Home » खुर्चीवर दीर्घकाळ बसून राहिल्याने होऊ शकतात हे गंभीर आजार

खुर्चीवर दीर्घकाळ बसून राहिल्याने होऊ शकतात हे गंभीर आजार

by Team Gajawaja
0 comment
Health Care Tips
Share

Health Care Tips :  डेस्क जॉब करणारे बहुतांशजणांना सोपे आणि आरामदायी वाटते. पण तुम्हाला माहितेय का, सातत्याने 9 तास खूर्चीवर बसून राहिल्यास तुमच्या आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. खरंतर डेस्क जॉबमुळे आरोग्यासंबंधित वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…..

मधुमेह
दीर्घकाळ तुम्ही खुर्चीवर बसून राहिल्यास तुम्हाला मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो. डेस्क जॉबमुळे शरिरातील इंसुलिन कमी होते आणि ब्लड शुगर वाढली जाते. अशातच तुम्हाला मधुमेहाचा धोका होण्याची शक्यता निर्माण होते.

हृदय रोग
तुम्ही दीर्घकाळ खुर्चीवर बसून काम करत असाल तर त्या दरम्यान तुमचे शरीर निष्क्रिय होते. यामागील कारण म्हणजे शरिरात बॅड कोलेस्ट्रॉल जमा होणे. कोलेस्ट्ऱल रक्त वाहिन्यांना चिकटले जाते. यामुळे हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.

How Your Desk Job Can Lead To A Lifetime Of Pain - MVM Health - Pain, Vein  & Wellness

उच्च रक्तदाब
शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढल्यास तुम्हाला उच्च रक्तदाबाचा सामना करावा लागू शकते. उच्च रक्तदाबामुळे धमन्यांवर अधिक प्रेशर पडले गेल्याने रक्त पंप करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. यामुळे हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

लठ्ठपणा
सातत्याने 9 तास खुर्चीवर बसून काम केल्याने शरिरातील फॅट्स वाढले जातात. यामुळे लोक लठ्ठपणाचे शिकार होतात. लठ्ठपणावेळी पोटावरील चरबी अधिक वाढली जाते. (Health Care Tips)

स्नायू आणि हाडं दुखतात
दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने शरिराच्या खालचा भाग आणि स्नायू कमकुवत होऊ वाहतात. पायांची हाडं कमकुवत होतात. फारशी शारिरीक हालचाल न झाल्यास ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढला जातो. याशिवाय खांदे, मान झुकलेल्या स्थितीत राहिल्याने सर्वाइकल पेन सुरू होतो.

(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


आणखी वाचा :
वयाच्या चाळीशीनंतरही सुंदर आणि स्टायलिश दिसायचेय? फॉलो करा या गोष्टी
सरव्हायकल कॅन्सरची ही आहेत लक्षणे, असे राहा दूर
हिवाळ्यात शरीराचे तापमान गरम राहण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.