एरोबिक्स एक्सरसाइज खासकरुन हाय इंटेसिटी इंटरवल ट्रेनिंग वर्कआउटचा एक भागच आहे. याच्या मदतीने वेगाने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. मात्र ही एक्सरसाइज सर्वजण करु शकतात असे नाही. काही शोधातून असे समोर आले आहे की, हाय इंटेसिटी असणारा व्यायाम हृदयासंबंधित जोखिम वाढवू शकतो. तज्ञ असे म्हणतात की, हा वर्कआउट सर्वांसाठी सूट होत नाही. त्याचसोबत सुरक्षित आणि हेल्दी आहार फॉलो करणे सुद्धा फार महत्त्वाचे आहे.(high intensity workout)
हाइ इंटेसिटी इंटरवल ट्रेनिंग वर्कआउटमध्ये वेगाने शारिरीक व्यायामाचे प्रकार केले जातात. यामध्ये धावणे, उड्या मारणे किंवा काही मिनिटे एक्सरसाइज करत राहणे अशा हालचालींचा समावेश असतो. त्याचसोबत मध्येच थोडावेळ ब्रेक ही घेतला जातो.
पुढील स्थितीत हाय इंटेसिटी इंटरवल ट्रेनिंग करुन नका
-हृदयरोगाचे रुग्ण
कार्डियोवस्कुलर व्यायाम हृदयासाठी फार उत्तम मानला जातो. कारण यामुळे हृदयातील नर्वसला रक्तातून ऑक्सिजन घेण्याची प्रक्रिया सुधारते. यामुळे ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र एरोबिक व्यायाम ज्यामध्ये हाय इंटेसिटी असणाऱ्या वर्कआउटचा समावेश आहे, तो तुमच्या हृदयावर अधिक ताण टाकू शकतो. यामुळे हृदयासंबंधित जोखिम वाढू शकते. खासकरुन त्या लोकांसाठी ज्यांना आधीच हृदयासंबंधित समस्या आहे.
-बिगिनर्स
जर तुम्ही व्यायाम यापूर्वी कधी केला नसेल किंवा आता सुरुवात करणार असाल तर लगेच हाय इंटेसिटी वर्कआउट करणे टाळा. यामध्ये काही कठीण एक्सरसाइजचा सुद्धा समावेश असू शकतो. जर तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने केले तर नुकसान होऊ शकते हे लक्षात घ्या. त्यामुळे बिगिनर्सने सुरुवातीला हळूहळू व्यायाम करावा. त्यानंतर एक्सरसाइजचा इंटेस वाढवावा.
-दुखापत झाली असेल
जर तुम्हाला एखादी दुखापत झाली असेल तर हाय इंटेस वर्कआउट करणे टाळा. यामुळे मसल्सवर अधिक ताण पडला जाऊ शकतो. अशातच तुम्ही असे व्यायाम करा जे शरिराला आराम देतील. हाय इंटेसिटी वर्कआउट किंवा अन्य व्यायामाचे प्रकार दुखापत झालेल्या ठिकाणी अधिक दुखणे वाढवू शकतात. (high intensity workout)
-प्रेग्नेंसी दरम्यान
प्रेग्नेंसीमध्ये व्यायाम केल्याने त्रास होत नाही. अशा महिला आठवड्यातून १५० मिनिटांपर्यंत हलक्या स्वरुपाचा व्यायाम करू शकतात. मात्र हाय इंटेसिटी वर्कआउट प्रेग्नेंट महिलांनी अजिबात करू नये. यामुळे पोटातील बाळाला सुद्धा त्रास होऊ शकतो.