Home » Complaint against Builder: बिल्डरविरुद्ध ग्राहक मंचात तक्रार कशी दाखल कराल?

Complaint against Builder: बिल्डरविरुद्ध ग्राहक मंचात तक्रार कशी दाखल कराल?

by Team Gajawaja
0 comment
Complaint against Builder
Share

सर्वसामान्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न म्हणजे स्वतःचं घर. आयुष्यभराची जमापुंजी माणूस हक्काचं घर घेण्यासाठी खर्च करत असतो. पण कधीकधी उत्साहाच्या भरात घेतलेल्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे नुकसानही होऊ शकते.त्यामुळे जागा किंवा घर घेताना संपूर्ण माहिती घेणं, कायदेशीर कागदपत्र तपासणं, इ. गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं. अनेकदा चकचकीत ऑफर्सना भुलून केलेले व्यवहार नुकसानास कारणीभूत ठरतात. दुर्दैवाने घर घेताना असं काही झालंच तर? तर, अजिबात निराश होऊ नका. कारण ग्राहक संरक्षण कायदा तुमच्या मदतीला नक्की धावून येईल. 

बिल्डरकडून फसवणूक झाल्यास तक्रार कुठे दाखल कराल? (Complaint against Builder)

ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत किंवा रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) अधिनियम, २०१६ (RERA) अंतर्गत बिल्डरविरूद्ध तक्रार देखील दाखल केली जाऊ शकते. 

रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) अधिनियम, २०१६ (RERA)

रेराद्वारा बिल्डर आणि स्थावर मालमत्ता एजंटांविरूद्ध तक्रारींचे निवारण करण्यात येते. प्रत्येक रिअल इस्टेट प्रकल्प, जिथे विकसित करण्याचे एकूण क्षेत्र ५०० चौरस मीटरपेक्षा जास्त आहे अथवा ८ पेक्षा जास्त अपार्टमेंट्स, कोणत्याही टप्प्यात विकसित करण्याचे प्रस्तावित आहे, असे प्रकल्प संबंधित राज्याच्या रेरामध्ये नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. 

Construction Laws Stock Illustrations – 69 Construction Laws Stock  Illustrations, Vectors & Clipart - Dreamstime

कोणत्या गोष्टींसाठी बिल्डरविरुद्ध तक्रार दाखल करता येते? (Complaint against Builder)

  • अनधिकृत जागेवर बांधकाम 
  • बेकायदेशीर किंवा कायद्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करता केलेले बांधकाम
  • करारामध्ये नमूद केलेल्या नियम, अटी व शर्थी यांचे पालन न करता केलेले बांधकाम व निकृष्ट दर्जाच्या किंवा अर्धवट सोयीसुविधा 
  • कंपाऊंड / कॉम्प्लेक्समध्ये पार्किंगसाठी अपुरी जागा 
  • योजनेमध्ये केलेले कोणतेही रचनात्मक बदल
  • पूर्ण प्रमाणपत्र (Completion Certificate) जमा न केल्यास  
  • दिलेल्या मुदतीत घर वितरित न केल्यास.  (करारामध्ये मुदतीच्या वेळेचा उल्लेख नसल्यास काम सुरू होण्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 वर्षांच्या आत बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे.).
  • भरलेल्या रकमेची पावती देण्यास नकार दिल्यास 
  • अधिक शुल्क आकारल्यास अथवा छुपे शुल्क घेतल्यास 
  • प्रकल्प रद्द करून तुमची रक्कम परत न केल्यास 
  • सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून ती सदस्यांच्या स्वाधीन केली नसल्यास

याचबरोबर इतरही अनेक गोष्टींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. तुमच्या तक्रारी संदर्भात वकीलांशी बोलून तुम्ही तक्रार दाखल करू शकता. 

====

हे ही वाचा: नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला ‘विशाखा मार्गदर्शक तत्वे’ माहिती असायलाच हवी

====

ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत बिल्डरविरोधात तक्रार कशी दाखल कराल? (Complaint against Builder)

१. जेव्हा बिल्डरने आपली फसवणूक केली आहे, हे तुमच्या लक्षात येते तेव्हा संबंधित बिल्डरला लेखी नोटिस पाठवा. तुमच्याकडे नोटीस पाठवल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे त्यामुळे नोटीस पाठवताना शक्यता रजिस्टर ए डी ने पाठवा. 

२. नोटीस स्वीकारण्यास बिल्डरने नकार दिल्यास ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ च्या कलम ६५ (३) अंतर्गत ग्राहक केंद्रात तक्रार दाखल करता येते. मात्र नोटीस वैध आणि योग्य प्रकारे पाठविलेली असणे आवश्यक आहे. तक्रार दाखल करण्यासाठी वकिलाची गरज नाही. तुमचा तक्रारअर्ज तुम्ही स्वतः दाखल करू शकता. तक्रार दाखल करण्यासाठी दाव्याच्या रकमेनुसार कोर्ट फी भरावी लागते. (Complaint against Builder)

३. तक्रारीसंदर्भात कोणतीही शंका असल्यास ग्राहक तक्रार निवारण मंचाचा सल्ला घ्या. ग्राहक तक्रार निवारण मंच ग्राहकांना नाममात्र शुल्क आकारून याचिका दाखल करण्यास मदत करतात. (Complaint against Builder)

Construction Law Review First Half of 2018

ग्राहक मंचात केस दाखल केल्यावरही तडजोड करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. जर तुमच्या दाव्यामध्ये तडजोड झाली नाही, तर ग्राहक मंचामध्ये तुमची केस चालू होते. ग्राहक मंचाला जर तुमची बाजू योग्य वाटली आणि तुमच्यावर झालेल्या अन्यायाची खात्री पटली, तर तुम्हाला तुमचे पैसे व्याजासकट परत करण्याचे आदेश बिल्डरला देऊ शकते. 

====

हे ही वाचा: कोण आहेत प्रोफेसर शांतिश्री धूलिपुडी पंडित ?

====

जागरूक ग्राहक म्हणून प्रत्येकाने आपल्या हक्कांसाठी लढायला हवं. ग्राहकांवर अन्याय होऊ नये आणि झाल्यास त्यांना न्याय मिळावा म्हणूनच ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला आहे. आपल्यासोबत इतरांची होणारी फसवणूक टाळायची असेल, तर अन्यायाविरोधात आवाज उठवा. जागो ग्राहक जागो! 

(टीप: वरील लेख हा केवळ माहितीसाठी लिहिलेला आहे. त्यावर विसंबून कोणतीही कार्यवाही करू नये. कायदेशीर गोष्टींसाठी कायदे तज्ज्ञ अथवा वकिलाचा सल्ला घेणे कधीही इष्ट.)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.