Home » डिस्ने+ हॉटस्टारची सुप्रिया पाठक आणि मनोज पाहवा अभिनित नेक्स्ट लाईफ कॉमेडी ‘होम शांती’ 6 मे रोजी होणार प्रदर्शित!

डिस्ने+ हॉटस्टारची सुप्रिया पाठक आणि मनोज पाहवा अभिनित नेक्स्ट लाईफ कॉमेडी ‘होम शांती’ 6 मे रोजी होणार प्रदर्शित!

by Team Gajawaja
0 comment
'होम शांती'
Share

हॉटस्टार स्पेशल प्रस्तुत ‘होम शांती’, या आपल्या नवीनतम मालिकेच्या निमित्ताने डिस्ने+ हॉटस्टार एक नवा कोरा कौटुंबिक जीवनाचा विनोदी, तितकेच भावनिक कथानक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ज्येष्ठ अभिनेते सुप्रिया पाठक आणि मनोज पाहवा या मालिकेत हृदयस्पर्शी कौटुंबिक केमिस्ट्री शेअर करताना दिसतील, ज्यामुळे ती कुटुंब आणि मित्र परिवारासह पाहण्यासाठी मस्ट वॉच बनते. आकांक्षा दुआ दिग्दर्शित, स्लाइस-ऑफ-लाइफ ड्रामा आयुष्यात स्वत:चे घर बांधण्याच्या जोशी कुटुंबाच्या दीर्घकाळापासून पाहिलेल्या स्वप्नांभोवती फिरते. या मालिकेत चकोरी द्विवेदी आणि पूजन छाबरा हे नवोदित कलाकारही जोशींच्या नव्या पिढीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अक्षय अस्थाना, आकांक्षा दुआ, निधी बिश्त, मयंक पांडे, निखिल सचान आणि सौरभ खन्ना यांनी ही मालिका लिहिली आहे. पोशम पा पिक्चर्स निर्मित मालिका डिस्ने प्लस हॉटस्टारवर ६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

हॉटस्टार स्पेशल प्रस्तुत होम शांती, हिंदी वृत्तपत्रातील स्तंभलेखक उमेश जोशी, त्यांच्या सेवानिवृत्त सरकारी शाळेच्या उपमुख्याध्यापक पत्नी सरला जोशी आणि त्यांची दोन मुले, जिज्ञासा जोशी आणि नमन जोशी, वय 22 आणि 16 यांच्या जीवनाभोवती फिरणारी एक विनोदी कथा मालिका आहे.

====

हे देखील वाचा: ‘गदर २’ सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळणार तारासिंग आणि सकीना यांची प्रेमकहाणी

====

ही मालिका डेहराडूनमधील या मध्यमवर्गीय कुटुंबाचा प्रवास दर्शवते, जी एक साधी पण गोंडस कथा आहे. ज्यांना एक दिवस स्वतःचे घर बनवायचे आहे त्यांच्यासाठी ती खास आहे. होम शांती ही एक मजेदार कथा असून त्यामध्ये आई-वडील आणि भावंड एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करतात आणि त्यांच्यातील सुंदर नात्याची झलक दाखवतात.

या मालिकेबद्दल बोलताना दिग्दर्शिका आकांक्षा दुआ म्हणतात, “होम शांती हे कौटुंबिक नाट्य असून एका कुटुंबाचा त्यांच्या स्वप्नातील घर बांधतानाचा भावनिक प्रवास जवळून दाखवतो. हे एक जिवंत आणि विनोदी नाट्य आहे. जे प्रेक्षकांना याच्या प्रेमात पाडेल आणि जोशी कुटुंबीयांच्या घराची शेवटची वीट रचली जाईपर्यंत त्यांना जोडून ठेवेल. मी सुप्रिया पाठक आणि मनोज पाहवा यांची खूप आभारी आहे, ज्यांनी या कौटुंबिक नाट्यात एक अप्रतिम समन्वय निर्माण केला आहे.

त्यांच्यासोबतच चकोरी द्विवेदी आणि पूजन छाबरा हे दोन प्रतिभावान अभिनेते आहेत, जोशी भावंडं म्हणून, त्यांनी त्यांच्या पात्रांना अतिशय प्रिय बनवले आहे. रणजीत या मध्ये हॅपी कॉन्ट्रॅक्टर म्हणून हजर आहे. होम शांतीचे संपूर्ण कलाकार एका मजेदार पोशाखाप्रमाणे आहेत जे तुमच्यामध्ये हळूहळू घर करतात. हे भावनिक नाट्य पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांसाठी मी अतिशय उत्सुक आहे.”

तर, या मालिकेबद्दल अभिनेत्री सुप्रिया पाठक म्हणतात, “होम शांती हे एक हृदयस्पर्शी कौटुंबिक नाटक आहे जे तुम्हाला कुटुंबासाठी एक पाऊल मागे येण्यास आणि कुटुंबासोबत सामायिक केलेल्या छोट्या छोट्या जवळीकांकडे लक्ष देण्यास प्रवृत्त करते. एक दिवस आपले स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न आहे, अशा कुटुंबांना आपण सर्वच जण पाहतो. या मालिकेत काम करतानाचा वेळ खूप छान गेला, विशेषत: मनोजसोबतची माझी केमिस्ट्री आनंददायक होती. सेटवर अगदी एका कुटुंबासारखे वातावरण होते.”

Home Shanti trailer: Supriya Pathak, Manoj Pahwa gear up to build a dream  home | Web Series - Hindustan Times

====

हे देखील वाचा: पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करूनही ‘या’ सिनेमांनी मिळवला फ्लॉपचा टॅग 

===

घरातील प्रमुख महिला, सरला जोशी यांनी या वयात बदली स्वीकारण्याऐवजी सरकारी शाळेतील नोकरीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याने जोशी कुटुंबाला पेचप्रसंगाचा सामना करावा लागतो. त्यानंतर, डेहराडूनमध्ये राहणार्‍या या कुटुंबाला आता त्यांचे आरामदायी सरकारी निवासस्थान रिकामी करण्यासाठी अल्प नोटीसनंतर घर शोधण्याची समस्या भेडसावत आहे, जिथे ते गेल्या 20 वर्षांपासून राहत आहेत.

घर रिकामे करण्यासाठी मर्यादित वेळेसह, चार जणांचे कुटुंब वडिलोपार्जित जमिनीच्या एका छोट्या तुकड्यावर नवीन घर बांधण्याचे काम सुरू करते. होम शांती हे एक हलके-फुलके कौटुंबिक नाट्य आहे ज्यामध्ये एक कुटुंब त्यांच्या स्वप्नातील घर बांधताना अनेक कडू गोड प्रसंगांना सामोरे जाते. हे पाहणे खूप मजेदार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.