Home » महिला-पुरुषांच्या रक्तात किती हिमग्लोबीन असावे?

महिला-पुरुषांच्या रक्तात किती हिमग्लोबीन असावे?

by Team Gajawaja
0 comment
Hemoglobin Level in Body
Share

रक्ताशिवाय आपण जगूच शकत नाही. रक्त आपल्या शरिराचा आधार आहे. शरिरातील प्रत्येक अवयवाला आपले काम करण्यासाठी रक्ताची गरज भासते. ते आपल्या शरिरातील क्रिया पार पाडण्यास मदत करते. रक्ताच्या माध्यमातून संपूर्ण शरिरातील अवयवांमध्ये पोषक तत्वे, हार्मोन्स, गॅस पोहचत राहतो आणि नको असलेल्या गोष्टी शरिरातून बाहेर टाकल्या जाता. रक्त शरिात पीएच आणि तापमान नियंत्रित करते. नेहमीच शरिराच्या आतमधील तापमान स्थिर ठेवते. रक्ताच्या आरबीसी मध्ये हिमोग्लोबीन असते. आयुष्य जगण्यासाठी ही एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. एका प्रौढ व्यक्तीच्या शरिरात ४ ते ५ लीटर रक्त असावे.(Hemoglobin Level in Body)

शारिरीक गरजा पूर्ण करण्यासाठई आवश्यक असलेल्या हिमग्लोबीनचे प्रमाण व्यक्चीचे वय, लिंग, उंची, शारिरीक स्थिती जसे की, गर्भवती महिलेची स्थिती ही वेगवेगळी असते.तसेच रक्तात हिमग्लोबिनचा स्तर पुरेशा प्रमाणात असल्यास शारिरीक आणि मानसिक विकास होतो. हिमग्लोबीनच्या कमतरतेमुळे एनीमिया सारखा आजार होते. एनीमिया झाल्यास थकवा, कमजोरी, त्वचा पिवळसर होणे, श्वास घेण्यास समस्या, चक्कर, छातीत दुखणे. हात पाय थंड पडणे, डोकं दुखणे अशा तक्रारी उद्भवतात. गर्भवती महिलांमध्ये जर एनीमिया झाल्यस तर पोटात असलेल्या बाळाला त्यामुळे नुकसान पोहचू शकते.

हिमग्लोबिनचे काम
मायो क्लिनिकच्या मते हिमग्लोबीनचे मुख्य काम ऑक्सिजनच्या प्रत्येक टिशू पर्यंत पोहचणे. हिमग्लोबीन ऑक्सिजनसह मिळते आणि ऑक्सिजन उत्सर्जित केले जात राहते. हे एखाद्या अवयवामध्ये ऑक्सिजन कमी-जास्त झाल्यास हिमोग्लोबिन ते बॅलेंन्स करतो. हिमग्लोबीन कार्बनडायऑक्साइडला सुद्धा सेल्समधून घेत फुफ्फुसापर्यंत पोहचवते.

महिला-पुरुषांमध्ये किती असावे हिमग्लोबीन?
पुरुष:
RCB: 4.35-5.36, हिमग्लोबीन: 13.2-16.6
महिला:
RCB: 3.92-5.13, हिमग्लोबीन: 11.6-16
(ही आकडेवारी ग्रॅम प्रति डेसीलिटरमध्ये आहे)

हिमग्लोबीनच्या कमतरतेची कारणं
-शरिरात लोहाची कमतरता
-विटामिन बी १२ ची कमतरता
-फॉलेटची कमी
-ब्लिडिंग
-कॅन्सर
-मुत्रपिंडाचा आजार
-यकृताचा आजार
-थायरॉइड
-थॅलीसीमिया (Hemoglobin Level in Body)

हे देखील वाचा- रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

हिमग्लोबीनची कमतरता कशी पूर्ण कराल?
हेल्थलाइनच्या बातमीनुसार शरिरात हिमग्लोबीनची कमतरता पूर्ण झाल्यानंतर कोबी, मीट, केळं, पालक, ग्रीन बिन्स, फ्लॉवर, मसूरची डाळ, टोफू, उकडलेला बटाटा,फोर्टिफाइड धान्य, एवोकाडो, राइस, राजमा यांचे सेवन केले पाहिजे. लोह शोशून घेण्यासाठी विटामिन सी ची गरज असते. विटामिन सी ची पुर्ततेसाठी साइट्रस फ्रुटचे सेवन करावे. यासाठी स्ट्रॉबेरी, संत्र, हिरव्या भाज्यांचे सेवन करावे.परंतु जंक फूड आणि तळलेले आहार, सोडा, चहा, कॉफी, अंमली पदार्थांपासून दूर रहावे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.