Home » Grapes : द्राक्षे खाताय का ? आरोग्य आहे धोक्यात जाणून घ्या स्वच्छ करण्याची योग्य पद्धत 

Grapes : द्राक्षे खाताय का ? आरोग्य आहे धोक्यात जाणून घ्या स्वच्छ करण्याची योग्य पद्धत 

by Team Gajawaja
0 comment
Grapes
Share

Grapes : द्राक्षे ही सर्व वयोगटांमध्ये आवडती फळं आहेत. चविष्ट, रसाळ आणि पौष्टिक असलेल्या द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C, फायबर यांसारखे पोषक घटक असतात. मात्र बाजारातून आणलेली द्राक्षे थेट खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते, कारण या फळांवर कीटकनाशकांचे अवशेष, धूळ, माती आणि जंतुसंसर्ग असण्याची शक्यता असते. अनेक जण फक्त पाण्याखाली पटकन धुऊन द्राक्षे खातात, पण ही पद्धत पुरेशी सुरक्षित आहे का? तज्ज्ञांच्या मते, द्राक्षे स्वच्छ करण्याची योग्य आणि शास्त्रीय पद्धत जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. (Grapes)

द्राक्षे लागवडीदरम्यान आणि काढणीनंतर अनेक टप्प्यांवर रसायनांच्या संपर्कात येतात. द्राक्षांची साले पातळ असल्यामुळे त्यावर कीटकनाशकांचे अवशेष चिकटून राहण्याची शक्यता जास्त असते. जर ही रसायने नीट काढून टाकली गेली नाहीत, तर पोटदुखी, मळमळ, अॅलर्जी किंवा दीर्घकाळात इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे द्राक्षे खाण्याआधी योग्य प्रकारे स्वच्छ करणे ही केवळ स्वच्छतेची सवय नसून आरोग्याची गरज आहे. (Grapes)

Grapes Washing Tips

Grapes Washing Tips

द्राक्षे स्वच्छ करण्याची पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे दाणे देठापासून वेगळे करणे. संपूर्ण घड पाण्यात टाकून धुण्यापेक्षा दाणे वेगळे केल्यास प्रत्येक दाण्याची स्वच्छता नीट होते. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात द्राक्षे 5 ते 10 मिनिटे भिजत ठेवा. यामुळे सालेवर चिकटलेली माती आणि धूळ सैल होते. नंतर हे पाणी फेकून द्या आणि नवीन स्वच्छ पाण्याने द्राक्षे एक-दोन वेळा धुवा. (Grapes)

अधिक सुरक्षिततेसाठी द्राक्षे धुताना मीठ किंवा बेकिंग सोडा वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. एका लिटर पाण्यात अर्धा चमचा मीठ किंवा बेकिंग सोडा मिसळा आणि द्राक्षे 10 मिनिटे त्यात भिजवा. या पद्धतीमुळे कीटकनाशकांचे अवशेष मोठ्या प्रमाणात कमी होतात. भिजसायनानंतर द्राक्षे स्वच्छ पाण्याखाली नीट धुवून घ्या, जेणेकरून मीठ किंवा सोड्याचे अंश राहणार नाहीत. व्हिनेगर वापरणेही काही जण सुचवतात, मात्र त्याचा वास राहू नये म्हणून नीट धुणं गरजेचं असतं. (Grapes)

===============

हे देखील वाचा :

मार्केटमधून आणलेली द्राक्षे केवळ पाण्याने धुवून खाता का? आधी हे वाचा

Grapes : हिरवे की लाल… कोणत्या द्राक्षांमध्ये जास्त अँटिऑक्सिडंट्स असतात? येथे जाणून घ्या संपूर्ण माहिती

Black Grapes काळी द्राक्षे नियमित खाल्ल्यास मिळतील ‘हे’ फायदे

================

स्वच्छतेनंतर द्राक्षे कोरडी करूनच साठवावीत. ओलसर द्राक्षे फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यावर बुरशी येण्याची शक्यता वाढते. स्वच्छ कापडाने किंवा टिश्यूने द्राक्षे पुसून कोरडी करा आणि हवेशीर डब्यात ठेवा. द्राक्षे शक्यतो धुतल्यानंतर 1–2 दिवसांतच खाणं अधिक सुरक्षित मानलं जातं. योग्य पद्धतीने स्वच्छ केलेली द्राक्षे खाल्ल्यास त्यांचा स्वाद तर वाढतोच, पण आरोग्याचाही पूर्ण लाभ मिळतो. (Grapes)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.