हिंदू धर्मात व्रत हे काही खास सणांच्या वेळी ठेवण्याची परंपरा आहे. जसे की, अंगारिका असेल तर आपण व्रत ठेवतो. म्हणजेच उपवास ठेवतो. तर व्रत ठेवल्याने देवाची विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतात असे मानले जाते. तसेच व्यक्तीला पुण्याची प्राप्ती होते. व्रत करण्यासंदर्भात काही विशेष नियम ही आहेत. परंतु त्याचे पालन करणे अत्यंत गरजेचे असते. हिंदू धर्मात प्रत्येक पर्वावेळी व्रताचे विशेष महत्व असते. ते ठवण्याचे ही वेगवेगळे नियम असतात. व्रताच्या नियमांचे जर योग्य पालन केले नाही तर व्रत ज्यासाठी ठेवले आहे त्याचे फळ मिळत नाही. तर जाणून घेऊयात व्रत ठेवण्याचे धार्मिक, वैज्ञानिक आणि व्रत ठेवण्याचे काय आहेत नियम त्याबद्दल अधिक. (Hindu Vrat)
व्रताचे धार्मिक महत्व
सनातन धर्मात व्रत ठेवण्याचे विशेष महत्व आहे. व्रत ठेवल्याने व्यक्तीला मानसिक शांती. देवाच्या जवळ राहण्याची शक्ती आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. शास्रांमध्ये उपवास ठेवण्याचे विशेष महत्व आहे. मान्यता अशी आहे की, व्रत ठेवल्याने सर्व प्रकारच्या पापांमधून आणि कष्टांमधून मुक्ती मिळते. व्रत ठेवल्याने व्यक्तीचे मन, डोक आणि आत्मा शुद्ध होतो. हिंदू धर्मात व्रत ठेवल्याने देवाच्या प्रति आपली श्रद्धा, भाव, भक्ती आणि समर्पणाचा भाव येतो. याच कारणास्तव प्रत्येक धार्मिक सणावेळी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने व्रत ठेवले जाते.

व्रताचे वैज्ञानिक महत्व
व्रताचा जेवाढे धार्मिक महत्व आहे तेवढेच वैज्ञानिक महत्व ही आहे. विज्ञानानुसार, व्रत धारण केल्याने व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहते. व्रतादरम्यान भोजन केले जात नाही. काही अल्पोपहार करुन संपूर्ण दिवस काढला जातो. यामुळे व्यक्तीची पाचन क्रिया ठीक राहतो आणि ती मजबूत ही होते. व्रत ठेवल्याने व्यक्तीच्या शरिरातील लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण ही नियंत्रणात राहतो. ज्यामुळे व्यक्तीचे आरोग तंदुरुस्त राहते.
हे देखील वाचा- ‘या’ राशींना होणार वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ
व्रत ठेवण्याचे काही नियम
-व्रत ठेवणाऱ्यांनी सफेद रंगाचे कपडे घालावेत. तसेच व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली दररोजी कामे आटोपून सफेद रंगाचे कपडे घालावेत
-व्रतावेळी संबंधित देवी-देवतांची पूजा करावी. जेणेकरुन तुम्हाला त्या देवाचा आशीर्वाद मिळेल.
-व्रताच्या दिवशी झोपू नका, कारण तुम्ही ज्या कारणास्तव व्रत ठेवले आहे ते पूर्ण होणार नाही.
-व्रताच्या वेळी वारंवार खाण्यापासून दूर रहा. व्रताच्या वेळी अन्न त्याग करावा आणि केवळ पाणी आणि फळं खावीत. त्याला पूर्ण व्रत मानले जाते. (Hindu Vrat)
-व्रताच्या दिवशी खोटं बोलणे , चुकीच्या गोष्टी करण्यापासून दूर रहावे. व्यक्तीने नेहमीच सत्य बोलावे. कोणत्याही व्यक्तीला विनाकारण त्रास देऊ नये.
-ज्या दिवशी व्रत ठेवले असेल तेव्हा दान केल्यास उत्तम.तसेच मंत्रांचा जाप करावा.
-व्रताच्या वेळी सात्विक भोजन करावे.