Home » हिवाळ्यात Vitamin D ची शरिरातील कमतरता दूर करण्यासाठी खा ‘हे’ ड्रायफ्रुट्स

हिवाळ्यात Vitamin D ची शरिरातील कमतरता दूर करण्यासाठी खा ‘हे’ ड्रायफ्रुट्स

हिवाळ्यात उनं फारसे नसल्याने शरिरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होऊ शकते. यामुळे शरिरातील हाडं कमकुवत होऊ लागतात.

by Team Gajawaja
0 comment
Health care in winter
Share

Health Care Tips in Winter : हिवाळ्यात उनं फारसे नसल्याने शरिरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होऊ शकते. यामुळे शरिरातील हाडं कमकुवत होऊ लागतात. याशिवाय थकवा आणि स्नायू दुखण्याची समस्याही उद्भवू शकते. व्हिटॅमिन डी चे नियमित सेवन केल्याने शारिरीक समस्याच नव्हे तर मानसिक समस्याही दूर होतात. याशिवाय डिप्रेशन आणि सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर सारख्या मानसिक समस्यांपासून दूर होऊ शकतात.

हिवाळ्यात शरिरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झाल्यास तुम्ही ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता. अशातच तुम्ही कोणते ड्रायफ्रुट्स खाऊ शकता याबद्दल जाणून घेऊया अधिक….

काजू

Cashews: tasty snack or unhealthy choice? Nutritionist debunks common myths  | Health - Hindustan Times
काजू व्हिटॅमिन डी चा उत्तम स्रोत मानले जातात. यामध्ये व्हिटॅमिन डी व्यतिरिक्त हेल्दी फॅट्स आणि फायबर असतात, जे शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. याशिवाय हृदय, वजन कमी करणे आणि ब्लड शुगरचा स्तर कंट्रोल करण्यास मदत करतात. यामुळे हिवाळ्यात दररोज काजूचे सेवन करू शकता.

बदाम

Natural Almonds (Badam), Packing Size: Half Kg
बदाम व्हिटॅमिन डी शिवाय व्हिटॅमिन ई चा देखील उत्तम स्रोत मानला जातो. बदाममध्ये प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे बदामाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. 100 ग्रॅम बदामात 2.6 माइक्रोगॅम व्हिटॅमिन डी असते, जे शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण करू शकते.

अंजीर

Fig (Anjir ) Premium – Shreeji Foods
अंजीर व्हिटॅमिन डी चा एक उत्तम स्रोत आहे. सुकलेल्या अंजीरच्या तुलनेत ताजे अंजीर अधिक पौष्टिक असतात. अंजीरमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फोरसचे गुणधर्म अधिक असतात. जे हाडांसाठी अत्यंत फायदेशीर असतात. पचनासंबंधित समस्याही अंजीर खाल्ल्याने दूर होऊ शकतात. (Health Care Tips in Winter)

मनुके

PREMIUM QUALITY BIG KISHMISH RAISIN 250 GRAM
मनुके आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. यामध्ये पोटॅशिअम आणि लोह असते, जे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते. याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.


आणखी वाचा :
सर्दी-खोकला झाल्यानंतर या फळांचे सेवन करणे टाळा
वजन कमी करण्यासाठी Intermittent Fasting करताय? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
हेल्दी राहण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर ‘या’ चूका करणे टाळा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.