Home » Home Remedies for Black Lips: तुमचे ओठ काळे पडले आहेत का? गुलाबी आणि कोमल ओठांसाठी फॉलो करा ‘या’ घरगुती टिप्स

Home Remedies for Black Lips: तुमचे ओठ काळे पडले आहेत का? गुलाबी आणि कोमल ओठांसाठी फॉलो करा ‘या’ घरगुती टिप्स

पुरुष असो किंवा स्त्री प्रत्येकाला आपले ओठ छान दिसावेत मुलायम असावेत अस वाटत. कारण ते केवळ तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवत नाही तर तुमचे हास्य सुद्धा खुलवते.

0 comment
Home Remedies for Black Lips
Share

पुरुष असो किंवा स्त्री प्रत्येकाला आपले ओठ छान दिसावेत मुलायम असावेत अस वाटत. कारण ते केवळ तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवत नाही तर तुमचे हास्य सुद्धा खुलवते.पण हल्ली ओठ काळे पडण्याच्या समस्येला अनेकांना सामोरे जावे लागते.आणि त्यामुळे त्यांना लाजही वाटते. ओठांचा काळेपणा केवळ त्वचा डल करत नाही. तर काळपट ओठांमुळे तुमच्या चेहऱ्याचा रंगही खराब दिसु शकतो. त्यामुळे जसे आपण चेहऱ्याच्या त्वचेची, केसांची काळजी घेतो तशीच काळजी ओठांची घेणे ही तेवढेच महत्वाचे आहे. आणि त्यासाठी महागडे लिपबाम, आणि स्क्रब ला पैसे घालायची गरज नाही तर अगदी घरच्या घरी सोपे उपाय करुन तुम्ही तुमच्या ओठांचा काळेपणा दूर करू शकतात. आणि आजचा हा याच विषयावर असणार आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत की ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही कोणते घरगुती उपाय करू शकता.त्यामुळे लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.(Home Remedies for Black Lips)
 
Home Remedies for Black Lips

Home Remedies for Black Lips

 
*ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय*
 
–  तुम्हाला बाजारात अनेक क्रीम आणि इतर कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स मिळतील, ज्यांच्या मदतीने ओठांचा काळेपणा दूर करता येऊ शकतो. परंतु घरगुती उपचारांचा वापर करणे अधिक सुरक्षित आहे. लिंबाच्या साहाय्याने ओठांचा काळेपणा बऱ्याच अंशी नियंत्रित करता येतो. लिंबामध्ये असलेले काही घटक ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतात.
 
– ओठ काळे होण्याची समस्या रात्रभर ओठांवर लिपस्टिक लावल्यानेही ही उद्भवू शकते. अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी गुलाब पाण्याने लिपस्टिक काढून टाका. त्यानंतरच झोपायला जा.
 
– नैसर्गिक तेलापासून बनविलेले हे ग्लिसरीन शतकानुशतके त्वचेशी संबंधित गोष्टींमध्ये वापरले जात आहे.ग्लिसरीन आपल्या त्वचेची आर्द्रता वाढवते. जर आपण नियमितपणे ग्लिसरीन लावले तर त्वचेचा ओलावा टिकवून वृद्धत्वाचा प्रभाव कमी होऊ शकतो. ग्लिसरीनच्या नियमित वापरामुळे त्वचेचा रंग देखील सुधारू शकतो. यासाठी कापसाच्या साहाय्याने रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर ग्लिसरीन लावावे.हे रात्रभर असेच ठेवावे.नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून टाका. 
 
Home Remedies for Black Lips

Home Remedies for Black Lips

 
– ओठांचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कोरफड जेल हा एक चांगला उपाय आहे. कोरफडमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे फाटलेले आणि कोरडे ओठ मऊ होतात. त्याच्या रसात असलेले नैसर्गिक मॉइश्चरायझर आणि पोषक तत्वे ओठांना मऊ आणि चमकदार बनवतात.
 
– ओठांचा काळापणा दूर करून ओठ निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आणि निरोगी आहार घ्या. ओठांच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक आहेत. व्हिटॅमिन बी आणि ई ओठांसाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ईसाठी बदाम, जोजोबा, नारळ तेल आणि लोणी इत्यादींचा वापर करा.
 
– ओठांचा काळेपणा दूर करायचा असेल तर संत्र्याची साल, ग्लिसरीन, कोरफड जेल आणि दूध असणं गरजेचं आहे. यासाठी आता एका भांड्यात दोन संत्र्याची साल, एक चमचा ग्लिसरीन, एक चमचा दूध आणि एक चमचा कोरफड जेल मिसळा. आता हे मिश्रण ओठांवर १० ते १५ मिनिटे लावा. हे मिश्रण तुम्ही लिप बाम म्हणून वापरू शकता.(Home Remedies for Black Lips)
 
=========================
 
 
=========================
 
– मध आणि लिंबू दोन्हीमध्ये व्हिटॅमिन-सी आढळते. व्हिटॅमिन-सीला एस्कॉर्बिक अॅसिड देखील म्हणतात, जे आपल्या त्वचेवर ब्लिचिंग एजंट म्हणून काम करते. कदाचित म्हणूनच सर्व प्रकारच्या ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये त्यांचा वापर केला जातो. स्किन क्रीम असो किंवा लिप बाम, मध आणि लिंबाचा अर्क सर्वांमध्ये असतो. रोज रात्री झोपताना हे मिश्रण ओठांना लावावे. 
 
– शरीरात पाण्याची कमतरता असल्याने त्याचा नकारात्मक परिणाम ओठांवरही दिसून येतो. त्यामुळे ओठ काळे दिसतात. ओठांचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी जास्त पाणी प्या. रोज तीन लिटर पाणी प्यायल्याने शरीर निरोगी तर राहतंच, शिवाय त्वचेतही सुधारणा होते. आणि ओठांची त्वचा मऊ होते.
 
(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे यातील उपाय  करण्याआधी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा.) 

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.