1
आज सगळीकडे माघी गणपतीचा एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, आजच्याच दिवशी गणपतीचा जन्म झाला होता, म्हणूनच या दिवसाला ‘माघी गणेश जयंती’ असे संबोधले जाते. महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्ये ही दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाचे घरी आगमन होते. काही सावर्जनिक गणेश मंडळही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा दीड दिवसांसाठी करतात. या दिवशी श्रीगणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सुख-समृद्धी कायम टिकून राहते असे म्हटले जाते. आज सगळेच लोकं गणपतीची घरी आणि गणेश मंदिरांमध्ये जाऊन पूजा करतात. भारतात गणेशाची अनेक जाज्वल्य मंदिरं आहेत. यातल्याच एका अनोख्या मंदिराची आज आपण माहिती जाणून घेऊया. (Maghi Ganpati)
आपण कायम ऐकत आलो आहोत की गणपतीच्या मूर्ती या उजव्या सोंडेची आणि डाव्या सोंडेची अशा दोन प्रकारच्या असतात. मंदिरात किंवा घरात एकतर उजव्या सोंडेची किंवा डाव्या सोंडेची असते. मात्र एकाच मंदिरात उजव्या आणि डाव्या सोंडेची मूर्ती एकत्र असलेले आपण कधीच बघितले नाही. मात्र आपल्या महाराष्ट्र्रामध्ये एक मंदिर असे आहे, जिथे उजव्या आणि डाव्या सोंडेची मूर्ती एकसाथ स्थापित आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र पद्मालय येथील प्राचीन गणेश मंदिरात डाव्या आणि उजव्या सोंडेचे दोन गणपती एकाच मंदिरात विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळतात. देशातील कदाचित हे एकमेव असे मंदिर असावे. गणपतीच्या अडीच पीठांपैकी पद्मालय हे अर्धपीठ आहे. प्रवाळ क्षेत्र पद्मालय म्हणून ओळख असलेल्या या तीर्थक्षेत्रावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. (Marathi News)
पद्मालय हे तीर्थक्षेत्र एरंडोल शहरातून जाणाऱ्या नागपूर-सुरत एशियन महामार्ग क्रमांक ४६ पासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे. तर जळगावपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. ‘रिद्धी-सिद्धी’ सहित महागणपती प्रवाळ क्षेत्र वासिनी धरणी धराय नमः अर्थात गणपतीचे श्री क्षेत्र पद्मालय मंदिर, अशी या धार्मिक स्थळाची प्रमुख ओळख आहे. महाराष्ट्रात गणपतीची अडीच पिठे आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील मोरगाव आणि जालना जिल्ह्यातील राजूर ही पूर्णपीठे आहेत. तर पद्मालय हे अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. (Padmalaya Ganpati)
पद्मालय हा शब्द पद्म आणि आलय या दोन शब्दांचा मिलाफ आहे ज्या संस्कृतमध्ये कमळाचे घर असा अर्थ आहे. या मंदिराच्या जवळील तलाव कायम कमळाच्या फुलांनी भरलेला असतो. त्यामुळे मंदिराला पद्मालय असे म्हटले जाते. येथील तलावात सप्तरंगी कमळ आहेत. हे मंदिर टेकडीच्या वरती आहे आणि अनेक लहान मंदिरांनी वेढलेले आहे. विविध औषधी वनस्पती पद्मालय मंदिराच्या परिसरात आढळतात. हे मंदिर पुरातन असून मंदिराच्या संपूर्ण बांधकामाची रचना हेमाडपंथी आहे. मंदिरात एकाच व्यासपीठावर डाव्या उजव्या सोंडेचे गणपती आहे. (Todays Marathi Headline)

या मंदिरातील दोन्ही मूर्तींमध्ये प्रवाळ आहेत आणि त्यांच्या उजव्या कवटीचे त्रिशंकण उजवीकडे आहे आणि दुसरा एक डाव्या बाजूला आहे. दोन्ही मूर्ती स्वयंभू आहेत हे मंदिर दगडांच्या आतील बाजूस बनले आहे. सद्गुरू गोविंद शास्त्री महाराज बर्वे यांना रिद्धी सिद्धी प्राप्त झाली होती त्यामुळे या मंदिराचा जिर्नोद्धार त्यांनी केला असून, गणेश पूराणात या गणपती मंदिराचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. काशी ईश्वेश्वर येथील शंकराच्या मंदिराच्या प्रतिकृती प्रमाणे या मंदिराची निर्मीती असल्याचेही सांगण्यात येते. येथे ४४० कि.ग्रा. वजनाचा एक भला मोठा घंटा आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठे जाते आहे. (Top Marathi News)
गणेश पुराणातील उल्लेखानुसार कृतवीर्य राजाच्या मुलाला हातपाय नव्हते. दत्तात्रेयाने त्याला एकाक्षरी मंत्र देऊन पद्मालय क्षेत्रात अनुष्ठानाकरिता पाठविले. गणेशाच्या कृपार्शिवादाने त्याला हातपाय येऊन सहस्त्र बाहूंचे बळ त्याला प्राप्त झाले. पुढे त्यांनीच या प्रवाळ रत्नाच्या मूर्तीची स्थापना केली. पुढे हे स्थान प्रवाळ क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. पृथ्वीचा भार सहन करता यावा म्हणून शेषनागानेही या गणपतीचे अनुष्ठान करून दुसरी गणेश मूर्ती स्थापन केली. तिचे नाव धरणीधर असे पडले. (Latest Marathi HEadline)
सन १९०४ ला सातारा जिल्ह्यातील वाई येथील गोविंद शास्त्री बर्वे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. वाई येथून ते जळगाव जिल्ह्यातील तळई गावाला आले. तेथे त्यांनी मठ उभारला होता. तेथून काही भाविकांसोबत ते पद्मालयला आले. याठिकाणी त्यांनी १२ वर्षे तपश्चर्या केली. तेव्हा सिद्धी प्राप्त झाल्याने त्यांना भगवंताने गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा उपदेश केला. त्यानुसार बर्वे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. (Social Updates)
मंदिराचे बांधकाम पूर्ण पाषाणात आहे. हा दगड भडगाव तालुक्यातील आमदडे पेठेतून आणला गेला. एका बैलगाडीत एकच दगड येत होता. ९ वर्षे या मंदिराचे बांधकाम चालले. बांधकाम करणाऱ्या सर्व मजुरांचा याठिकाणीच रहिवास होता. मजुरांच्या स्वयंपाकाचे दळण एका भल्यामोठ्या जात्यावर दळले जायचे. ते बैलांच्या सहाय्याने फिरत असे. हे जाते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आजही आहे. याच ठिकाणी बर्वे यांनी गायी पाळल्या होत्या. म्हणून ब्रिटिशांनी त्यांना समन्स बजावले होते. त्याचा राग आल्याने बर्वे चोपडा तालुक्यातील उनपदेव येथे निघून गेले. पुढे त्यांनी उनपदेवला समाधी घेतली. २० बाय २० फुटाचा गाभारा, ३५ बाय ३५ फुट आकाराचा मंडप तर मंदिराची उंची ८८ फुटापर्यंत आहे. मंदिरातील मूर्तींची उंची साधारणतः अडीच ते ३ फुटापर्यंत आहे. मंदिराच्या परिसरात गणपतीच्या वेगवेगळ्या २१ मूर्ती आहेत. (Top Stories)
==========
==========
या मंदिरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर घनदाट अरण्य आहे. येथेच भिमकुंड आहे. पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की, पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा येथील अरण्यात ते राहीले होते आणि दंडकारण्यात तेव्हा बकासूर राक्षस राहत होता तो रोज गावात येऊन प्रत्येकाला मारझोड करून काही माणसांना ठार मारायचा. त्यांच्याकडील सर्व अन्न घेऊन जायचा. म्हणून एक दिवस गावातल्या सगळया लोकांनी ठरविले की, त्या राक्षसाला रोज गाडाभर अन्न, दोन बैल व एक माणूस एवढे द्यायचे. म्हणजेच रोज एका घरातून माणूस जायचे असे ठरले. कुंती मातेने जेव्हा ही हकीकत ऐकली तेव्हा तीने भीमाला बकासूराचा वध करावयास पाठविले. भीमाने बकासुराला लढाईत पराभूत केले. लढाई नंतर तहान भागवण्यासाठी त्याने जमिनीवर कोपर मारून पाणी काढले आणि आपली तहान भागवली. या कुंडाला भीमकुंड असे म्हणतात. (Top Trending Headline)
पद्मालय गणेश मंदिराच्या परिसरात एक महाकाय घंटा आहे. तिचे वजन सुमारे साडेचार मण इतके आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ आणि रूपे या पंच धातूंनी ही घंटा बनवली आहे. या घंटेत सुमारे एक पंचमांश म्हणजेच ८० किलो सोने आहे. नेरी गावातील कुलकर्णी यांनी ही घंटा काशी येथून बनवून आणली होती. सुरुवातीला या घंटेला धातूची लोळी होती. तिचा आवाज पंचक्रोशीपर्यंत जात होता. मात्र, धातूच्या लोळीमुळे घंटेला तडे पडत असल्याने ती काढून लाकडी लोळी लावण्यात आली आहे. (Scoial News)
(टीप : येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
