Home » US Visas : अमेरिकेच्या व्हिसाचे किती प्रकार आहेत ?

US Visas : अमेरिकेच्या व्हिसाचे किती प्रकार आहेत ?

by Team Gajawaja
0 comment
US Visas
Share

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची कारकिर्द त्रासदायक ठरु शकते अशी चर्चा सुरु आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची धुरा हाती घेतल्यावर डोनाल्ड ट्रम्प जन्माच्या आधारावर नागरिकत्वाची तरतूद संपवण्याच्या तयारीत आहेत. याचा फटका लाखो भारतीयांना बसणार आहे. एका आकडेवारीनुसार अमेरिकेत जन्माच्या आधारे नागरिकत्व मिळालेल्यांची संख्या 16 लाखांच्या आसपास आहे. त्या भारतीय-अमेरिकन नागरिकांचे काय होणार हा प्रश्न विचारला जात आहे. यासोबत अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचीही संख्या लाखाच्या घरात आहे. या सर्व भारतीयांना डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतून हद्दपार करु शकतात का,अशी जरी चर्चा असली तरी अमेरिकेत राहण्यासाठी फक्त एकच प्रकारचा व्हिसा नसतो, तर त्यासाठी किमान 12 प्रकारचा व्हिसा देण्यात येतो. त्यातील H1B व्हिसा पॉलिसीवर आता अधिक संशोधन होणार असल्याची माहिती आहे. (US Visas)

डोनाल्ड ट्रम्प याच्या सरकारमध्ये टेस्लाचे सर्वेसर्वा एलोन मस्क यांची मोठी भूमिका असणार आहे. मस्क यांनी H1B व्हिसा पॉलिसी ही सर्वात जुनाट पॉलिसी असल्याचे वक्तव्य केल्यानं आता या व्हिसा प्रणालीवर अधिक संशोधन होईल, हे स्पष्ट झाले आहे. एलॉन मस्क हे अमेरिकेच्या सरकारमध्ये कार्यक्षमता विभागाचे मंत्री असतील. अमेरिकेत स्थापन होणाऱ्या नव्या सरकारमध्ये सरकारी खर्चात कपात करण्याची मोठी जबाबदारी भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी आणि एलॉन मस्क यांच्यावर आहे. त्यांनीच H1B व्हिसा प्रणालीमध्ये अनेक त्रुटी असून त्या दूर करण्याची पहिली गरज असल्याचे सांगितले आहे. याच व्हिसावर जगभरातील नागरिक अमेरिकेत नोकरीसाठी येतात. (International News)

यामध्ये भारतीयांची संख्याही मोठी असल्यानं याचा भारतीयांवर किती परिणाम होणार आहे, याची चाचपणी करण्यात येत आहे. कारण एलॉन मस्क यांनी H1B व्हिसा मिळवण्यासाठी पगाराचे निकष वाढवल्याची पहिली अट ठेवली आहे. परदेशातून येणा-या नागरिकांना ही रक्कम आवाक्याच्या बाहेर असल्यास आपोआपच H1B व्हिसावर येणा-या नागरिकांची संख्या कमी होईल, असेही मस्क यांनी सुचवले आहे. वास्तविक आत्तापर्यंत अमेरिकेनं आपली व्हिसा पॉलिसी वेळोवेळी बदलली आहे. अमेरिकेत जे सरकार येतं, त्याच्या ध्येयधोरणानुसार ही पॉलिसी असते. H1B व्हिसाबाबत बोलायचे तर या व्हिसावर येणारे हे अमेरिकेतील आयटी कंपनीमध्येच शक्यतो नोकरीसाठी येतात, आणि त्यांच्या पगाराचे आकडेही मोठे असतात. त्यापैकी अनेकजण अमेरिकेत स्थाईक होतात आणि ग्रीनकार्ड मिळवतात. पण हा सर्व काळ मोठा असतो. आता त्यामध्ये बदल झाल्यास ही सर्व प्रक्रिया अधिक मोठी होण्याची शक्यता आहे. (US Visas)

अमेरिकेत येणा-या परदेशी नागरिकांना अनेक प्रकारचे व्हिसा देण्यात येतात. यात कायम निवास आणि तात्पुरता निवास असे दोन भाग असतात. यात अधिक फोड करीत साधारण 20 प्रकारचे व्हिसा परदेशी नागरिकांसाठी अमेरिकेचे सरकार देते. त्यात पहिला आहे, नॉन-इमिग्रंट व्हिसा. हा व्हिसा पर्यटन, व्यवसाय, अभ्यास, वैद्यकीय उपचार यासाठी आलेल्यांना मिळतो. व्यवसाय व्हिसा हा व्यावसायिक हेतूंसाठी आलेल्यांना मिळतो. त्यात उद्योगसंदर्भातील चर्चासत्रांचा समावेश असतो. विद्यार्थी व्हिसा मिळवणा-यांची संख्या मोठी असते. यात विद्यार्थी, इंटर्नशिप, प्रशिक्षण किंवा संशोधनासह एक्सचेंज प्रोग्रामसाठी आलेल्यांची संख्या असते. कार्य व्हिसाला H1B व्हिसा म्हणतात. यात आयटी आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्तिंचा समावेश होते. (International News)

====================

हे देखील वाचा : 

America : अमेरिका यातही नंबर वन !

Uttar Pradesh : महाकुंभमध्ये 12 ज्योतिलिंग !

====================

ट्रान्झिट आणि क्रू मेंबर व्हिसा हा जहाजे किंवा एरोप्लेनच्या क्रू सदस्यांसाठी असतो. L1 व्हिसा हा इंट्रा-कंपनी हस्तांतरणासाठी असतो. तर O1 व्हिसा हा विज्ञान, कला किंवा ऍथलेटिक्स यांसारख्या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता असलेल्या व्यक्तींसाठी असतो. इमिग्रंट व्हिसा हा ज्यांना अमेरिकेत कायमचे रहायचे आहे, त्यांच्यासाठी असतो. स्पेशल इमिग्रंट व्हिसा हा काही विशिष्ट व्यक्तींसाठी असतो. ज्यामध्ये धार्मिक कर्मचारी किंवा सरकारी-यांचा समावेश होतो. कौटुंबिक-प्रायोजित इमिग्रेशन व्हिसा हा अमेरिकन नागरिकांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी असतो. या सर्वांशिवाय अमेरिकेमध्ये रोजगार आधारिक व्हिसा, डायव्हर्सिटी इमिग्रंट व्हिसा आदीप्रकारचे व्हिसा देण्यात येतात. या सर्व प्रकारच्या व्हिसामध्ये H1B व्हिसा मिळवण्यासाठी मोठी गर्दी असते. अनेक देशातील आयटीमधील तरुण हा व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. आता त्याच व्हिसाच्या प्रणालीमध्ये बदल होणार आहे. (US Visas)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.