जगभरात नाव आणि ओळख, उत्तम फॅन बेस, लोकांचे प्रेम आणि स्टार्डम. असे सर्व काही परफेक्ट वाटते. खरंतर असेच काहीसे वर्ल्डवाइड प्रसिद्ध गायिका शकीरा हिचे आयुष्य आहे. मात्र असे म्हटले जाते की,कोणाचेच आयुष्य परफेक्ट नसते. शकीराचे प्रोफेशन लाइफ खरंतर ट्रॅकवर आहे. मात्र खासगी आयुष्यात तिने काही समस्यांचा सामना केला होता. (Singer shakira divorce)
शकीराचे लग्न बार्सिलोनाचा फुटबॉलपटू जेरार्ड पिके याच्यासोबत झाले होते. दोघांमध्ये घटस्फोट झाला आहे. परंतु शकीरा कामानिमित्त आपल्या मुलांसोबत बाहेर रहायची. याच दरम्यान तिचा नवरा जेरार्ड घरीच एक झूम कॉलवर होता. व्हिडिओ कॉल करतेवेळी जेरार्डच्या मागे एक अज्ञात महिला शकीराने पाहिली. ही गोष्ट २०२१ ची आहे. जेव्हा तिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्यावर संशय घेतला होता. त्यानंतर तिला कळले की, जेरार्ड तिला आधीपासूनच फसवत होता. रिपोर्ट्सनुसार, जेरार्ड, क्लारासह शकीराला चीट करत होता. क्लारा एक विद्यार्थीनी होती. जी त्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे काम करायची.
सप्टेंबर २०२२ मध्ये शकीराने एका मॅगजीनला दिलेल्या मुलाखतीत आपल्या घटस्फोटाबद्दल सांगितले. तेव्हा तिने असे म्हटले होते की, घटस्फोटाबद्दल आता सुद्धा बोलणे तिच्यासाठी मुश्किल आहे. ती अद्याप या फेजमधून बाहेर आलेली नाही. त्यावेळी तिची दोन मुलं मिलान आणि साशा यांना खुप काही सहन करावे लागले. यामुळेच ही खुप बिथरली होती. शकीराला आपल्या मुलांसाठी उत्तम आयुष्य हवे होते. मिलान ९ वर्षांचा आहे तर साशा ७ वर्षाचा आहे.
शकीरा आपल्या रिलेशनशिपमधून पूर्णपणे बाहेर आली नाही तोवर तिच्यामागे टॅक्सचे प्रकरण लागले. सिंगर स्पेनमध्ये राहते. रिपोर्ट्सनुसार शकीराने १४.५ मिलियनचा टॅक्स भरला नव्हता. हा टॅक्स तिला २०१२ ते २०१४ दरम्यानच्या कमाईवर भरायचा होता. स्थिती अशी सुद्धा झाली होती की, जर ती दोषी ठरली असती तर तिला ८ वर्ष तुरुंगात जावे लागले असते. हे सर्वकाही शकीरा सहन करत होतीच. पण त्याचवेळी तिचे वडील ही आजारी होते. (Singer shakira divorce)
हेही वाचा- 5 अफेअर, दोन लग्न तरीही आज एकटी आयुष्य जगतेय ‘ही’ अभिनेत्री
दरम्यान, शकीरा आणि जेरार्ड पहिल्यांदा फिफा एंथम ‘वाका वाका’ च्या व्हिडिओ सेटवर भेटले होते. दोघांनी २०११ मध्ये आम्ही एकत्रित आहोत असे जाहीर केले होते. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजेच जवळजवळ चार वर्षांनी ४ जून २०२२ रोजी शकीरा आणि जेरार्ड यांनी एक कॉमन स्टेटमेंट जारी करत आम्ही विभक्त होतोयं असे जाहीर केले होते.