पावसाळा सुरु होणार म्हटल्यावर प्रत्येक घरात अनेक प्रकारची तयारी केली जाते. पावसाळा सुरु होणार म्हणजे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आपण हा ऋतू सुरु होण्याआधी किती तयारी केली असली तरी काहीतरी असे घडते की, ज्याच्यासाठी आपण तयार नसतो. पावसाळ्यामध्ये डासांचा, विविध आजारांचा मोठ्या प्रमाणावर आपल्याला सामना करावा लागतो. मात्र यासोबतच इतरही अनेक समस्या असतात, ज्याबद्दल जास्त बोलले जात नाही, त्याच्यावर सोपा उपाय देखील जास्त दिसून येत. अशीच एक समस्या म्हणजे घरातील लाकडाचे दरवाजे, खिडक्या फुगण्याची. (Jammed Door Window )
अनेकांना पावसाळा आवडत असला तरी हा ऋतू भरपूर डोकेदुखी आपल्यासोबत घेऊन येत असतो. घराची छत गळणं, घरात, घराबाहेर पाणी जमा होणे आदी अनेक समस्या त्रासदायक ठरतात. यासोबतच अगदी सर्रास घराघरात दिसून येणारी समस्या म्हणजे घरातील लाकडी दरवाजे आणि खिडक्या जाम होणे. हवेत आद्र्रतेचे प्रमाण वाढले की, ही समस्या जाणवू लागते. यात कधी कधी लाडक्यांमध्ये ओलावा टिकून राहतो आणि त्यामुळे वाळवी लागते, दुर्गंधी येते आदी तर त्रास होतात. तर यावर घरगुती उपाय काय आहेत ते जाणून घेऊया.
- पावसाळ्यात, लाकडी दरवाजे बऱ्याचदा फुगतात, त्यांना बुरशी लागल्याचे आपल्याला दिसते. अशा वेळेस आपण ऑयलिंग किंवा वॅक्सिंगचा वापर करु शकतात. त्यामुळे दरवाजाचे मोठे नुकसान होण्यापासून वाचवता येऊ शकते. ऑलिव्ह ऑईल, मोहरीचे तेल लावू शकतो. दार – खिडक्यांना तेल लावल्याने ते फुगून जाम होणार नाहीत.
- जर लाकडी दारे आणि खिडक्या ओलाव्यामुळे फुगत असतील आणि घट्ट होत असतील किंवा तो वाकडा झाला असेल आणि नीट बंद होत नसेल तर हेअर ड्रायर दरवाजा आणि खिडकीच्या शटरवर चालवल्यास ते लवकर नीट होतील. हेअर ड्रायरच्या गरम हवेमुळे लाकडावर येणारा ओलावा निघून जाईल आणि दरवाजे सहज बंद होऊ लागतील.
- दरवाजे आणि खिडक्यांचे ट्रॅक स्वच्छ केल्यानंतर, त्यावर सिलिकॉन स्प्रे किंवा तेल लावून ग्रीस करा. जर गंज असेल तर सँडपेपरच्या मदतीने तो काढून टाका.
- दरवाजावर ओलावा येण्यापासून रोखण्यासाठी, तात्पुरते मेणदेखील लावले जाऊ शकते.
- दरवाजाला ओलाव्यापासून वाचवण्यासाठी सर्वांत चांगली पद्धत म्हणजे नियमितपणे घरातील दरवाजांवर प्राइमर आणि पेंट लावल्याने ते सुस्थित राहून सुरक्षित राहतील.
- पावसात दरवाजे ओले होऊ नये म्हणून पाऊस येण्यापूर्वी त्यावर तेलाचा थर आणि पॅराफिन वॅक्स लावले तर त्यावर पाणी जमा होणार नाही आणि दरवाजा ओला राहणार नाही.
=======
हे देखील वाचा : पावसाळ्यात डोक्यात सतत खाज येते? करा हे घरगुती उपाय
=======
- पावसाळ्यात दरवाजाच्या स्वच्छतेसाठी पाण्यामध्ये ओला कपडा वापरण्याऐवजी तेलात बुडवलेल्या कापडाने पुसून टाका. यामुळे ओलावा पकडणार नाही.
- ठेकणांमुळे देखील दरवाजे आणि खिडक्या जाम होऊ शकतात. त्यामुळे जर घरात, दरवाजा खिडक्यांवर ढेकणं असतील लगेच त्यावर उपचार करा.
- पाण्याचा प्रवेश टाळण्यासाठी आणि जॅमिंग कमी करण्यासाठी दरवाजे आणि खिडक्यांभोवती वेदर स्ट्रिपिंग लावा.