Home » Navratri : गरबा खेळताना हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Navratri : गरबा खेळताना हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Navratri
Share

नवरात्र सुरु होऊन दोन दिवस झाले असून, आता सर्वत्र गरबा आणि दांडियाचा फिवर पाहायला मिळणार आहे. नवरात्र म्हणजे गरबा आणि दांडिया असे समीकरणच आहे. तरुणाई तर गरबा आणि दांडिया खेळण्यासाठीच नवरात्राची वर्षभर वाट बघतात. मधल्या काही काळापासून सोशल मीडियामुळे तर गरबा आणि दांडियाला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक जणं तर नऊ दिवस नऊ वेगवेगळे ड्रेस, मेकअप करून गरबा खेळायला जातात. आता तर गरबा कॉम्पिटिशन देखील होतात. गरबा खेळण्यासाठी पैसे देऊन पास विकत घेतले जातात. एकूणच काय तर गरबा कमालीचा प्रसिद्ध आहे. (Health)

गरबा खेळणे म्हणजे देवीची उपासना करणे होय. मात्र मधल्या काही काळापासून गरबा चर्चेत येण्याचे कारण बदलले आहे. जिथे गरबा आनंद, उत्साह, देवीची आराधना यासाठी ओळखला जातो तिथे आता गरबा खेळताना होणाऱ्या त्रासामुळे आणि होणाऱ्या मृत्यूमुळे देखील रास ओळखला जात आहे. कारण मागील काही वर्षांपासून दरवर्षी गरबा खेळताना हार्टअटॅक येऊन मृत्यू झालेल्या अनेक बातम्या आपल्या कानावर पडतात. मुख्य म्हणजे कोणत्याही वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू गरबा खेळताना होतो. त्यामुळे आता तर गरबा खेळणे देखील घटक झाले आहे. (Navrtari 2025)

गरबा खेळताना अटॅक का येतो?
गरबा खेळताना हार्ट अटॅक येण्यामागे अनेक कारणे असू शकते. यात हार्ट अटॅकवर योग्य उपचार न घेणे तसेच गरब्याचा अचानक शरीरावर ताण येणे असू शकते. याशिवाय खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, डिहायड्रेशन, रक्तदाब, अतिश्रम, अपुरी झोप यासारख्या कारणांमुळे हार्ट अटॅख येऊ शकतो. गरबा खेळताना हृदयाची गती अचानक वाढू शकते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. अशावेळी गरबा खेळण्याअगोदर काही विशिष्ट पद्धतीने स्वतःची काळजी घेणे आवश्यक असते. (Marathi News)

गरबा खेळण्याआधी कोणती खबरदारी घ्यावी?
काही तपासण्या महत्त्वाच्या
गरबा खेळण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही लठ्ठपणा, हृदयविकार किंवा इतर कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर गरबा खेळण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा करावी. नवरात्रीपूर्वी सराव करा, अचानक आणि अधिक वेळ गरबा खेळल्याने थकवा आणि अडचणी निर्माण होऊ शकतात. (Todays Marathi Headline)

Navratri

हायड्रेटेड रहा
गरबा खेळताना तुम्हाला खूप घाम येतो आणि त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या हृदयावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे डान्स करताना पुरेसे पाणी पिणे आणि हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. खेळताना दर 20-30 मिनिटांनी पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट्सचे पेय घ्या. फळांचा रस, लिंबूपाणी यासारखे द्रवपदार्थ पचायला हलके आणि पोषणदायक असतात. (Trending Marathi Headline)

व्यायाम महत्त्वाचा
गरबा खेळण्यापूर्वी थोडे हलके स्ट्रेच करा आणि वॉर्म अप करा. शरीराला अधिकच्या हालचालींसाठी आधीच तयार कराल. ज्यामुळे इजा होण्याची शक्यता टाळता येईल. तसेच, हृदयावर कमी दबाव असेल. गरबा खेळताना किंवा नाचताना तुमच्या शारीरिक मर्यादेपलीकडे नाचू नका. या गोष्टीची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल, अन्यथा ही चूक तुमचा जीवही घेऊ शकते. जेव्हा तुम्ही खूप नाचता तेव्हा तुमच्या शरीरावर विशेषत: ह्रदयावर ताण येतो. यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. (Top Marathi Headline)

मादक पदार्थांचं सेवन करु नका
जर तुम्ही गरबा किंवा दांडिया खेळायला जात असाल तर मादक पदार्थांचे सेवन करू नका. दारू, सिगरेट अशा मादक पदार्थांचे सेवन केल्यामुळे तुमच्या हृदयावर ताण पडतो त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे मादक पदार्थांचे सेवन करू नका. (Latest Marathi News)

उपवास असल्यास गरबा करणे टाळा
जर तुम्ही नवरात्रीचे उपवास करत असला तर गरबा करणे टाळा. कारण उपवास करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. रिकाम्या पोटी गरबा खेळणे टाळा, त्यामुळे चक्कर, थकवा किंवा बेशुद्ध पडण्याची शक्यता असते. जर गरबा करायचाच असेल तर थोडं तरी खाऊन मग गरबा खेळा, सुकामेवा, फळं, ताक, दूध यांसारख्या गोष्टी उपयुक्त ठरतात. (Top Trending News)

=======

Navratri : दुर्गा सप्तशतीचे पाठ कधी आणि कसे करावे?

=======

मधुमेहाच्या रुग्णांनी काळजी घ्यावी
रक्तातील साखरेचा स्तर चढ-उतार होत असल्याने अचानक अटॅकचा धोका असतो. गरब्यापूर्वी आणि नंतर ब्लड शुगर चेक करा. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी खाली बसून थोडा वेळ विश्रांती घेणं आवश्यक आहे. तासंतास गरबा खेळण्याऐवजी दर काही वेळांनी ब्रेक घ्या. थोडं बसून, पाणी पिऊन, पुन्हा खेळा. आरोग्य बिघडल्यास लगेच जवळच्या प्राथमिक उपचार कक्षात जा. (Social News)

(टीप : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. आम्ही या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.