Home » हिटलरचा खजिना सापडला?

हिटलरचा खजिना सापडला?

by Team Gajawaja
0 comment
Hitler's treasure found? marathi info
Share

अॅडॉल्फ हिटलर जर्मनीचा हुकूमशहा आणि त्यानं केलेले अत्याचार यांना कधीही विसरता येणार नाही. त्यासोबतच हिटलरचा खजिना हा सुद्धा चर्चेचा आणि शोधाचा विषय राहिला आहे. ज्या हिटलरमुळे दुसरे महायुद्ध झाले, त्या हिटलरचा अंतही एका गोळीमुळेच झाला. पण आपल्या मृत्यूआधी हिटलरनं अब्जो रुपये किंमतीचा खजिना कुठेतरी लपवून ठेवला होता. पोलंडवर हिटलरनं आक्रमण केले. त्यातून मिळवलेली लूट त्याच्या सैन्यानं एका बंकरमध्ये लपवून ठेवली होती. हिटलरनं लपवलेला खजिना शोधण्यासाठी आतापर्यत अनेक प्रयत्न झाले आहेत, मात्र त्यांना यश आले नाही. मात्र आता पोलंडमध्ये रेल्वेच्या रुळांचे काम करताना अचानक हा खजिना सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलंडमध्ये रेल्वे रुळाखाली मोठा शोध लागल्याचा दावा संशोधक करीत आहेत. येथे मोठं बंकर मिळालं असून त्यामध्येच हिटलरनं आपला खजिना दडवल्याचा त्यांचा अंदाज आहे. या घटनेमुळे पोलंड आणि जर्मनीमध्ये खळबळ उडाली आहे. हिटलरच्या या खजिन्याचे मूल्य आता करता येणार नाही, येवढा तो मोठा आहे. अनेक देशांची आणि त्यातील गर्भ श्रीमंत नागरिकांची लूट करुन हिटलरनं हा खजिना गोळा केल्याचे बोलले जाते. खरोखरच अशा बंकरमध्ये हा खजिना असेल तर त्यावर नक्की दावा  कुणाचा असेल याचीही चर्चा सुरु झाली आहे. (Hitler Treasure) 

पोलंडमध्ये हिटलरचा खजिना असल्याचे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. त्यासाठी वेळोवेळी अनेक शोधमोहिमही जाहीर करण्यात आल्या.  पण अचानक एका बंकरचा शोध लागला आणि ही सर्व शोधमोहीम त्याजागी आली. एका रेल्वेरुळाचे काम करताना हा बंकर समोर आला आहे. रेल्वे रुळांवर काम करत असताना अचानक एका मशिनच्या चाकांना काहीतरी धडकल्याचा आवाज झाला. थोडा शोध घेतला आणि त्याजागी उत्खलन केल्यावर तेथे मोठा बंकर आल्याचे संशोधकांच्या लक्षात आले आहे. यावर हिटलरने पोलंडमधून चोरी केलेला खजिना येथेच लपवला असेल असा दावा करण्यात येत आहे. (Hitler Treasure) 

पोलंडमधील इतिहासकारांची टीम गेली अनेक वर्ष या खजिन्यासाठी शोध मोहीम राबवत आहे. या टिमनं या भागाचा दौरा केला असून पोलंडच्या ममरेकी भागात सापडलेले बंकर हे हिटलरकालीन बंकर असल्याचे स्पष्ट केले आहे. खोदकाम करताना हा बंकर समोर आला आहे. रेल्वे ट्रॅकच्या अगदी खाली हा बंकर सापडला आहे. त्यामुळे यातच हिटलरनं सर्व सोनं लपवल्याची खात्री संशोधकांना आहे. हा बंकर मोठा असून यात काठोकाठ सोने आणि अमुल्य असे रत्न लपल्याचाही अंदाज आहे. यासंदर्भात पोलंड पाठोपाठ ब्रिटीश मिडीयामध्येही बातमी देण्यात आली आहे. यात हा बंकर म्हणजे, हिटलरची बुलेटप्रूफ खोली होती. अनेक गोष्टी गुप्त ठेवण्यासाठी हिटलरनं त्याची निर्मिती केली होती. स्वतः हिटलरही येथे राहत असे. येथेच हिटलरने चोरीचा खजिना लपवल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व शोध मोहिमेचे नेतृत्व जॅकीज हिस्टोरिकल अँड एक्सप्लोरेटरी असोसिएशनने केले आहे.(Hitler Treasure)

हिटलरच्या जर्मन आर्मी सुप्रीम कमांडचे मुख्यालय असलेल्या वुल्फ्स लेअर बंकर कॉम्प्लेक्सपासून काही मैलांवर असलेल्या वार्मिया आणि माझुरी प्रांतात पृष्ठभागाच्या पाच फूट खाली हे बंकर सापडले आहेत. येथेच जुने ट्रॅक होते. तेथे हिटलरची ट्रेन चालत असे. या रुळांच्या जागा नव्या रुळांचे काम सुरु होते. त्यादरम्यान हा सर्व खजिना सापडला आहे. यासंदर्भात पोलंडच्या मामेरच्या संग्रहालयाचे संचालक बार्टलोमीज प्लेबन्स्की माहिती दिली आहे. त्यांच्या मतानुसार मामेरकी ते वुल्फ्स लेअरपर्यंत रेल्वे ट्रॅक आहे, हे सर्वांना माहीत होते. पण त्याच्याही आत कुठले गुप्त रुळ असतील याची कल्पनाही आम्ही केली नव्हती. आता त्याच खाली हिटलरचे बंकर सापडले आहे. या बंकरच्या आता रेल्वे रुळ जात होते का आणि त्यातूनच ट्रेनमधून भरुन खजिना त्यातील बंकरमध्ये लपवण्यात येत होता का, याचा शोध आता सुरु होणार आहे. (Hitler Treasure) 

या खजिन्याचा शोध अनेक वर्षापासून घेण्यात येत आहे. पूर्वी खजिना शोधणार्‍यांनी दावा केला होता की, त्यांनी एका गुप्त बंकरचे छुपे प्रवेशद्वार उघडले होते जे दार त्यांना उत्तर-पूर्व पोलिश शहर वेगोर्झेव्होजवळील खजिन्याकडे घेऊन जाऊ शकते. पण नंतर त्यावर काहीच शोध लागला नाही.  (Hitler Treasure)

==========

हे देखील वाचा : गे, लेस्बियन, बायसेक्सुअल, ट्रान्सजेंडर यांच्यात फरक काय असतो?

==========

2017 मध्ये जर्मनीतील ड्रेस्डेनजवळील हार्टेंस्टीन टेकड्यांमध्ये नाझींनी वापरलेल्या गुहेत एक बंकर मिळाले होते. पण त्यात काहीही सापडले नव्हते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, जर्मन सैनिकांनी पोलंडच्या हॉचबर्ग पॅलेसच्या मैदानातील विहिरीच्याखाली जमिनीवर सोन्याचा मोठा खजिना दडवल्याचेही याच सैनिकांच्या जुन्या डाय-यांवरुन स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातही शोध मोहीम झाली. जर्मनीने पोलंडमध्ये 28 टन सोने लपवले होते.  त्याचाही शोध घेण्याची मागणी होत आहे.  हे जर खरे असेल तर त्या खजिन्याची सध्याची किंमत 1.25 अब्ज युरोपेक्षा जास्त असू शकते.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.