Home » ऐतिहासिक सिनेमा शेर शिवराज आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध

ऐतिहासिक सिनेमा शेर शिवराज आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध

by Team Gajawaja
0 comment
Sherr Shivraaj
Share

प्रेक्षक आणि समीक्षक अशा दोघांचेही कौतुक मिळवत जगभरात गाजलेला मराठी ऐतिहासिक सिनेमा शेर शिवराज (Sherr Shivraaj) आता जगभरातील प्रेक्षकांना घरबसल्या अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून पाहाता येणार आहे. दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित हा भव्य चित्रपट शिवाजी महाराजांच्या काळातील एक महत्त्वाच्या अध्यायावर आधारित आहे. हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवासावर आधारित फ्रँचाईझीतील फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड यांच्यानंतरचा चौथा सिनेमा आहे.

शेर शिवराजमध्ये या महान मराठी राजाच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि धाडसी प्रसंगाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र आदिलशाहीच्या शासनाखाली चिरडून निघत होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं असामान्य बुद्धी चातुर्य आणि धाडसाच्या जोरावर अफझल खानला हरवलं. चिन्मय मांडलेकर यांनी या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका केली असून मुकेश ऋषी बलशाली अफझल खानच्या भूमिकेत आहेत.

मुंबई मूव्ही स्टुडिओजचे निर्माते नितिन केणी म्हणाले, ‘जगभरातील प्रेक्षकांना शेर शिवराज उपलब्ध करून देण्यासाठी अमेझॉन प्राइम व्हिडिओसह भागिदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्हाला खात्री आहे, थिएटरमध्ये प्रेक्षकांचं जसं प्रेम या सिनेमाला मिळालं तसंच इथेही मिळेल.’

====

हे देखील वाचा: २२ जुलैला भेटीला येणार ‘अनन्या

====

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले, ‘शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात महान राजांपैकी एक होते आणि त्यांचं आयुष्य अविस्मरणीय आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटनांनी भरलेलं आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओशी सहकार्य केल्याचा मला खूप आनंद होत आहे, कारण त्यांच्या मदतीने आम्ही केवळ मराठी प्रेक्षकांपर्यंत नाही, तर जगभरातील इतिहास प्रेमींपर्यंत पोहोचू.’

मुंबई मूव्ही स्टुडिओजचे नितिन केणी, प्रद्योत पेंढारकर आणि राजवारसा प्रॉडक्शनचे अनिल नारायणराव वानखेडे आणि दिग्पाल लांजेकर आणि मुळाक्षरचे चिन्मय मांडलेकर यांनी शेर शिवराजची निर्मिती केली आहे.

====

हे देखील वाचा: टाइमपास ३ चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

====

चिन्मय मांडलेकर आणि मुकेश ऋषी यांच्याशिवाय सिनेमाच्या कास्टमध्ये मृणाल कुलकर्मी, अजय पुरकर, बिपिन सुर्वे, रोहन मंकणी यांचा समावेश आहे. हा भव्य ऐतिहासिक सिनेमा आता अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून भारत आणि 240 देशांत उपलब्ध करण्यात आला आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.