Home » हिटरलच्या आठवणी

हिटरलच्या आठवणी

by Team Gajawaja
0 comment
Hitler memories
Share

जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याच्या कटू आठवणी अजूनही जर्मनी आणि हिटलरचा जन्म जिथे झाला त्या ऑस्ट्रियामध्ये आहेत.  हिटलरचा जन्म जिथे झाला त्या ऑस्ट्रियामधील इमारतीबाबतही अशीच आठवण आहे. गेली अनेक वर्ष हिटलरच्या नावानं प्रसिद्ध असणारी ही इमारत वादात होती. येथे काही नाझी विचारसरणीला मानणारे युवक एकत्रही यायचे. त्यामुळे ही हिटलरचा जन्म झालेली ही इमारत पाडून तेथे एखादे धर्मस्थळ उभारण्याची तयारी ऑस्ट्रियाच्या सरकारतर्फे करण्यात येत होती. मात्र या इमारतीच्या मूळ मालकाचा त्याला विरोध होता.  ऑस्ट्रिया आणि जर्मनीच्या सीमेजवळ असलेल्या या घराचा तळमजला एकेकाळी नाझींचा तळ असल्याची माहिती आहे. 

20 एप्रिल 1889 रोजी या इमारतीतील एका खोलीत हिटलरचा जन्म झाला होता. नाझी राजवटीत, हे घर हिटलरचे स्मारक बनवण्यात आले होते. अनेक हिटलरभक्त ही इमारत बघण्यासाठी येत असत. पण 1944 मध्ये नाझी राजवट संपल्यानंतर या इमारतीचे महत्त्व कमी झाले. गेल्या अनेक वर्षापासून हे घर मुळ मालकाकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न ऑस्टिया सरकार करत होते. त्या प्रयत्नांना आता यश आले असून या इमारतीच्या जागी आता ऑस्टिया सरकार पोलिसांचे प्रशिक्षण घर करणार असून यात पोलिसांना मानवाधिकाराचे धडे देण्यात येणार आहे. ज्या हिटलरनं लाखो नागरिकांवर अत्याचार केले, त्याच्याच घरात आता पोलीसांना मानवाधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (Hitler memories) 

ऑस्ट्रेलियामध्ये हिटलरचा जन्म झाला त्या घराबाबत अनेक वर्ष मुळ मालक आणि सरकार यामध्ये वाद चालू होता. अखेर 2016 मध्ये हे घर मुळ मालकाकडून विकत घेण्यात आले. त्यानंतर येथे नक्की काय करावे यावर विचार चालू होता. आता या घराचे रुप पलटणार असून येथे पोलिसांचे विशेष प्रशिक्षण होणार आहे. अर्थात यासाठी ऑस्ट्रियाच्या सरकारलाही मोठा लढा द्यावा लागला. या घराचा मुळ मालक ही तिन मजली इमारत न विकण्याच्या भूमिकेवर ठाम होता. शेवटी नवीन नियम आणून या इमारतीवर ताबा मिळवण्यात आला. 2016 मध्ये ही इमारत 7 कोटींना विकत घेण्यात आली. त्यानंतर त्याचा विकास कसा करायचा याच्या उपाययोजना सुरु झाल्या. (Hitler memories)

ही इमारत ऑस्ट्रियातील ब्रौनाऊ येथे आहे. जर्मनीच्या सीमेच्या जवळ असलेल्या या हिटलरच्या जन्मस्थळाला नाझीवादाने बळी पडलेल्यांसाठी स्मरणस्थान बनवण्याबाबतच्या सूचना दुस-या महायुद्धानंतर देण्यात येत होत्या. या इमारतीमध्ये 20 एप्रिल 1889 रोजी हिटलरचा जन्म झाला. हिटलरच्या जन्माच्या वेळी ही  इमारत गेस्ट हाऊस होती. या इमारतीमध्ये  हिटलरच्या पालकांनी भाड्यानं खोल्या घेतल्या होत्या.  हिटरलचे वडील जवळच्या ऑस्ट्रियन-जर्मन सीमेवर कस्टम अधिकारी म्हणून काम करीत होते. अॅडॉल्फ हिटलर तीन वर्षांचा होईपर्यंत येथे रहात होता.  त्यानंतर त्याच्या वडीलांची  पासाऊ येथे बदली झाली. त्यानंतर हे कुटुंब येथून स्थलांतरीत झाले. (Hitler memories)

=======

हे देखील वाचा : इराण अफगाणिस्तानमध्ये पाण्यासाठी युद्ध…

=======

हिटलरनं पुढे जर्मनीमध्ये सत्ता स्थापन केली. ऑस्टियावरही वर्चस्व संपादन केले,  त्यानंतर या हिटरलच्या जन्मस्थळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.  पण जसा हिटलरचा उदय झाला तसाच अस्तही झाला. त्यानंतर या इमारतीचा वाद सरकार दरबारी रंगाला.  2016 मध्ये ऑस्ट्रिया सरकारने हिटलरच्या घराबाबत एक समिती स्थापन केली. हिटलरचा काळा इतिहास (Hitler memories) पाहता हे घर तोडण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या.  मात्र, हे घर तोडले तर इतिहासातील एक मोठा पुरावा पुसला जाईल, असा आक्षेपही काहींनी घेतला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझींनी या इमारतीचे धार्मिक इमारतीत रूपांतर केले होते. नाझी विचारांचे समर्थक येथे पर्यटक म्हणून येत होते. 2016 नंतर या इमारतीला पाडण्यासाठी झालेला विरोध पहाता, पुन्हा एकदा नाझी विचारसरणी येथे रुजत असल्याची भीतीही ऑस्ट्रिया सरकारला वाटली. या इमारतीमध्ये काही दिवस नाझी विचारसरणीकडे आकर्षित झालेल्या तरुणांची बैठकही होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे ऑस्ट्रिया सरकारनं या इमारतीबाबत ठोस भूमिका घेतली. आता 2025 पर्यंत ही इमारत ऑस्ट्रियाच्या पोलीसांचे प्रशिक्षण स्थळ म्हणून विकसीत होणार आहे.  यामध्ये पोलीसांना मानवीय अधिकार आणि त्यासंबंधीचे कायदे याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  एकूण ज्या हिटरलचा क्रूरकर्मा म्हणून उल्लेख करण्यात येतो,  आणि त्याच्यामुळे लाखो नागरिकांचा मृत्यू झाला, त्याच्या जन्मघरात आता पोलीसांना नागरिकांबरोबर सलोख्याचे संबंध कसे ठेवावे याचे प्रशिक्षण मिळणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.