Home » Health : जाणून घ्या Heart Attack आणि Cardiac Arrest यातला नेमका फरक

Health : जाणून घ्या Heart Attack आणि Cardiac Arrest यातला नेमका फरक

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

नुकतेच प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या केवळ ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेफालीच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला आहे. अचानक शेफालीच्या निधनाच्या बातमीचे तिच्या परिवारासोबतच तिच्या फॅन्सला देखील मोठा झटका लागला आहे. मात्र आपण जर पाहिले तर याआधी देखील मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांचे खूपच कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कमालीचा फिटनेस जपणारे कलाकार जेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावतात तेव्हा अनेक प्रश्न मागे उरतात. (HEalth)

शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असला तरी अनेकांनी तीच मृत्यू हा Cardiac Arrest ने झाल्याचे सांगितले आहे. मात्र हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट या दोन स्थितींमध्ये फरक आहे. आजकालच्या मॉडर्न जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आज जरी आपल्याला याचा काही फरक पडत नसला तरी भविष्यात आपल्याला गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मधल्या काही काळापासून अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि जाड लोकांपासून ते फिटनेस फिक्र लोकांपर्यंत अनेकांना ह्रदयविकाराचा सामना करावा लागत आहे. मात्र अनेकांना आजही Heart Attack आणि Cardiac Arrest या दोन एकच गोष्टी वाटतात. मात्र असे अजिबातच नाहीये. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जाणून घेऊया यातला नेमका फरक काय आहे. (Marathi News)

कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय?
कार्डिअॅक अरेस्टमध्ये हृदयाचे ठोके अचानक बंद होतात. एका क्षणात आपले हृदय रक्त पंप करणे थांबवते. रक्तदाब कमी होतो आणि मेंदूसह सर्व अवयवांच्या रक्तपुरवठ्याच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम होतो. मेंदुला रक्तपुरवठा न झाल्यास रुग्णाची शुद्ध देखील हरपते. अशा वेळी जर रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल न केल्यास मृत्यूचा धोका वाढतो. कार्डियाक अरेस्ट आल्यावर आपल्या पेशींना आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही. पेशींमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि ही एक जीवघेणी स्थिती आहे. (Todays Marathi Headline)

Health

यामध्ये तातडीने मदत मिळाल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता वाढते. अशा वेळी रुग्णाला सीपीआर दिल्यास थोडा आराम मिळतो. कार्डिअ‍ॅक अरेस्टची समस्या उद्भवण्यामागे हृदयाशी संबंधित कारणे असतीलच, असे गरजेचे नाही. हृदयाचे असामान्य ठोके हे अचानक येणाऱ्या कार्डिअ‍ॅक अरेस्टचे मुख्य कारण आहे, यास वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन असे सुद्धा म्हणतात. शरीरातील विद्युत आवेग हृदयाद्वारे योग्य पद्धतीने प्रसारित केले जातात. यामुळे हृदयातील चेंबर्सचे आकुंचन सुरू राहते. या चेंबर्सद्वारे शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा केला जातो. (Top Marathi Headline)

कार्डिअॅक अरेस्टची लक्षणे कोणती?
तसे पाहिले तर कार्डिअॅक अरेस्ट हा अचानकच येतो. पण ज्यांना हृदयाशी संबंधित काही आजार आहे, अशा लोकांना कार्डिअॅक अरेस्ट येणायची शक्यता जास्त असते. कधी कधी कार्डिअॅक अरेस्ट येण्याआधी छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत धडधड होणे, चक्कर येणे, शुद्ध हरपणे, थकवा किंवा अंधारी येणे अशी लक्षणं सुद्धा दिसू शकतात. (Latest Marathi News)

हृदयविकाराचा झटका येणे म्हणजे काय?
हृदयाचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी ऑक्सिजनयुक्त रक्ताची आवश्यकता असते. रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्यांद्वारेच हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा होत असतो. या धमण्यांमध्ये ब्लॉकेज अर्थात अडथळे निर्माण झाल्यास ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत पोहोचणे बंद होते. पुरेशा प्रमाणात रक्त न मिळाल्यास हृदयाच्या पेशी हळूहळू मृत होऊ लागतात. परिणामी याचा परिणाम हृदयाच्या कार्यक्षमतेवर होण्यास सुरुवात होते. आणि मग शेवटी अशी वेळ निर्माण होते की त्यावेळेस हृदयाची कार्यक्षमता आवश्यकतेपेक्षा जास्त कमी होते आणि त्यामुळे हृदयावरील ताण वाढतो अशावेळी हृदय कार्य करणे पूर्णपणे बंद करते, यालाच वैद्यकीय भाषेमध्ये ‘हार्ट अटॅक’ असे म्हटले जाते. (Social Updates)

=========

हे ही वाचा : Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीचे महत्व आणि शुभ मुहूर्त

==========

निरोगी हृदय ठेवण्यासाठी खालील गोष्टी पाळा
> उच्च सोडियमयुक्त आहारामुळे रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो.
> हृदय निरोगी राहावे, यासाठी आहारातून सोडियमचे प्रमाण कमी करावे.
> तेलकट-तुपकट, मिठाई, ट्रान्स फॅट्स, सॅच्युरेटेड फॅट्स, सोडियमयुक्त पदार्थ, रिफाइंड शुगर घेणे बंद करा. > हवाबंद डब्यातील पदार्थ, मद्यसेवन, फास्ट फूड आणि जंक फूडचे सेवन करणे टाळा.
> हृदय निरोगी राहावे, यासाठी नियमित व्यायाम करावा. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कार्डिओ एक्सरसाइज करा.
> कार्डिओ एक्सरसाइजमध्ये चालणे, जॉगिंग आणि सायकलिंग या गोष्टींचा समावेश होतो.
> कार्डिओ एक्सरसाइजमुळे हृदयाची गती वाढते आणि हृदयाच्या स्नायूंचाही व्यायाम होतो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.