Home » उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नका या गोष्टी, बिघडेल आरोग्य

उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नका या गोष्टी, बिघडेल आरोग्य

by Team Gajawaja
0 comment
High BP  Patient Health Care
Share

High BP Health Care हायपरटेंशन म्हणजेच उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. बिघडलेली लाइफस्टाइल आणि असंतुलित खाण्यापिण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवली जात असल्याचे सांगितले जात आहे. अशातच उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे, अन्यथा हृदयासंबंधित समस्या आणि स्ट्रोकचा धोका वाढला जातो. उच्च रक्तदाब असणारे रुग्ण बहुतांशवेळा औषधांवरच अवलंबून असतात. पण उत्तम लाइफस्टाइल आणि योग्य डाएटच्या मदतीने उच्च रक्तदाबाची समस्या कंट्रोलमध्ये ठेवू शकता. जाणून घेऊया उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी खाणे टाळावे.

प्रोसेस्ड फूड्स
प्रोसेस्ड फूड्सचे सेवन करणे उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी टाळावे. मार्केटमध्ये मिळणारे पाकिटबंद चिप्स, सॉल्टेड पदार्थ खाऊ नये. यामुळे उच्च रक्तदाब वाढला जाऊ शकतो. या पदार्थांमध्ये उच्च प्रमाणात सोडियम असते. याशिवाय रुग्णांनी सॉफ्ट ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्सही पिऊ नये.

High BP Health Care

High BP Health Care

अत्याधिक खारट पदार्थ
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी अधिक खारट पदार्थ खाणे टाळावे. उच्च रक्तदाबासाठी मीठ धोकादायक ठरू शकते. मीठामध्ये सोडियम अधिक असल्याने ब्लड प्रेशर वेगाने वाढू शकते.

साखर आणि गोड पदार्थ
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी गोड पदार्थ खाणे टाळावे. कॅफेनमुळे ब्लड प्रेशर वाढले जाऊ शकते. यामुळे दिवसातून एक किंवा दोन कप चहा प्यावी. याचे अधिक सेवन करणे धोकादायक ठरू शकते.

=======================================================================================================

हेही वाचा :

त्वचेसाठी फायदेशीर ठरेल बदामाची साल, असा करा वापर

जेवल्यानंतर गोड खावेसे वाटते? असू शकतात ही कारणे

=======================================================================================================

उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी काय खावे?
बिघडलेली लाइफस्टाइल आणि अनहेल्दी खाण्यापिण्यामुळे सध्या उच्च रक्तदाबाची समस्या वाढली आहे. खासकरुन तरुणांमध्ये ही समस्या अधिक दिसून येत आहे. अशातच रुग्णांनी काय खावे याबद्दल पुढे जाणून घेऊया.

फळ आणि हिरव्या भाज्या
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी ताजी फळं खावीत. यामध्ये संत्री, कलिंगड आणि पपईसारख्या फळांचा समावेश करावा. यामध्ये पोटॅशियम भरपू प्रमाणात असल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय हिरव्या भाज्यांमध्ये पालक, ब्रोकोली, गाजरचे सेवन करावे. यामुळे ब्लड प्रेशन नियंत्रणात राहू शकते.

कडधान्ये
रुग्णांनी मसूर, मूग, चण्याची डाळ किंवा ओट्सचे सेवन करावे. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. (High BP Health Care)

हेल्दी फॅट्स
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी डाएटमध्ये नट्सचा समावेशही करावा. अक्रोड, बदामा आणि अळशीच्या बियांचा वापर करावा. यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि हेल्दी फॅट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.