198
पुरुष असो किंवा मग स्त्री आपले केस छान,चमकदार, सॉफ्ट असावे अस सगळ्यांना वाटत. केसांना डोक्यावरचे ताज सुद्धा म्हटले जाते. अनेक सिनेमे सुद्धा केसांवर बनले आहेत. यावरूनच केस किती महत्वाचे आणि केसांचा विषय लोक किती गांभीर्याने घेतात हे स्पष्ट होते. मात्र आजकालच्या प्रदूषण, केमिकलचा वापर यामुळे अनेकाना केस गळण्याची, केस कोरडे पडण्याची समस्या सतावत आहे. केवळ स्त्रीयाच नाही तर केस गळण्याची समस्या घेऊन कित्येक पुरुष ही डॉक्टरांकडे जातात. केस गळती थांबावी आणि केस लवकर वाढावेत यासाठी लोक अनेक प्रकारच्या हेअर प्रॉडक्ट्सचा वापर ही करतात, पण केस लांब करण्याचा प्रयत्न करताना नकळत काही चुकाही केल्या जातात. त्यामुळे डॉक्टरकडून सतत गोळ्या घेण ही चांगल नाही. तुम्ही ही केस गळण्याच्या समस्येमुळे हैराण असाल तर काळजी करू नका. कारण आजच्या लेखात आपण याच समस्येवर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. तेव्हा लेख शेवटपर्यंत नक्कीच वाचा.(Home Remedies for Hair Loss)
– कांद्याचा रस ही एक अशी गोष्ट आहे जी खूप प्रभावी आहे. यामुळे केस लांब होतातच तसेच दाटही होतात. अॅलोपेशिया (केस गळण्याच्या समस्येवर) देखील हे फायदेशीर आहे. यासाठी कांदा कापून त्याचा रस काढावा.हवं तर मिक्सरमध्ये ही कांदा बारीक करून घेऊ शकता. कापसाच्या साहाय्याने हा रस केसांना लावा. हा रस १५ मिनिटे केसांमध्ये राहू द्या आणि नंतर शॅम्पूने केस धुवा.
– केस गळत असतील तर नारळ तेल-आवळ्याचे तेल हा सर्वात सोपा आणि उत्तम घरगुती उपाय आहे जो आपण डोक्यावर आणि केसांना लावावा. यासाठी २० मिली नारळाचे तेल घेऊन १० मिली आवळ्याचे तेल घ्यावे, याशिवाय एक-दोन चमचे लिंबाचा रस घेऊन तीनही चांगले मिसळून डोक्यावर लावून थोडा वेळ सोडा. सुमारे 20 मिनिटांनंतर डोके धुवा. आता तुम्हाला तुमचे केस खूप मुलायम आणि मजबूत वाटतील. जर तुम्हाला कोंड्याची तक्रार असेल तर तीही दूर होईल. नारळाचा वारंवार वापर केल्याने केसांना पोषण मिळते आणि ते गळण्यापासून बचाव होतो.
– केसांच्या वाढीच्या टिप्ससाठी अंडी हा एक सोपा आणि प्रभावी पर्याय असू शकतो. एका संशोधनानुसार अंड्यातील पिवळ बलक केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, अंड्यात असलेले पेप्टाइड केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकतात. या आधारावर असे म्हणता येईल की केस लांब करण्याच्या उपायासाठी अंड्याचा वापर फायदेशीर ठरू शकतो.(Home Remedies for Hair Loss)
============================
हे देखील वाचा: Almond Oil Benefits: अनेक आजारांवर रामबाण उपाय असलेल्या ‘बदाम तेलाचे’ चमत्कारिक फायदे जाणून घ्या
============================
– कोरफड जेलचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, परंतु त्याचबरोबर ते केसांसाठी देखील उपयुक्त ठरू शकते. केसखराब होणे, केस गळणे आणि कोंडा यासारख्या समस्यांसाठी कोरफड जेल उपयुक्त ठरू शकते. कोरफड जेल चा वापर अनेक वर्षांपासून घरगुती उपाय म्हणून केला जात आहे. केसांच्या वाढीसाठी घरगुती उपचारांमध्ये ऑलिव्ह तेल, बदाम तेल आणि एरंडेल तेलासह देखील याचा वापर केला जाऊ शकतो. आता जर कोणी तुम्हाला केसांची वाढ कशी वाढवावी असे विचारले तर त्याचे उत्तर कोरफड जेल आहे.
– कडीपत्ता केवळ भाजीची चव वाढवत नाही, तर केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय म्हणूनही कडीपत्ता फायदेशीर ठरू शकतो. कडीपत्त्याचे केसांसाठी अनेक फायदे आहेत. कडीपत्ता केसांसाठी टॉनिक म्हणून काम करू शकतो आणि केस निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतो. हा एक उपयुक्त घरगुती उपाय ठरू शकतो. याचा वापर केसांच्या वाढीबरोबरच केसांचा रंग टिकवून ठेवण्यास देखील मदत करू शकतो. कढीपत्ता वापरल्याने अकाली पांढरे केस येण्याच्या जोखमीपासून देखील संरक्षण होऊ शकते.
(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे यातील उपाय करण्याआधी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा.)