Historical caves in India- जेव्हा भारतातील सौंदर्याबद्दल बोलले जाते तेव्हा कश्मीर मधील बर्फाच्छादित डोंगर ते ऐतिहासिक ठिकाणांची नावे जरुर घेतली जातात.यामुळच देशातील विदेशातील पर्यटकांना अशा ठिकाणांना भेट देणे आवर्जून आवडते. अशातच देशातील विविध राज्यात ऐतिहासिक गुहा आहेत ज्या आजही त्यांच्या कथेमुळे आणि वास्तुशिल्पकलांमुळे प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांना तुम्ही भेट दिल्यानंतर तुमचे मनं नक्कीच मोहून टाकते. जाणून घेऊयात भारतातील काही प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गुहांबद्दल अधिक.
यामधील बहुतांश गुहा या विविध प्रकारच्या वास्तुकलांचे उत्तम उदाहरण आहे. तर काही गुहा या बुद्धांच्या आयुष्यासंबंधित आणि शिक्षणासंबंधित माहिती देतात. या गुफा पाहिल्यानंतर तुम्हाला भारताच्या परंपरेबद्दल अधिक कळते.
-अजंता आणि एलोरा गुहा
महाराष्ट्रातील जळगावातील शहरात अजंता आणि एलोरा या गुहा आहेत. या गुहा पाहण्यासाठी जगभरातील लोक येत राहतात. खडक कापून तयार करण्यात आलेल्या या गुहेत प्राचीन धार्मिक चित्र आणि मुर्त्या आहेत. तर एलोरा मध्ये ३४ गुहा आहेत ज्या सहाव्या आणि ११ व्या शतकापूर्वीच्या आहेत. अजंता मध्ये २९ गुहा आहेत ज्या दुसऱ्या शतकापूर्वीच्या आणि सहाव्या शतकातील आहेत. अजंताच्या गुहा बौद्ध धर्माला समर्पित आहेत. एलोरा गुहा ही बौद्ध धर्म, हिंदू धर्म आणि जैन धर्माचे मिश्रण दर्शवते.
-भीमबेटका गुहा
भीमबेटका गुहा ही मध्य प्रदेशातील रातापानी वन्यजीवन अभयारण्याच्या आतमध्ये आहे. या गुहांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे. या गुहा मानव जातीच्या सर्वाधिक जुन्या कलाकृतींचे दर्शन घडवून आणतात. या गुहांसंदर्भात अशी मान्यता आहे की, वनवासाच्यावेळी पांडवांनी येथेच आश्रय घेतला होता. त्यामुळेच ही भारतातील महत्वपूर्ण गुहांपैकी एक आहे.
-मौसमाई गुहा
मेघालयातील चेरापूंजी मधील मौसमाई गुहा देशातील अन्य गुहांपेक्षा वेगळी आहे. पृथ्वीवर सर्वाधिक नम स्थानजवळ मौसमाई गुहा सुंदर चुन्याच्या दगडाच्या गुहा आहेत. त्यामध्ये काही विशाल कक्ष आणि मार्ग आहेत. येथे अन्य भारतीय गुहांप्रमाणेच काळोख नसतो. याउलट या गुहा पूर्णपणे जगमगतात. त्यामुळे पर्यटकांना सुद्धा त्या शोधण्यास सोप्पे जाते.(Historical caves in India)
हे देखील वाचा- पद्मनाभ मंदिराच्या ७व्या दरवाजाचे रहस्य काय? किती असू शकतो खजिना?
-बाग गुहा
मध्य प्रदेशातील विंध्याचल पर्वतरांगांमध्ये बघानी नदीच्या तटावर ही बाग गुहा आहे. गुहेतील प्राचीन चित्रांसाठी ती फार प्रसिद्ध आहे. बाग गुहांना लोक रंग महलाच्या नावाने सुद्धा ओळखतात. मोठे खडकं कापून या प्राचीन गुहा तयार करण्यात आल्या आहेत. भारतीय कलेचे या गुहा उत्तम उदाहरण आहे. असे मानले जातात की, गुहांची निर्मिती बौद्ध भिक्षु दाताकांनी चौथ्या शतकापासून ते सहाव्या शतकात बनवली होती.
-बदामी गुहा
कर्नाटकात बदामी गुहांमध्ये चार गुहा आहेत. त्यामध्ये दोन भगवान विष्णूला समर्पित आहे, एक भगवान शंकर आणि दुसरी जैन धर्माची आहे. एका डोंगराच्या शिखरावर लाल वाळुच्या दगडांनी या बदामी गुहा भारतीय रॉक-कट वास्तुकलेचे सर्वाधिक उत्तम उदाहरणांपैकी एक आहे. असे मानले जाते की. या भारतीय गुहा सहाव्या शतकापूर्वीच्या आहेत.