आजकाल धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त राहण्यासह जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. काही लोकांना दोन मिनिटं सुद्धा आरामात घालवता येत नाही. या प्रकराची लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत कामांकडे अधिक लक्ष देतात. संपूर्ण दिवस कामात व्यस्त राहणे, एखाद्या गोष्टीबद्दल अधिक विचार करणे याचा परिणाम दैनंदिन आयुष्यावर होतो. यामुळे आजकाल एंग्जायटी, डिप्रेशन आणि काही आजार होणे सामान्य झाले आहे. (Healthy Habits)
तुम्ही कामातून थोडा वेळ स्वत:साठी दिल्यास एंग्जायटी आणि डिप्रेशन सारख्या समस्येपासून दूर राहता येईल. यासाठी दैनंदिन आयुष्यात थोडे बदल करावे लागतील. लाइफस्टाइलमध्ये बदल करण्यासाठी पुढील काही खास टिप्सबद्दल जाणून घेऊयात अधिक…
हेल्दी डाएट
जे आपण खातो त्यामुळे आपल्याला उर्जा मिळते. यामुळे नेहमीच असे पदार्थ खाल्ले पाहिजेत जे आपल्या शरीरासाठी योग्य असतील. त्याचसोबत वजन देखील नियंत्रणात राहिल. फळं, भाज्या, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहारात केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारले जाते.
योगा आणि मेडिटेशन
आपण योगा आणि मेडिटेशन केल्यास ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. योगामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. मेडिटेशनमुळे मेंदू शांत आणि आयुष्यात स्थिरता येते. मेडिटेशन केल्याने मेंदू शांत राहिल्यास तुम्ही आयुष्यात काही महत्त्वाचे निर्णय योग्य घेऊ शकता.
डायरी लिहिण्याची सवय
दररोज आपल्यासोबत दिवसभर घडणाऱ्या घटनांबद्दल डायरी लिहिली तर तुमचे मन हलके होऊ शकते. असे केल्याने मन शांत राहते आणि मनातील भावना देखील लेखनाच्या माध्यमातून बाहेर पडतात. ज्या लोकांना एंग्जायटी आणि डिप्रेशनची समस्या असते त्यांना डायरी लिहिण्याचा सल्ला दिला जातो.
वेळेवर झोपणे
पुरेशी झोप घेतल्याने आपले मानसिक आरोग्य सुधारले जाते. यामुळे रात्रीच्या वेळी वेळेवर झोपावे. 7-8 तासांची पुरेशी झोप घ्यावी असा सल्ला नेहमीच दिला जातो. जी लोक कमी झोपतात त्यांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येऊ लागतात. हेल्दी आयुष्य जगण्यासाठी ही टिप नक्की वापरात आणा.(Healthy Habits)
सकाळी लवकर उठणे
आपल्या घरातील आजी-आजोबा नेहमीच सांगत असतात सकाळी लवकर उठले पाहिजे. याचे अनेक फायदे आरोग्याला होतात. जेव्हा आपण लवकर उठून योगा अथवा मेडिटेशन करतो तेव्हा मन हलके होते. त्याचसोबत सर्व दिवसभर काम करण्याची उर्जा तुमच्यात दीर्घकाळ टिकून राहते.
हेही वाचा- सकाळी उठल्यानंतर भीती वाटण्यामागे असू शकते ‘हे’ कारण