम आरोग्यासाठी बाजरी उत्तम आहे. या बाजरीचे सेवन केल्यास अ‍ॅसिडीटीपासून लवकर सुटका मिळते. तसेच बद्धकोष्ठतेची तक्रार देखील दूर होते. यामुळे कोलेस्ट्रॉलदेखील नियंत्रणात राहाते आणि हृदय अधिक चांगले राहण्यास मदत मिळते. (Marathi)

बाजरीची खिचडी
साहित्य
१/२ कप बाजरी, १ मूठ तांदूळ, १ मूठ, मूग डाळ, हिंग, तूप, जिरे, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ

कृती
सर्वात आधी बाजरी स्वच्छ करून हलकीशी बारीक करून घ्यावी. आता बाजरी ५-६ तास पाण्यात भिजत ठेवावी. तसेच पाणी काढून टाकल्यानंतर मिक्सरमध्ये एकदाच फिरवा. आता कुकरमध्ये बाजरी, मूग डाळ, तांदूळ आणि मीठ आणि हळद घालून गॅसवर ठेवावे. कुकरमध्ये दोन वाट्या पाणी टाकून खिचडी ३ – ४ शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या. कढईत तूप गरम करून खिचडीसाठी फोडणी तयार करावी. तूप गरम झाल्यावर त्यात हिंग व जिरे घालावे. आता त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी. आता तयार केलेला फोडणी खिचडीवर घालावी. तर चला तयार आहे आपली बाजरीची खिचडी रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा. (Todays Marathi Headline)

Millets

बाजरीचा उपमा
आपण रव्याचा उपमा खातोच. पण बाजरीचा उपमाही अत्यंच चविष्ट लागतो आणि आरोग्यासाठी उत्कृष्ट ठरतो. बाजरी रात्रभर पाण्यात भिजवा आणि मग सकाळी धुऊन घ्या. एका पॅनमध्ये तूप, मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता घाला, मिरचीचे तुकडे आणि शेंगदाणे घालून परता. त्यानंतर त्यात बाजरी घाला आणि शिजवून घ्या. वरून दुप्पट पाणी घाला, कोथिंबीर, मीठ घालून मिक्स करा आणि पुन्हा झाकण घालून शिजवा. उपम्याच्या पद्धतीप्रमाणे केलेला बाजरीचा उपमा अत्यंत चांगला असून वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरतो. (Marathi Latest News)

बाजरीची उकड
साहित्य
‎एक वाटी बाजरी घ्यायची. ती भाजून आणि त्याला बारीक दळून घ्यायचं. मिक्सरमधून काढले तरी चालेल. मीठ, तिखट, हळद, जिरे, मोहरी, तिळ, लसूण आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर एवढे साहित्य लागेल.

कृती
‎सगळ्यात पहिले गॅसवर कुकर ठेवायचा. त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचे. तेल गरम झाले की जिरे, मोहरी टाकायचे. जिरे, मोहरी तडतडली की त्यामध्ये लसूण टाकायचा. लसूण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर गरम पाणी टाकायचे. हे एका वाटीला दोन वाट्या पाणी असे प्रमाण घ्यायचे. गरम पाणी टाकल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद, दोन चमचे तिखट, तिळ टाकून घ्यायचे. याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर बारीक करून घेतलेली बाजरी त्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करायचे. त्यात गाठी राहता कामा नये. फेटून झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी कोथिंबीर टाकायची आणि कुकर वरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या मध्यम आचेवरती. (Top Trending News)

=========

Winter : चविष्ट आणि चटपटीत हिवाळा स्पेशल लोणच्यांच्या रेसिपी

=========

बाजरीचा हलवा
साहित्य
एक कप बाजरीचे पीठ, अर्धा कप तूप, चवीनुसार गूळ, पाणी किंवा दूध आवश्यकतेनुसार, अर्धा चमचा वेलची पावडर आणि चिरलेले बदाम, काजू आणि पिस्ता

कृती
आधी तुपात बाजरीचे पीठ घाला आणि मंद आचेवर भाजून घ्यावे. त्यातून सुगंध येऊ लागला आणि सोनेरी रंग झाला की, पीठ चांगले भाजले गेले असे समजावे. पीठ भाजून झाल्यावर त्यात हळूहळू गरम पाणी घालावे आणि सतत ढवळत राहा. पाण्याऐवजी गरम दूध देखील वापरल्यास चालेल. दुधामुळे चव अधिक चांगली येईल. आता हलव्यामध्ये गूळ घाला. गरम हलव्यामध्ये गूळ लगेच वितळतो. हलवा घट्ट होऊ लागला  की, वेलची पावडर घालावी. हलव्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालावे आणि त्यावर एक चमचा तूप घालावे. स्वादिष्ट हलवा तयार. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.