Home » शनिवारच्या दिवशी चुकून ही ‘या’ गोष्टींचे दान करु नका

शनिवारच्या दिवशी चुकून ही ‘या’ गोष्टींचे दान करु नका

by Team Gajawaja
0 comment
Hindu Culture
Share

शनिवारच्या दिवशी काही चुकीच्य गोष्टींचे दान करणे तुम्हाला अशुभ फळं देऊ शकते. कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा पूजा पाठ केल्यानंतर दान दक्षिणा जरुर करावी. यामुळे तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळेल. ज्योतिष शास्रात शनिदेवाला कर्मदाता असे म्हटले जाते. त्यामुळेच आपण कधी कधी चुकून अशा वस्तूंचे दान करतो जे शनि देवाला आवडत नाही. याचे फळ ही मिळत नाही. अशा स्थितीत ग्रहाची दशा सुधारण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता अधिक वाढते.(Hindu Culture)

शनिवारी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करु नका
अशी मान्यता आहे की, शनिवारी जर तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान केल्यास तुमचेच नुकसान होईल. चुकून ही शनिवारी हळदीचे दान करु नका. कारण पिवळ्या रंगाचा संबंध हा गुरु ग्रहाशी असतो. शास्रात असे म्हटले गेले आहे की, शनि आणि गुरु हे एकमेकांचे शत्रू आहेत. त्यामुळेच शनिवारी पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की, सोनं, पितळं, गहू, हळद किंवा पिवळ्या रंगांचे वस्रांची खरेदी किंवा दान केल्याने शनिदेव नाराज होऊ शकतात.

सफेद वस्तूंचे दान करु नका
शनिदेवाच्या पुजेत सफेद रंगाच्या वस्तू अर्पण करु नका. त्याचसोबत या दिवशी ही त्याच रंगाच्या काही वस्तू ही दान करु नका. कारण यामुळे तुमचेच नुकसान होईल. जसे की, साखर, मीठ, चांदीचे दान शनिवारी करण्यापासून दुर रहा. असे केल्याने तुमची होणारी काम ही बिघडतात.

लाल वस्तूंचे दान करु नका
शनिवारच्या दिवशी तुम्ही कोणत्याही लाल रंगाच्या वस्तूंचे दान करु नका. कारण यामुळे शनिदेव नाराज होऊ शकतात. या दिवशी लाल रंगाचे धान्य ही दान करु नये. खरंतर लाल रंगाचा संबंध हा सुर्याशी असतो. त्यामुळे शनि आणि सूर्य हे एकमेकांचे शत्रू आहेत. म्हणूनच लाल रंगाचे दान शनिवारी करु नये.(Hindu Culture)

शनिदेवाला काळा रंग आवडतो. त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाच्या गोष्टी दान करु शकता. जसे की, काळे तिळ किंवा काळ्या रंगाच्या वस्तू तुम्ही दानाच्या रुपात देऊ शकता.

हे देखील वाचा- अचला सप्तमील रथ सप्तमी का म्हटले जाते? जाणून घ्या पौराणिक कथा

शनिवारच्या दिवशी कोणत्या वस्तू खासकरुन दान कराव्यात?
-शनिवारच्या दिवशी काळ्या रंगाची कंबल किंवा काळ्या रंगाचे वस्र दान करावेत
-काळ्या तिळाचे दान शनिवार आणि अमावस्येवेळी जरुर करावे. यामुळे शनि देवाची कृपा नेहमीच कायम राहते.
-मान्यता अशी आहे की, लोखंडाचे दान केल्याने शनि देव अत्यंत प्रसन्न होतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.