चीनमध्ये HMPV या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांवर या व्हायरसच्या जास्त परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये झालेली रुग्णांची गर्दी आणि येथील स्मशानभूमीमध्ये लागलेल्या रांगा पाहून पुन्हा कोरोनासारखी महामारी येणार का, अशी भीती व्यक्त होत आहे. पण फक्त चीनमध्येच नाही तर अमेरिका आणि इंग्लडमध्येही तापाच्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. अमेरिकेत तर कोविड काळात ज्याप्रमाणात रुग्ण दाखल होत होते, त्यापेक्षाही तिप्पट प्रमाणात तापाचे रुग्ण वाढले आहेत. अमेरिकेतील रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डही रुग्णांनी भरले आहेत. यासोबत इंग्लंडच्या रुग्णालयांमध्येही तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून येथील आरोग्य यंत्रणेनं सतर्क रहा, असा इशारा दिला आहे. (HMPV)
चीनमध्ये वाढत असलेल्या HMPV रुग्णांच्या संख्येनं अवघ्या जगावर पुन्हा एकदा कोरोनासारख्या महामारीचं संकट उभं केलं आहे. कोरोनामध्ये ज्याप्रमाणे चीननं रुग्णांच्या संख्येबाबत लपवालपवी केली होती. नंतर कोरोनाचे उग्र रुप चीनमध्ये बघायला मिळाले, याचे परिणाम अवघ्या जगावर झाले. लाखो लोक या महामारीला बळी पडले. आत्ताही चीनमध्ये HMPV या विषाणूनं कहर केला आहे. यासंदर्भात सोशल मिडियावर फोटो प्रसिद्ध झाल्यावर जगभर खळबळ उडाली. चीनच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची तुडंब गर्दी झाली आहे, तर येथील स्मशानभूमीमध्ये लांबचलांब रांगा लागल्या आहेत. (Latest Updates)
यामुळे कोरोना पुन्हा आला, अशी शंका सर्वच देशांमध्ये व्यक्त होत आहे. अशातच अमेरिकामध्ये गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक तापाचे रुग्ण मिळू लागले आहेत. कोविडमध्ये जेवढे रुग्ण अमेरिकेत होते, त्यापेक्षा हा आकडा अधिक आहे. येथील आपत्कालीन वॉर्ड रुग्णांनी भरला असून काही रुग्णांना बेडसाठी वाट बघावी लागत आहे. अमेरिकेतील आरोग्य एजन्सीच्या मते, नवीन वर्षाच्या आसपास तापाचे रुग्ण शिगेला पोहोचले आहेत. अमेरिकेच्या पश्चिमेकडील राज्यांमध्ये तापाच्या रुग्णांचे जास्त प्रमाण आहे. गेल्या हिवाळ्यापेक्षा ही सख्या तिप्पटीनं अधिक आहे. अमेरिकेसोबत इंग्लडच्या रुग्णालयातही तापाच्या रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. यासाठी इंग्लडमध्ये आरोग्य विभागाची आपत्कालीन बैठकही झाली आहे. गेल्या आठवड्यात या रुग्णालयांमध्ये दररोज 5,000 हून अधिक प्रकरणे तापाच्या रुग्णांची आल्यामुळे येथे आपत्कालिन स्थिती लागू करण्यात आली आहे. (HMPV)
ब्रिटनच्या आरोग्य व्यवस्थेचे व्यपस्थापन करणा-या राष्ट्रीय आरोग्य सेवातर्फे महिन्याभराच्या कालावधीतच चौपट वेगानं तापाचे रुग्ण वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. यातच ब्रिटनमधील तापमानात कमालीचे चढ उतार दिसत आहेत, याचाही परिणाम तापांच्या रुग्णांच्या संख्येवर झाला आहे. अशक्त आणि श्वसनाच्या समस्या असलेल्या नागरिकांमध्ये तापाचे प्रमाण जास्त असल्याचे निदान झाले आहे. तापाच्या सामान्य लक्षणांमध्ये डोकेदुखी, सर्दी, खोकला अशी लक्षणे आहेत, मात्र यापेक्षा अधिक थकवा जाणवू लागला किंवा श्वास घेण्यास त्रास वाटू लागला तर त्यांनी लगेच रुग्णालयात यावे असे आवाहन आता करण्यात येत आहे. या सर्वात चीनमधील HMPV विषाणूबाधिक रुग्णांची संख्या भयावह वाटावी अशी वाढली आहे. HMPV म्हणजे, Human Metapneumovirus या नवीन विषाणूच्या उद्रेकाने जगभरातील आरोग्य संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. (Latest Updates)
========
हे देखील वाचा : HMPV व्हायरस भारतात पोहोचला, कोविडसारखी परिस्थिती होणार ?
Kolhapur News : मरून पुन्हा जीवंत होणाऱ्या माणसांच रहस्य काय ?
======
येथील रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोविड-19 नंतर, आणखी एका साथीच्या रोगासारखी परिस्थिती निर्माण होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, हा विषाणू श्वसन प्रणालीवर परिणाम करतो, त्यातही लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींसाठी HMPV विषाणू धोकादायक ठरत आहे. हा विषाणू श्वसनमार्गावर परिणाम करतो. चीनमध्ये 2001 मध्ये हा विषाणू प्रथम मिळाला होता. या विषाणू बाधित रुग्णाला प्रथम सर्दीचा त्रास सुरु होतो, त्यानंतर खोकला, छातीत दम लागणे आणि ताप अशा क्रमानं विषाणू मानवी शरीरावर हल्ला करतो. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल न धरल्यास या विषाणूची बाधा समोरच्यालाही होऊ शकते. त्यामुळेच कोरोनाप्रमाणेच या HMPV पासून दूर राहयचे असेल तर संक्रमित रुग्णांच्या संपर्कात येण्यापूर्वी तोंडावर मास्क घालणे गरजेचे आहे. तसेच हात स्वच्छ धुण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. (HMPV)
सई बने