Home » Home Remedies for Migraine Headache: मायग्रेनच्या वेदनेने त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा !

Home Remedies for Migraine Headache: मायग्रेनच्या वेदनेने त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा !

मायग्रेन हा एक सामान्य प्राथमिक डोकेदुखी डिसऑर्डर आहे ज्यामध्ये वारंवार डोकेदुखी होते जी मध्यम ते गंभीर पर्यंत असू शकते.

0 comment
Home Remedies for Migraine Headache
Share

मायग्रेन हा एक सामान्य प्राथमिक डोकेदुखी डिसऑर्डर आहे ज्यामध्ये वारंवार डोकेदुखी होते जी मध्यम ते गंभीर पर्यंत असू शकते. मायग्रेन मध्ये डोकेदुखीचा त्रास डोक्याच्या अर्ध्या भागात होतो, त्यामुळे हा आजार अर्धशिशी या नावानेसुद्धा ओळखला जातो. मायग्रेन वेदना ही सामान्य डोकेदुखी नाही, डोक्याच्या कोणत्याही एका भागात ही वेदना खूप तीव्र असते, जी इतकी वेदनादायक असते की रुग्णाला शांत झोप येत नाही किंवा आरामात बसता सुद्धा येत नाही. अनेकांना डोकं दुखू लागल्यानंतर उलट्याही येऊ लागतात, आणि तेव्हा त्या वेदना अधिकच भयंकर होतात. मायग्रेनची वेदना काही तासांपासून काही दिवसांपर्यंत सुद्धा टिकू शकते. बऱ्याचदा औषध घेऊन ही माइग्रेन चा त्रास कमी होत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की काही घरगुती उपचारांनी तुम्ही तुमच्या या वेदना कमी करू शकता. हो, तुम्ही ही माइग्रेन च्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी प्रयत्न करताय तर आजचा लेख तुमच्यासाठी आहे आणि आज यावर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.(Home Remedies for Migraine Headache)
 
Home Remedies for Migraine Headache

Home Remedies for Migraine Headache

 
* मायग्रेन च्या वेदनेसाठी घरगुती उपाय *
 
– जर एखाद्या व्यक्तीला निरोगी राहायचे असेल तर त्याने धूम्रपानापासून दूर राहिले पाहिजे कारण त्याचे असे दुष्परिणाम आहेत जे त्याच्या आरोग्यावर परिणाम करत नाहीत आणि यामुळे त्याला मायग्रेन सारखी डोकेदुखी होत नाही.
 
– सामान्य डोकेदुखी आणि मायग्रेन च्या दोन्ही वेदनांवर हा एक घरगुती उपाय आहे तो म्हणजे लॅव्हेंडर तेल. अनेकांचा असा विश्वास आहे की याचा सुगंध मायग्रेनसाठी खूप प्रभावी आहे. यासाठी लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब गरम पाण्यात टाकून त्याचा वास घेतल्याने मायग्रेन मध्ये बराच आराम मिळतो.
 
–  मायग्रेन चा त्रास असणाऱ्यांनी उन्हाळ्यात एअर कंडिशनर चा वापर केल्यास थंडीतून लगेच गरम वातावरणात जाऊ नका आणि गरम उष्णतेतून जास्त थंड पाणी पिऊ नका असे तापमानातील बदल नेहमी टाळा.
Home Remedies for Migraine Headache

Home Remedies for Migraine Headache

 
– मायग्रेनच्या असह्य वेदना दूर करण्यासाठी रोज २-२ थेंब शुद्ध देशी तूप नाकात टाकावे.
– दालचिनी हा एक मसाला आहे जी अन्नाची चव वाढवते तसेच मायग्रेनवर ही यशस्वी उपचार करते. यासाठी दालचिनी बारीक करून त्याची पूड करुन घ्या आणि कपाळावर अर्धा तास त्याच्या लेप लाऊन ठेवा. तुम्हाला लवकरच आराम मिळेल.
– मायग्रेन मुळे डोक्यात तीव्र वेदना होत असतील तर लवंग पावडर मध्ये मीठ मिसळून दुधासोबत प्यावे.
– मायग्रेनच्या त्रासात तेल हलके गरम करा. आणि डोक्याच्या ज्या भागात दुखत असेल तिथे हलक्या हाताने मसाज करा. डोक्याच्या मसाजसोबतच हात, पाय, मान आणि खांद्याला सुद्धा मसाज करा.(Home Remedies for Migraine Headache)
– पेपरमिंटमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्याचबरोबर मन शांत आणि स्थिर होण्यास मदत होते. आपण मायग्रेनमध्ये पेपरमिंट चहा पिऊ शकता किंवा अर्धा ग्लास पाण्यात एक चमचा मधासह पेपरमिंट तेलाचे काही थेंब मिसळू शकता. २०-२५ मिनिटे पेपरमिंट ऑईलने डोके आणि कपाळावर मालिश केल्यास मायग्रेनमध्ये फायदा होतो.
 
– आले मायग्रेनदरम्यान मळमळ किंवा उलट्या यासारख्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करते. याशिवाय यामुळे सूज आणि वेदना कमी होते. यासाठी  आले सोलून त्याचे तुकडे करून पाण्यात उकळून थंड करून या पाण्यात मध आणि लिंबाचे काही थेंब टाकून प्यावे.
– मायग्रेन कशामुळे होऊ शकते हे आपल्याला माहित नसते मात्र असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे माइग्रेन होण्याचा जास्त चान्स असतो  मायग्रेनच्या सामान्य अन्न ट्रिगरमध्ये हे समाविष्ट आहे. जसे, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ , रेड वाइन, मद्य, चॉकलेट, कॅफीनयुक्त पेये हे पदार्थ आहेत. 
(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे यातील उपाय  करण्याआधी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा.) 

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.