वातावरणामध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे आपल्या शरीरावर त्याचा मोठा परिणाम होत असतो. वातावरणात बदल झाला की हमखास घराघरांमध्ये सर्दी खोकल्याचे रुग्ण दिसण्यास सुरुवात होते. याशिवाय बाहेरील प्रभूषण, धूर, धूळ यांमुळे देखील आपल्याला विविध त्रास उदभवतात. यात घशाला होणारे इन्फेक्शन देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येते. (Throat)
घसा खवखवत असेल तर आपल्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण होते. यामुळे लक्ष लागत नाही, सतत घशामध्ये काहीतरी टोचते असे जाणवते, बोलताना त्रास होतो. यासाठी काही लोकं लगेच डॉक्टरकडे जाण्यापेक्षा घरीच काही सोपे आणि लगेच परिणामकरणारे उपाय असल्यास तेच करायला प्राधान्य देतात. मग घशामध्ये खवखव असेल तर त्यावर कोणते घरगुती सोपे उपाय करता येऊ शकता हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. (Throat Infection)
– कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करणे. या उपायामुळे घसा खवखवणे आणि त्याची सूज कमी होण्यास मदत होते. दिवसातून कमीतकमी वेळा २ वेळा कोमट पाण्याने गुळण्या कराव्या. (Marathi Top News)
– गरम पाण्यात मध आणि आल्याचा रस मिसळून ते प्यायल्यास घसा खवखवणे दूर होण्यास देखील मदत होते.
– घशात खवखव होत असेल तर आपला घसा हायड्रेटेड ठेवणे अत्यंत महत्वपूर्ण ठरते. त्याशिवाय गरम पेयांचे सेवन केल्यानेही घशाला आराम मिळू शकतो.
– पाण्यात जेष्ठमध टाकून त्या पाण्याने गुळण्या करा. जेष्ठमधातील अॅस्पिरिनचे गुणधर्म पुरेसे आहेत.
– घसा खवखवणं, जळजळ होणं, वेदना होणं यासारख्या समस्या दूर करण्यासाठी दररोज आल्याचा चहा प्या. आलं एक नैसर्गिक वेदनशामक आणि वेदना निवारक आहे म्हणून घशात वेदना आणि जळजळ शांत करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. (Top Stories)
– घसा खवखवणे आणि दुखत असल्यास रात्री हळदीचे दूध प्यावे. हळदीमध्ये अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टिक घटक असतात जे जळजळ आणि वेदना कमी करतात. हळद घशासाठी फायदेशीर आहे.
– तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात, ज्यामुळे घशाला फायदा होतो. तुळशीची पाने पाण्यात टाकून ते पाणी उकळून घ्या आणि त्या पाण्याने गुळण्या करा.
– सफरचंद सायडर व्हिनेगर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा. ते थोडे थंड होऊ द्या आणि रिकाम्या पोटी प्या.
– घसा खवखवत असल्यास वाफ घेणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे घशात झालेला संसर्ग कमी होण्यास मदत होते.
– घशातील खवखव दूर करण्यासाठी तुम्ही हर्बल चहा पिऊ शकता. तुळस, लवंग, काळी मिरी आणि आलं घातलेला गरम चहा प्यायल्यास घशाला आराम मिळतो.
============
हे देखील वाचा : Mauni Amavasya जाणून घ्या मौनी अमावस्येचे महत्व
============
– काळी मिरी, बत्तासा, लवंग, तुळस घालून पाणी उकळवा. पाणी उकळून निम्मे झाले की हा काढा प्यावा. या काढ्याने घशाची खवखव निघून जाते आणि घशाला आराम मिळतो.
– लसूण खाल्ल्यानेही घशाला आराम मिळतो. लसणीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात. यामुळे घशाचे अनेक आजार दूर होतात. लसणाची एक पाकळी खाल्ली की लगेच आराम मिळू शकतो.